Saturday, December 31, 2011

सौनिक-१६

पूर्वार्ध
मी निधीला फोन केला ...
"सौनिक??? हे काय आहे???...ह्याचा काय आर्थ आहे???....
काय रे तुला सगळ सांगावं लागतं.....सगळ मीच सांगायचं.....जरा तू डोक लाव ना काहीतरी....
अरे तू अशी शब्दकोडी घालणार आणि ती मी सोडवत बसायची का निधी?? आणि ह्यात डोक लावण्यासारख काय आहे..??
काही नाही.....मी आता ह्यापुढे काहीही सांगणार नाही...मी एवढं भारी गिफ्ट दिलंय आणि तू त्याला शब्दकोडं म्हणतोयेस??
अरे....निधी हे बघ...मला सांग तरी...मी खरच खूप उत्सुक आहे ग
तुला एकच सांगते आत्ता .....सौनिक हे माझ स्वप्न आहे....ज्यात तू आहेस....मी आहे....आपली कुटुंब आहेत...हि गल्ली आहे....हे शहर आहे.....आणि आपली लगोरी आहे....
काये राव....तू न नुसता गुंता वाढव्तीयेस...निधी....
नाही...तू गुंता करून घेतोयेस...
दे सोडून तू काही ऐकायची नाहीस...."
"रोहित...."तेव्हढ्यात आईने आवाज दिला..
"चल फोन ठेवतो....भेटूयात उद्या लागोरीच्या इथे....
hey रोहित....
काय?
काही नाही.....बोलू नंतर..."असं म्हणून तिने फोन ठेऊन दिला...
हि निधीपण ना एकदम विचित्र आहे.....स्वप्न बघते, त्यात मी पण असतो पण ते मलाच सांगत नाही...असं म्हणून मी स्वयम्पाघरात गेलो...
"रोहित....काय हे..? काय करत होतास?? किती हाका मारायच्या तुला?? काय करत होतास??
काही नाही गुंता सोडवायचा प्रयत्न करत होतो...सुटतच नाहीये...??
काय?? कसला गुंता??
मला एकदम लक्षात आल....मी म्हणल
"आग आई..त्या माझ्या headphonesचा गुंता झाला होता ना तो सोडवत होतो.."
असं म्हणून मी उत्तर दिल खर....पण एकाचवेळी इतक्या साऱ्या गुंत्यांमध्ये आडकल्यावर किती सोडवायचे आणि किती नाही हेच काळात नव्हत......

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!! (Happy New Year!!!)

Thanks to MOM and DAD for taking me one step up as always.....Thanks to IITB for taking my carrier one step up.....Thanks to all my blog readers to take a writer in me one step up!!! and at last.....Thanks to all my Dear friends for taking one more year up with me.....and Happy New Year to all of you and May GOD Fulfill all your wishes in coming 2012...!!!!!........!!!!
Saurabh Nene

Thursday, December 29, 2011

सौनिक-१५

पूर्वार्ध 
शेवटी मी फोन लावायचं बंद केलं....पलंग वगरे आवरला ...आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो.....पण काही केल्या झोप लागेना....सारखा एकच प्रश्न डोक्यात येत होता.....त्या शब्दाचा अर्थ काय असेल...मी मोबाईल घेतला .....message type करू लागलो...परत मनात विचार आला...उगीच कशाला आता message करायचा...म्हणून परत ठेवून दिला....असच मोबाईलची घे ठेव करण्यातच मला झोप लागली....
दुसऱ्यादिवशी.....सकाळी....लवकर उठलो....पटकन आवरल.....शाळेत जायचं होत....तरी काही डोक्यातून तो शब्द जात नव्हता.... तेव्हढ्यात फोन वाजला....आशिष (ढोल्याचा) फोन होता......मी घेतला...
"अबे ढोल्या?? काल मेला होतास का??....कुठे जाऊन पडतोस रे रात्री..??
  अरे....झोपून गेलो लवकर....फोन ऐकूच आला नाही...तू बोल....काय म्हणत होतास??
   साहेब...आपण कोणाला माझा नंबर दिलात??.....इतक कोणावर मेहरबान झालात??
   मी?? कोणाला दिला नंबर ?? मी दिला आणि मलाच माहित नाही??  by the way रोहीत्या....कोणाचा फोन आला?? तो होता की ती..?? आणि मला पण ओळखते म्हणजे ती व्यक्ती??...अबे बोल ना ??आता काय झाल...????
अबे ढोल्या?? रात्री बोलुयात....आता शाळा गाठायची आहे..." असं म्हणून मी फोन बंद केला....शाळा गाठली....आमच्या शाळेत नुकत्याच नवीन मिस जर्मन शिकवायला join झाल्या होत्या....मनात एकदा आल....सरळ जाव आणि त्यांना तो शब्द काय आहे विचारावा...पण...म्हणल....उगच काही प्रेमाचा वगरे शब्द असला तर माझी घुसायची....त्याचं माझ्याबद्दलच मत तर बदलेलच आणि त्या इतरांना सांगतील ते वेगळच...म्हणून मी तो विचार तिथेच थांबवला....पण काहीकेल्या तो शब्द माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता...
शाळा सुटल्यावर लगेच मी घरी आलो....हातपाय धुतले....शाळेचा अभ्यास पटकन करून टाकला....आणि  निधीला message केला...
' hey hi..!...how are u?? tu mala tya wordcha meaning ka nahi sangat aahes?? aata sangun taak bar...
mi tula meaning nahi sangnar....tyacha fakta english parallel word sangin..??
kaay??
SauNik..
wat??
its 'Saunik'

Tuesday, December 27, 2011

सौनिक-१४

पूर्वाध 
मी परत ते ग्रीटिंग काढल...त्याच्या मागच्या बाजूला पाहिलं....निधीन कुठे काय लिहल आहे ते शोधू लागलो....तेवढयात परत beep beep असा आवाज आला...मी त्याकडे दुर्लक्ष केलं.....आणि परत ग्रीटिंग कडे वळलो....तेव्हढ्यात त्या ग्रीटिंगच्या मागच्या बाजूला इंग्लिश सारख्याच वाटणाऱ्या भाषेत काहीतरी लिहल होत...मला काहीच कळल नाही...मी निधीला message करण्यासाठी फोन घेतला....त्यावर एक message already आला होता
'hey Rohit,
a very happy birthday to you..!!! i wanted to meet you! we had not met from long time...!!!....hope u remember me....!!! please dont feel bad since i have taken your number from Ashish....!!! At first he was not giving but later on he has given.....so...when r you meeting me..??? reply'
मला एकदम कळेच ना की कोणी message केला आहे....पण त्यावेळी मी त्या ग्रीटिंग मध्ये जास्त interested होतो....सो मी त्याकडे जरावेळ दुर्लक्ष केलं...आणि सरळ निधीला message केला....
' are he kaay lihala aahes tu greetingchya maagchya baajula??
तिने reply केला
te german madhe lihlay!!!
ho ka?? pan aata mala kasa kalnar he?? tyacha aarth sangushakal ka aapan jara??
nahi.....but thts a real gift to you from meee...!!!!
you mean that word??? .....which is for now meaningless to me..??
yeah sir..that word...now mom is calling for dinner so have a good nite and sweet dreams..
are nidhi???sangtari tyacha aarth kaay aahe to??
बाराच वेळ झाला...काहीच reply आला नाही.....शेवटी मी पण त्या ग्रीटिंग मधून बाहेर आलो....आईने आत्तापर्यंत १०-१२ हाका मारल्या होत्या...मी लगेच धावत गेलो...आईने मला जेवणाची तयारी करायला सांगितली...ताट वगरे घेयला सांगितली....मी तोपर्यंत त्या unknown message बद्दल पूर्णपणे विसरलो होतो...जेवण वगरे झाली....मी थोड्यावेळ TV पहिला बसणार तोच पुन्हा beep beep असा आवाज झाला...
परत message आला होता...from the same unkown number!!!!,
'hey......u r rude dude.....!!!'
मग मला tube पेटली....कोणाचा number आहे हा हे शोधून काढण्यासाठी मी आशिषला फोन लावला .....नेमका busy येत होता....आता ह्या जाड्या ढोल्यानी काय गोंधळ घातलाय असं मी मनाशी म्हणल...आणि पुन्हा पुन्हा त्याला  फोन लावयचा try करू लागलो ......


Friday, December 23, 2011

सौनिक-१३

पूर्वार्ध
मी लगबगीने घरी आलो....बेल वाजवली.....बाबांनी दार उघडल.....माझ्या हातातलं एवढं मोठ ग्रीटिंग पाहून त्यांनी सहाजीकच मला विचारल....
"काय रे....कोणी दिलंय हे ग्रीटिंग....
बाबा....मित्रांनी दिलंय ...खूप मोठ आहे न.....
बघू बर मला....काय लिहलय .....
(झाली का पंचाईत...आता काय सांगायच??....)
बाबा उघडू नंतर....आता मला खूप भूक लागलीये....स्वयंपाक झाला असेल न आईचा" ....(असं म्हणून मी विषय लगेच बदलून टाकला....आणि पटकन माझ्या खोलीत गेलो....).
मी  खोलीत आलो.....ते ग्रीटिंग पाकिटातून बाहेर काढल....त्यात लिहाल होत..
'प्रिय रोहित,
                 तू ना मला त्या tan theta सारखा वाटतोस..की ज्यामध्ये sin आणि cos दोन्ही सामावलेले आहेत....बघ मला कळलंय की नाही trigonometry....!!!! hehehhe!!!!आपली मैत्री अगदी तशीच रचली गेली  आहे जशी आपण लगोरी रचत जातो जिंकण्यासाठी....रोहित तू खरच खूप छान लिहतोस...तू खरच खूप छान बोलतोस...आणि अगदी आवडीने कसाटा ice-cream खातोस...आपली हि मैत्री अशीच राहू दे.....तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊदेत......तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....आणि thanks for that चारोळी.....hope u keep writing for me the same way....!!!!! a very Happy Birthday again....

                                                                                                                                                     निधी'

मी ते ग्रीटिंग नीट उचलून ठेवून दिल...मला माहित नाही ते वाचून मला फारसा आनंद झाला नव्हता ...पण मी निधीला मेसेज करून टाकला ...
'hey...thanks for your lovely gift.....keep gifting me.....'
 त्यावर तिचा reply आला
'तू ग्रीटिंगच्या  मागच्या पानावरच वाचलस का??'
नाही...मागे पण काही लिहलं आहेस?
हो.....त्याआधीच तू lovely...गिफ्ट म्हणून मोकळा झालास..
बर्र बघतो मी.....पण मला तू सांगितला नाहीस तू चारोळी कुणासाठी लिहून घेतली ते..??
सांगीन तुला....नक्की....चल bye....gnite...sd..

Wednesday, December 21, 2011

Thanks to All of You!!!!!!

200 pageviews in a day....I am very happy....Its a very encouraging thing for a new blogger like me....Thanks to all my dear readers.....you all made me what I am...!!!.......Keep reading and enjoying....!!!!!!!!

Saurabh Nene

Monday, December 19, 2011

सौनिक-१२

पूर्वार्ध
संध्याकाळ झाली होती...दादानी blackforest cake आणला होता...आईने तो केक box मधून काढून तो बाहेर  घेऊन आली....आजी, बाबा , दादा , आई आणि मी सगळे hall मध्ये जमलो....मी cake कापला.....दादानी फोटो काढले .....आजीने मला खूप मोठा केकचा घास भरवला .....सगळ अगदी मनासारख होत..फक्त एक गोष्ट सोडून....निधिनी आजून मला wish केल नव्हत....मी आईला म्हणल....
"आई मी जरा खाली जाऊन येतो...
लवकर ये रे...!!
हो आई...असं म्हणून मी खाली आलो....आज नेमका रविवार असल्याने सगळे लोक कुठे न कुठे बाहेर गेले होते....निधीच्या पण घरचे पडदे बंदच होते....ते पाहून मी ते बाहेर गेले आहेत असा अंदाज बांधला...तेवढयात मला mobileवर एक message आला ......
"A very happy birthday to u..!!!...May God bless you always and give you what u deserve and desire in life...i m waiting with your gift in Ice-cream shop...do come !!!
yours,
Nidhi"
मी त्याचक्षणी निघालो ...त्या दुकानाच्या जवळ आलो...निधी मला दुरूनच दिसत होती....तिने आज गुलबक्षी रंगाची सलवार कमीझ घातली होती...कानात त्याच रंगाचे खडे असणारे कानातले घातले होते...केसाची एक बट  हळूच डोळ्यावर येत होती....ती हळूच ती मागे सरकवत होती...एकंदरीत काय तर ती.....खुपच सुंदर दिसत होती.... मी तिला आवाज दिला.....
"निधी...."
तिच्या हातात मोठ ग्रीटिंग होत...तिने आधीच कसाटा ice-cream मागवून ठेवलं होत.....आयुष्यात पहिल्यांदाच कसाटा कापून वाढदिवस साजरा करणार होतो....तिने सगळी तयारी केलीच होती .....आधी आम्ही कसाटा कापल.....निधिनी मला त्यातला एक घास भरवला .....नंतर तिने मला ते ग्रीटिंग दिल .....मला म्हणाली.....घरी जाऊन वाच.... इथे नाही....मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि..मग ती मला म्हणाली...
"चल आता निघाल पाहिजे....आईला मी सांगितलंय मी दळण घेऊन येते....
काय?? एवढ सजून वगरे तू दळण आणायला जातेस असं सांगितलस??....वेडी आहेस का??
अरे आई कपडे बदलायला खोलीत गेली होती....तिने कुठे पाहिलंय मला तयार झालेलं.....सो पटकन सागून आले.......
पण आता गेल्यावर कळेलच ना
नाही
कसकाय?
कारण घरी कोणीच नसेल.....
ok....मग काय घाई आहे..हे ग्रीटिंग इथेच वाचुयात ना ....
नको....सांगितलं न की तू घरी वाच.....
बर , पण मोकळे केस खरच छान दिसतायेत तुला....निधी.....
हम्म्म्म  .....म्हणल होत ना तुला next time म्हणून....
ह्म्म्म...आज खरच खूप छान दिस्तीयेस तू.....
तू पण....पण तू चष्म्याऐवजी lenses का नाही try करत...
बर नक्की next time.....
असं म्हणून आम्ही निघालो....पौर्णिमेचा चंद्र टवकारून आमच्या कडे बघत होता....आणि म्हणत होता....
"वाढदिवस असावा तर असा "!!!!

Thursday, December 15, 2011

सौनिक-११

पूर्वार्ध 
अलार्म वाजला....सकाळचे ७ वाजले होते....इतक्या सकाळचा अलार्म कोणी लावला होता काय माहित...???....कारण त्यादिवशी रविवार होता....म्हणून मी अलार्म लावला नव्हता हे नक्की .....तेव्हड्यात आई आली......माझ्या कपाळावर हात फिरवत म्हणाली....
"किती लवकर मोठा झालास रे मन्या ....असं वाटतंय कालचीच गोष्ट आहे की मी तुला चांदोबाची गोष्ट सांगत सांगत जेवायला घालायची.....हात धरून शाळेत सोडायला यायची....."असं म्हणता म्हणता दोन थेंब हळूच तिच्या डोळ्यातून ठीबकले आणि माझ्या गालावर पडले....मी आईला म्हणल...
"आई....असच डोक्यावर हात फिरवत बस न.....सगळ tension पळून गेल्यासारख वाटतं" पण आज आहे काय?? आणि हो हा अलार्म कोणी लावलाय??? मी आज उशिरा उठतो न आई.....तुला माहिती आहे ना?
तेव्हढ्यात आजी आली आणि म्हणाली...happy birthday!!!!.....बघ मी तुझ्यासाठी तुझा आवडता बदामाचा शिरा  केलाय...चल उठ पटकन ....दात घास......
बदमाचा शिरा .....असं म्हणून मी ताडकन उठलो...आजीला घट्ट मिठी मारली...आणि म्हणल 
"Thank you आजी...."
मी पटकन तोंड धुतल....आजीने केलेला शिरा खाल्ला ....तेवढयात बाबा आले.....फिरून येतानाच त्यांनी..माझ्यासाठी मला खूप आवडते म्हणून जिलबी आणली.....त्यांना बहुदा शिऱ्याचा बेत माहित नसावा म्हणून त्यांनी आणली....मी पटकन आंघोळ वगरे उरकून घेतली...आईने मग औक्षणाची तयारी केली....सगळीकडे कसं आनंदायी वातावरण होत... सगळ आटोपताच मी ...galleryt गेलो...चहुकडे पाहून शेवटी एका galleryकडे पाहत स्थिरावलो ....दरवाजा बंद होता...पण खिडकीचे पडदे लावलेले नव्हते म्हणजे सगळे घरीच होते....असा  मी अंदाज बांधला....तेवढयात खिडकीचे पडदे लागले.....मी तरी तसाच उभा राहिलो....बराच वेळ वाट पहिल्या नंतर वाटल .....बहुदा गेले सगळे बाहेर....म्हणून मी मागे वळतो तोच दराचा किर्रर्र असा आवाज झाला...."हो आई...कपडे सगळे आत आणलेत तेच पहायला मी दार उघडल"....अस म्हणत ती बाहेर आली.....!!!!!

Sunday, December 11, 2011

आज जाने की जिद ना करो...(my version)

आज जाने की जिद ना करो...
युही बाहोंमे सिमटी रहो ....आज...

ना तो जी पायेंगे, ना तो मर पायेंगे
ऐसी आहें भरा ना करो ......आज .....


ये झुकी सी नजर , केसुओ का ये घर
जीने दो इन घटाओं मे अब हमनवा
राहे है जुड गयी...... जानेजां 
पोछदो इन डरी आंखोको.....आज.....


वक्त है थम गया , बहोत कुछ केह गया
जो बचा है उसे केह भी दो तुम जरा ....
सांसे अब है रुकी...... जानेजां....
छुने दो इन हसी होटोको .....
आज जाने की जिद ना करो.....

Friday, December 9, 2011

सौनिक-१०

पूर्वार्ध 
"निधी , ए निधी....तुझा मित्र आलाय गं तुला भेटायला.....
आले बाबा ....त्याला बसायला सांगा...
मी तसाच बाहेर दारात उभा होतो....काका आले...म्हणाले...
"अरे आत ये न...आणि बस...तुला पाणी हवय??, धावत आलास की काय..?? ,इतका घाम का आलाय ??"
तेव्हढ्यात निधी आली..."अरे रोहित..आता इथे?? काही काम होत का??"
निधीला night dress मध्ये प्रथमच पाहत होतो...गुलाबी रंगाचा nity, केसाला गुलाबी रंगाचाच bow, मी तिच्याकडेच पाहत बसलो.....तेवढयात घड्याळाचे ८ वाजल्याचे टोल पडले....मी एकदम दचकलो....
"काय म्हणलीस निधी??",
काही नाही....आपण आत जाऊन बोलुयात ....म्हणून ती मला आत घेऊन गेली.....मी जाताना काकांना bye म्हणल पण ते पेपर वाचण्यात गुंग झाले होते...
"काय काम आहे रोहित???"
अग काही नाही....तुला चारोळी देयला आलो होतो .....झाली लिहून....
हो का? अरे वां....बघू.....मला....म्हणून तिने माझ्या हातातली चिट्ठी घेतली......ती उघडून चटकन तिने ती चारोळी वाचली...." आणि एकदम म्हणाली....."बिंगो , काय अगदी माझ्या मनातलं लिह्लयेस...." thanks yaar....
तिला खुश झालेलं पाहून मी पण खूप खुश झालो....उशीर झाला होता सो मी निघालो ....
घरी आलो...तोच चप्पल काढतानाच...आजीने विचारल काय?? दिलास का गुत्छ ....??? 
तेवढयात आई म्हणाली गुत्छ???कसला गुत्छ?? कोणाला दिलास..??
आजी म्हणाली....हे आमच्यातल गुपित आहे..तुला वेळ आली की सांगीन मी.....??
नाही आजी...मी गुत्छ वगरे काही दिला नाही....खेलायला गेलो होतो....तुला उगाच काहीतरी वाटतय .....आजीच्या ह्या संशयाच्या बिला रोप फुटण्याआधीच मला ते छाटून टाकण गरजेच आहे हे माझ्या लक्षात आल....