Friday, May 27, 2011

गोष्ट लोकलमधली-१४

 आईशी बोलणं झाल्यावर लगेचच मी नेहाला call केला...
" हेलो, नेहा आपण जिंकलो...माहितीये मला आई काय म्हणाली..आपण कोल्हापूरला जायचय..नुसत देवीच्या दर्शनाला नाही पण तुझं घर पाहिला सुद्धा....भारी ना...
  अरे काय सांगतोयेस काय....?? खरच...अरे पण एक लोचा आहे ना..मी कुठे सांगितलाय घरी आजून?? direct तुम्ही घरी येणार म्हणजे जरा odd वाटेल ना ते...त्याआधी निदान माझ्या आईला तरी कल्पना देयला लागेल...ना..
hmmmm ....मग आता काय करायच? 
आता तेच जे आपण तुझ्या आईबाबत केलं....second inning of the match ....माझ्या आईची भेट...
आग ते ठीक आहे पण ते कसं? काकू तर कोल्हापूरला आहेत..ना....मग त्यांना कसकाय भेटणार मी?
 त्याची काळजी तू करू नकोस .....तू कोल्हापूरला जायची तयारी कर...अरे पण आपण एक गोष्ट विसरलोच....तुझ्या आईला मी आवडले हे तर ठीक आहे पण तुझ्या बाबांचं..काय त्यांना तर मी भेटले पण नाहीये... 
आता त्याची काळजी तू करू नकोस....आता lets begin mission kolhapur ....
ठीक आहे मग तर done .....आता बाकी planning तुमची कोल्हापूरला येयची date fix झाल्यावर..."
असं म्हणून तिने फोन ठेवला..मनाला एक विचित्र पण हवहवस समाधान वाटत होत....
     मग मध्यंतरी माझ्या परीक्षा सुरु झाल्या....पेपर्स चांगले गेले...आणि मी ४ दिवसांच्या सुट्टीसाठी पुण्यात परत आलो....सगळ्यात महत्वाच्च काम म्हणजे बाबांना सांगायचं होतं...ते काम मी आईकडेच सोपवलं होतं...त्यादिवशी आईला मी फक्त त्याची आठवण करून दिली....ती म्हणाली....समीर...result लागला का रे तुझा? grades कळले का..??
मग कळले ना....मला ९.४५ मिळालेत...ते बाबांनी ऐकलं....
ते म्हणाले...छानच मिळालेत मार्क्स....नेहाला सांगितलेस?.......
हो मग....एक मिनिट कोणाला सांगितले? कोण??
नेहा.....तुला माहित नाही कोण नेहा ते??  
बाबा....नेहा आणि तुम्ही i mean तुम्ही ओळखता तिला? कसकाय?? त्या result पेक्षा मला ह्याचाच आनंद झाला होता...आई आणि मी दोघही काहीही कळत नसल्यासारखं, गांगरून गेल्यासारख एकमेकांकडे पाहत उभं होतो.. 
 "पकडलं कि नाही मी बरोबर ते सांग आधी....अरे राजा....त्यादिवशी एकट्या आईला भेटवलस....बाबांना विसरलास ना....पण गम्मत अशी झाली..कि तुझी नेहा इथे तीच office id विसरली...दुसर्या दिवशी सकाळी ती आली होती..पण तू आईला घेऊन मंदिरात गेला होतास....बेल वाजली...मी दार उघडलं....
" हेल्लो काका मी नेहा...समीर ची frnd ....
  ये ना...आग समीर मंदिरात गेलाय...काही काम होता का तुझ?
   काका actuly ना मी काल आलेले तुमच्याकडे....काकुना भेटायला...संध्याकाळी...तेव्हा ना मी माझं office id  विसरले इथेच...तेच घेयला आलीये आणि म्हणल... समीर असेल तर जाऊ त्यालापण घेऊन...
कुठे?? तो तर iit मध्ये जाईल ना...? आणि तू नौकरी करतेस?
हो काका....ते काय आहे ना मी माझं btech iit मद्रासहून पूर्ण केलय...and then i m doing a job in mumbai...माझी आणि समीरची लोकल मध्ये ओळख झाली....
बर बर....समीर मला काहीच बोलला नाही....कधी तुझ्याबद्दल....तुझ्या येण्याबद्दल तू  त्याचा आईला भेटली त्याबद्दल...असो...थांब मी बघतो....तुझं id ....हे घे इथेच आहे.......बर समीरला माहिती होतं का कि तू आता येणारेस इथे...आणि तूं तुझं id विसर्लीयेस वगरे 
नाही हो काका....माझा रात्री फोन  discharge झाला सो मी त्याला काही कळवलच नाहीये...
आणि आता सांगायचं पण नाही....एक लक्षात ठेव मी तुला भेटलोय हे समीरला कळता कामा नये....बच्चू माझ्यापासून लपवतो काय...लेकीन हम भी तुमारे बाप है.....इतने आसानीसे हारने वाले नही...पोरी....तू अगदी सुंदर आणि ह्या घराला साजेशी आहेस...आमच्या सम्र्यान हिरा निवडलाय हिरा....नेहानी बाबांना नमस्कार केला....ते म्हणाले...नेहमी यशस्वी हो....आणि वचन दे मी जे काय बोललो त्यापैकी काहीही समीरला सांगणार नाहीस....
काका मी वचन देते.....पण तुम्ही खरच खूप छान आहात...हे छान असणं समीर नक्कीच तुमच्याकडून शिकलाय..."
"बापरे..... बाबा एवढा सगळं झालं आणि मला तिळमात्रही तुमी कळू दिला नाही....हि तुमची मिलीभगत होती तर....नेहान तुमच्यावर impression पाडायच्या ऐवजी तुम्हीच तिच्यावर पाडलं कि......पण तुम्हाला ती चांगली वाटली हे ऐकून मनाला खूप समाधान वाटलं....पण बाबा मला असा gas वर ठेवून तुमाला मज्जा आली असेल ना..??.मी आणि आई काय काय प्लान्स करत होतो कि तुम्हाला कसं सांगायचं कसं पटवायचं... पण तुम्ही तर खरच बाबा u r g8888 ......"असं म्हणून मी त्यांना एक गच्च मिठी मारली...डोळ्यातन दोनच आनंदाश्रु आले त्यांच्याही आणि माझ्याही....ते म्हणाले...   
  अरे वेड्या.....रडतोस काये..आता फक्त हसायचे दिवस आलेत....चला तयारी करा...कोल्हापूरला जायचं ना....आई म्हणत होती मला....आणि नेहाला सांग....हिरवा झेंडा माझ्याकडून....पोरा नाव काढलस...आधी...iit मध्ये शिकून आणि नंतर iit मध्ये शिकलेली पोरगी पसंत करून...."
धन्यवाद बाबा....आई...कोल्हापूरला कधी जायचं ते लवकर सांग...सगळं व्यवस्थित झालं होतं तरी आजून एक गोष्ट मनात सलत होती...ती म्हणजे मी आजून नेहाच्या आई वडिलांना भेटलो नव्हतो.... 

      

Saturday, May 21, 2011

गोष्ट लोकलमधली-१३

दुसर्यादिवशी नेहमीप्रमाणे आम्ही लोकल मध्ये भेटलो.....नेहाला मी सगळ सांगितलं...थोड्यावेळ तिने विचार केला....आणि मला म्हणाली....काकूंना ती दीप्ती संस्कारी वाटली ना....चांगलय...पण त्या आजून नेहाला भेत्ल्याच नाहीयेत.....lets meet काकू...lets play the final of this world cup....hope our team will win ....मी म्हणल...ठीक आहे....आज भेटूयात आईला...
        माझ college संपल्यावर मी नेहाला फोन केला...ती पण लगेचच ऑफिस मधून निघाली.....आम्ही विक्रोळीला भेटलो...ट्रेन पकडली आणि दादरला उतरलो...आईला मी ट्रेन मधूनच फोन केला....मी आणि माझी एक frnd येतोय घरी....ती म्हणाली ठीक आहे....आम्ही ७ वाजता पोचलो...आई देवाजवळ दिवा लावत होती...आम्ही घरात गेलो..हातपाय धुतले...थेट देवघरात गेलो...नेहा आईच्या शेजारी जाऊन उभी राहिली.....आई नि डोळे उघडले...तिच्या शेजारी...पंजाबी suit घातलेली, डोक्यावरून ओढणी घेतलेली...आणि केसांची एक बट डोळ्यांवर आलेली.....आणि प्रसादासाठी हात पुढे केलेली एक मुलगी तिला दिसली..तिने तिला प्रसाद दिला..नेहानी आईला वाकून नमस्कार केला...आई माझ्याकडे वळली....प्रसाद हातात ठेवला....परत देवाकडे वळली..तेवढ्यात मी म्हणालो...
" आई..हि नेहा...
  मला ट्रेन मध्ये भेटली..
  आम्ही रोज ट्रेन मध्ये असतो बरोबर....तिला तुला भेटायचं होतं....सो ती आलीये.."
  आई म्हणाली हो का?
 छान.....काय ग काय करतेस तू?"
" हेल्लो काकू...मी नेहा...मी IIT मद्रासहून btech केलय...सध्या मी नौकरी करतेय...इथे विक्रोळीला....माझी आणि समीरची भेट लोकल मध्ये झाली..he is a very nice and helpful person...."
तू काय घेणार...चहा, कॉफ्फी...
काकू तुम्ही बसा मी करते..काय पाहिजे तुम्हाला...
आग नको...मी करते..तुला कुठे माहितीये कुठे काय आहे स्वयंपाकघरात????
 आणि नेहा फसली....म्हणाली मला माहितीये मी पोहे केलेत इथे काकू.....झालं...आई ला कळलं....
my mom is very sharp ....नंतर बराचवेळ त्यांनी गप्पा मारल्या आईने तिच्या घरच्यांबद्दल विचारलं....बरीच चर्चा झाली...शेवटी...नेहा उठली...म्हणाली चाल निघुयात बराच वेळ झालाय...तेवढ्यात आई म्हणाली आता जेवूनच जा...उशीर झालाय तर...हवंतर तू कर स्वयंपाक...तसही तुला सगळ माहितीये...कुठे काय आहे ते...माझा तर आच राहिला.....नेहानी batting तर भारीच केली होती.....माझी आई आणि  ती तोडीसतोड आहेत हे मला कळलं...नेहा म्हणाली नको काकू...पुढच्यावेळेस नक्की करेन...आता मला उशीर होईल...तिने पुन्हा आईला नमस्कार केला..आम्ही निघालो..ट्रेन मध्ये आमची चर्चा सुरु झाली...आईला ती नक्कीच आवडली होती.......असा तिच्या बोलण्यातून वाटत होतं...तिला घरी सोडलं...मी घरी आलो परत...आई शांत बसली होती...मी आत आलो...मनात जरा धाकधूकच होती...आईजवळ गेलो...मांडीवर डोकं ठेवलं...आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला..हळूच म्हणाली...कोल्हापूरला जायचं...बर्याच दिवसात देवीचंदर्शन झालं नाही...मी आईकडे पाहिलं....तिला म्हणलं आई...तुला माझ्या मनातलं...डोळ्यातल कस काळत ग.....u r realy sweet mom...i love u...
" आई म्हणाली बस पुरे आता...नेहाला सांग आम्ही जातोय कोल्हापूरला...तू पण ये...तिचं घर पहायचय मला..." 
  " जशी आपली आज्ञा मातोश्री.." मला मनोमन फारच आनंद झालं होता,,,,,

   
 
 

Wednesday, May 18, 2011

गोष्ट लोकलमधली-१२

 आम्ही ice cream खाऊन घरी निघालो..सगळं कस हवहवस वाटत होतं...ट्रेन मध्ये बसलो...गाणी लावली..तेवढ्यात फोन वाजला..
" हेल्लो आई....काय चाललय?
   काही नाही ....तुझ काय म्हणतय?? अभ्यास वगरे ठीक ना..???..
   हो आई..एकदम मजेत...आता quizes सुरु होतील..
   बर..मी उद्या मुंबईला येतीये..तू किती वाजता सुटशील कॉलेजमधून??
   मी ५ वाजेपर्यंत सुटीन..तू कसकाय येतीयेस मुंबईला?? i mean काही विशेष काम??
   अरे बाबांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे..आमी दोघही येतोय...आणि आताच सांगतीये तू पण येणारेस   
   लग्नाला..
   मी...आणि लग्नाला..common mom..."
   मी कितीही नाही म्हणलं तरी शेवटी मी लग्नाला गेलोच....कारण ती माझ्या आईची ओर्डर होती...लग्न  
   बोरीवली ला होतं ...आम्ही सकाळीच ट्रेननी गेलो....कार्यालय सुंदर सजवलं होतं..hall तर खूपच चं छान decorate  केला होता...गेल्यागेल्या प्रत्येकाला गुलाबाचा फुल आणि पेढा देयला ४ सुंदर तरुणी होत्या...त्यांच्याकडून गुलाबाचं फुल घेयला मजा येत होती...इकडे आई एकदम पेटलीच होती...माझ्याबद्दल तिला कोणी विचारलं कि ती सुरु करायची...खूप हुशार आहे माझा मुलगा..IIT मुंबई मध्ये शिकतोय...खूप अभ्यासू आणि महिनाती आहे etc etc इकडे सकाळपासून नेहानी ४ फोन केले होते...आणि मी एकालाही उत्तर देऊ शकलो नव्हतो....
        मी cut केला तरी पुन्हा पुन्हा फोन करत होती....शेवटी मी फोन उचलला...नेहानी धडधड firing सुरु केलं.....मी तिला शांत करण्यासाठी जोरात ओरडलो....ती काही शांत झाली नाही उलट मीच पेचात सापडलो...तेव्हड्यात आईने हाक मारली...मी तुला नंतर call करतो असं सांगून  फोन cut केला...आईकडे धावत गेलो....तिने मला त्या बाबांच्या मित्राच्या मुलीशी ओळख करून घेयला बोलावलं होता...माझ्या बद्दल खूप सारं कौतुक तिने त्या मुलीला आणि तिच्या आईला सांगितलं होतं ...मी तिथे गेलो...आईने माझी ओळख करून दिली...
            " समीर, हि दीप्ती ....साने काकांची मुलगी...b -tech करतीये  COEP मधून...
               आणि दीप्ती हा माझा मुलगा समीर....mtech करतोय IIT पोवई मधून.....तुम्ही आता गप्पा मारा मी  येते जरा बाकीच्यांशी बोलून."....असं म्हणून आई निघून गेली...बराचवेळ झाला आम्ही दोघही काही बोललो नाही....आणि एकदम ती म्हणाली.....तू कविता करतोस असं ऐकलं? ऐकव ना एखादी...मलापण मराठी कविता खूप आवडतात...मी म्हणल हो का? आग पण आता इथे कुठे...लग्न आहे ना तुझ्या भावाचं....तुला कामं असतील...निवांत ये...कधी घरी मी नक्की ऐकवीन...ती म्हणाली एखादी तरी ऐकवच..आता आजून खूप वेळ आहे आणि मला तसाही तिकडे खूप bore होत.....मी म्हणल ठीक आहे.....मला आठवायला लागेल.....
            'केविलवाण्या आठवणी,अन केविलवाणे क्षण 
             मोहर्णारी तू जणू , बनते श्रावणातील सण 
तेवढ्यात तिला कोणीतरी आवाज दिला....आणि दारात उभ्या असलेल्या मुलाच्या आत्या मला म्हणाल्या...लग्न घरात न फक्त उखाणे घेतात कविता वगरे नसतात बर.....मी चटकन आवरतं घेतलं  ....तिथून बाहेर पडलो....आई बाबा busy  आहेत हे पाहून नेहाला फोन केला...तिला सगळं सांगितलं..आणि मग लग्न लाऊन आम्ही तिघेही घरी परतलो...आल्यवर हातपाय धुतले...नेहमीप्रमाणे..मी आवरलं...आई आली...म्हणाली कशी वाटली दीप्ती? चांगली मुलगी आहे संस्कारी आहे...हो ना?? मी म्हणाला हो....आईच्या डोक्यात शिजणार्या खिचडीचा अंदाज मी घेतला आणि लवकरच नेहाबद्दल तिला सांगून टाकायचं असं ठरवलं               

Friday, May 6, 2011

गोष्ट लोकलमधली-११

 दुसर्या दिवशी रात्री १०:३० ची वेळ होती...नेहाचा msg आला...."आता marine drive ला ये...urgently ...."....मी लगेच तिला call लावला...पण ती सारखा फोन cut करत होती...मला अजूनच काळजी वाटायला लागली...एकतर एवढ्या रात्री marine drivela हि एकटी काय करतीये??? आणि...msg पण असा केलाय कि त्यातून काहीच कळत नाहीये...आणि फोन पण उचलत नाहीये....मी ताबडतोब आवरलं...स्टेशन गाठलं....आणि ट्रेन मध्ये बसलो...मी सारखा नेहाला फोन try करत होतो..ती काहीकेल्या उचलत नव्हती...मला प्रश्न पडला कि मी तिथे पोचल्यावर तरी तिला कसा शोधणारे...???...तेव्हा मी तिला msg केला..."r u ok ?.....atleast तू कुठे आहेस ते तरी सांग...??..आणि तू फोन का नाही उचलतेस..??" १० मिनिटांनी तिचा reply आला..."तू कुठे आहेस...पटकन ये...मी marine lines स्टेशनच्या बाहेर आहे.."तेव्हा grant road स्टेशन आलं होत...मी marine lines ला उतरलो...घाईघाईने बाहेर आलो....नेहा काही बाहेर दिसली नाही....मी आणखीनच घाबरलो...पुन्हा तिला call केला...तिने तो उचलला....
"अग कुठे आहेस तू..?? हे काय चाललाय तुझं?? नीट
सांग काय झालय ते..??....."....
" तू कुठे आलायेस ते सांग आधी...."...
"मी आता स्टेशनवर पोहोचलोय "    
"अरे मग रस्ता क्रॉस करून ये...मी तुझी वाट पहातीये..???"
मी पटकन रस्ता क्रॉस केला...नेहा समुद्राकडे पाहत उभी होती....मी लगबगीने तिच्याकडे गेलो...क्षणभर मला काहीच कळेना....नेहा खूपच सुंदर दिसत होती....तिने लाल रंगाचा पंजाबी suit घातला होता..केस साजेश्या पण वेगळ्याच पद्धतीने बांधले होते...चार बटा...बरोबर डोळ्याच्या बाजूला येत होत्या...कानात झुमके घातले होते...हातात एक ब्रेसलेट घातलं होत.....मला वाटलं कुठेतरी जाऊन आली असेल ती...मी तसाच थांबलो दोन मिनिटं....तिच्याकडे मनसोक्त बघून घेतलं...मग तिच्याशी बोलायला पुढे गेलो तोच ती समोर आली...माझ्या ओठांवर...बोट ठेवलं....माझा हात हातात घेतला...आणि बोलायला सुरुवात केली...
" समीर, मला तुला काही सांगायचं, काही विचारायचं आणि काहीतरी मागायचय.....पण आधी मी सांगते...मला काही फार romantic वगरे होता येत नाही...आणि मला फारसं नटता पण येत नाही...असो..तुझा कालचा blog update वाचला...खूप सुंदर कविता लिह्लीयेस तू...त्यात तू एक stanza लिहलायेस....तिने डोळे मिटले आणि ते कडवं म्हणायला सुरवात केली...
                 "हुरहुरणाऱ्या क्षनान्मधली  आस
                   नसता असता होणारा ग भास
               तू.... असण्यात  तू......तू.....नसण्यात  तू......
               तू.....श्वासात तू.... तू...सगळ्यात तू......"
खरच समीर....i love u .... !!!!!!!!!.".....मला क्षणभर सगळं स्वप्नासारखच वाटत होतं...
काही कळायच्या आत...मीपण तिला i love u too म्हणल....सगळं जग जिंकल्यासारख  वाटत होतं...मनावरचं खूप मोठं दडपण गेल्यासारखं वाटत होतं...कारण....नेहा...मी...marin drive .......आणि ती कविता...सगळं तेच होतं...पण जणू...नवा रंग हरेक गोष्टीला आला होता....ज्या काही गोष्टी आजवर ...माझ्या होत्या त्या सगळ्या आता आपल्या झाल्या होत्या...एक आर्थी...मी world cup semifinal जिंकलो होतो...त्या दिवशी marine drive ने मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात beautiful आणि मोठं गिफ्ट दिलं होतं....त्यारात्री...सगळ्या आनंदात...आंम्ही naturalcha ....ice -cream खाल्लं....तिला घरी सोडून मी पण घरी परत आलो...मला कधी एकदा त्या लोकलला thnx म्हणतोय असं झाला होतं....

Wednesday, May 4, 2011

गोष्ट लोकॅलमधली-१०

 "सावरे सावरे...सावरे...
तेरे बिन सुनी सुनी हैन अखिया 
तेरे बिन लम्हा लम्हा हैन सादिया 
सुना सुना जहान लागे रे........सावरे...."

हे गाणं मी मोठ्या आवाजात laptop वर लावलं होतं.....डोळे मिटून शांतपणे ऐकत होतो...तेवढ्यात नेहाचा फोन आला .....ती नेहमीप्रमाणे बोलत नव्हती.....काहीतरी वेगळं तिच्या डोक्यात चालू होतं...."मी म्हणल काय झालय नेहा...काही प्रोब्लेम..??" नाही रे...असच बोर होत होतं सो call केला..मला सांग ना mtech ला तुझ्याबरोबर कोण कोण आहे...तुझे best frnds कोण आहेत.."
"hmmm ......रोहित,राकेश are my best buddies...आम्ही एकूण २० लोक आहोत .....का ग एकदम असा विचार्तीयेस आज ?"
"काही नाही रे....सहज...कोणी मुली नाहीत तुमच्याबरोबर??...."
"heehehe ...आहेत ना.....चांगल्या दिसणाऱ्या मुली आहेत..."
"हो का..?? मग तुझी असेलच कोणीतरी best frnd ..."
"हो मग आहे ना....प्रिया.....माझी batchmate आहे....खूप हुशार आहे...आणि दिसायला पण छान आहे.."
"hey समीर उद्या मला IITB ला येयचाय..मला तुझ्या frndsla  भेटायचंय...परत एकदा IIT  atmosphere experiance करायचंय... नेशील ना मला..???"
"हो नक्की नेईन कि...उद्या भेटू...दादरला नेहमीप्रमाणे...मग तूला direct IITB लाच नेतो..."
आता झोप शांत...चल bye ...."
दुसर्यादिवशी नेहमीप्रमाणे...दादरला भेटलो....ट्रेन गाठली...जागा मिळाली...पण नेहा खूपच शांत होती...तेवढ्यात मला msg आला....mobile नेहाकडे होतं...ती काही गाणी transfer करून घेत होती..त्यात लिहिलं होतं ....
"यार तुमने वोह D&K का assignment किया क्या?" आज discuss करते हैन...." नेहाने ताबडतोब mobile मला दिला...म्हणाली private msg आलाय....मी म्हणलं कुणाचा आहे म्हणून पाहिलं तर प्रियाचा...तिला reply केला "आज नही कल करेंगे....."
IIT मध्ये पोचलो...मी कुणालाच सांगितलं नव्हतं नेहा येणारे...मी गुल्मोहरला गेलो..तिथून सगळ्यांना call केला...सगळे आले..मेहाला भेटले...नेहा  सगळ्यांशी हसून बोलली वगरे...जाताना म्हणाली...अरे प्रिया कोण आहे..ती आली नाही..?? मला भेटायचंय तिला...मी तिला बोलवल ....ती आली...त्या भेटल्या...बराचवेळ बोलत होत्या..नेहा half day सांगून आली होती...सो तिला म्हणलं चल आता उशीर होईल...आम्ही निघालो...
गोष्ट काहीतरी वेगळच वळण घेतीये असं वाटायला लागलं.....दोन अतिशय भिन्न स्वभावाच्या मुली..इतकावेळ...हसत खेळत गप्पा मारत होत्या...मला जरा गम्मतच वाटली..त्या दिवशी..रात्री मी नेहाला call केला..
" hi ...काय चाललाय?? 
   कसे वाटले आमचे मित्र मैत्रिणी..??"
छान मस्त...मज्जा आली खूप... 
प्रीयापण मस्त आहे रे....बोलकी आहे...आणि खरच तू म्हणाला तसं... हुशार आहे...पण दिसायला मात्र बरी आहे बरका.,.."
"बर बर ....तू म्हणशील तसं....पण प्रीयापण मला हेच म्हणली..कि नेहा खूप हुशार आहे....even राकेश तर म्हणला..कसली आहे रे ती पोरगी...smart beautiful आणि simple ....कुठे भेटली...etcetc " 
हे ऐकून नेहा खुश झाली..पण खरच मित्रांना नेहा खूप आवडली होती....एक परीक्षा ती १००% गुणांनी पास झाली होती....