Wednesday, March 16, 2011

रे सख्या....

रे सख्या सांग ना,आहे का ती तशीच
कळी मनातली, धून ओठातली
तिच्याही डोळ्यात आहे का रे तो माझाच भास
आहे का रे तिच्याही मनात भेटण्याची आस  

रे सख्या सांग ना, ती तशीच येते का आजून नटून
तशीच पडते का रे तिला लाजरी खळी हासताना
 तसेच का नाक तिचे लाल होते रडताना
आहे का रे ती माझ्याशिवाय खरच उदास
सांग ना..

 रे सख्या सांग ना, ती हिरवळ आहे का तशीच
तो कट्टा आजून आहे का तसाच मोहरलेला
आजून जमतात का सगळे पाऊस पडताना
ती शोधते का तेव्हा मला आसपास
सांग ना.....

रे सख्या सांग ना, तिने सारे ते क्षण ठेवलेत का जपून
भेटेल का ती मला पुन्हा आलो तर हासून
ती ऐकेल का सगळ हातात हात घेऊन
तेव्हा टिपशील का रे तो क्षण खास
सांग ना.......

                                                 - सौरभ नेने

Monday, March 14, 2011

माझ्या लिखाणाबद्दल..

नमस्कार मित्रानो,

                           अनेक माझे मित्र मला नेहमी विचारतात, तू कविता करतोस, चांगल्या करतोस, पण काश्याकाय सुचतात युला ह्या कविता....माझं आपलं एकच ठरलेलं उत्तर, सुचतात अश्याच......मित्रानो कवितांचं आसच आहे....त्याला का हा प्रश्न सहसा विचारता येत नाही....अस मला वाटतं, मी माझ्या ८ वी पासून कविता करायला लागलो...पहिले मी आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे आई....वर कविता केली...जस जस आपलं वय वाढत जात तसतसं कवितांचं वयपण वाढत जात...आपल्या आयुष्यातील महत्वाचे विषय बदलतात तसच कवितांचेपण विषय बदलत जातात.....कविता सुचणं ह्याला नशीब लागतं आणि त्या लोकांना आवडणं ह्याला अजूनच नशीब लागतं...मला माहित नाही मी का आणि किती कविता लिहणार आहे...पण एक गोष्ट नक्की....त्या माझ्या जीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत...मित्रानो तुम्हाला माझ्या कविता कश्या वाटतात  हे नक्की सांगा...कारण दाद हिच कवितेला पूर्ण करते....

                                                                                                                                         सौरभ नेने 

Sunday, March 13, 2011

कधी....


 कधी....

पाण्यासही भिजण्याची गरज भासेल कधी
आगीसही जळण्याची गरज भासेल कधी
मनातल्या व्यथानाही दुख होत असेल
त्यांनाही सुखाची गरज भासेल कधी  

विजेलाही सौम्यतेची गरज भासेल कधी
वादळास शांततेची गरज भासेल कधी
डोळ्यातील स्वप्नांनाही रडू येत असेल
त्यांनाही पूर्णत्वाची गरज भासेल कधी

एकेका शब्दाला अर्थाची गरज असते
हुरहुरत्या सांजेला रात्रीची आस असते
मैत्री करणे एखाद्याला जरी जमत नसेल
उन्हाला सावलीची गरज भासेलच कधी

त्याच त्याच रंगांचा वीट आला आहे
सारया त्या गीतांचा अर्थ एकाच आहे
" फुल बनणे आयुष्यात जरी जमणार नसेल
एक कळी नक्कीच दारी उमलून येईल कधी"

कोरड्या त्या आकाशात ढग येतील कधी
हृदयाच्या एका कोपरयात धकधक होईल कधी
पाऊस भले तेव्हा जरी पडणार नसेल
तुझे अंग आठवणींनी चिंब होईल कधी

निरसतेचे जगणे हे मला बोचते आहे
नात्यातले गुंतणे हे मला खुपते आहे
आदेश्यांच्या वणव्यात जरी मी जळत असेल
एक नाजूक फुंकर बनून तरी  तू येशील कधी....
                                                             सौरभ नेने