Saturday, November 26, 2011

सौनिक-९

पूर्वार्ध 
अखेर मला ती चारोळी सुचली....मी पटकन कागद घेतला....ती लिहून काढली ....
"मैत्रीच्या फुलांनी, चार ह्या शब्दांनी 
शुभेच्छांची परडी, तुला देत आहे
कुठल्याही दिशेला, तू आडखळलीस जरीही
माझी ही मैत्री, तुझ्या साथ आहे ! "
  
त्याचक्षणी निधीला फोन लावला....पण तो काकूंनी उचलला....
"हेलो , काकू....निधी आहे? मी रोहित बोलतोय...
अरे रोहित बोल....अरे निधी ना जरा बाहेर गेलीये...नाहीये आत्ता...काही काम होत का??.
नाही तस महत्वाच काही काम नव्हत पण तिला आल्यावर please फोन करायला सांगाल का?
हो नक्की सांगते..."
मी फोन ठेवला....मी एक स्वत्छ कागद घेतला...त्यावर सुंदर अक्षरात ती चारोळी लिहली....आणि माझ्या drawer मध्ये तो कागद नीट ठेवून दिला....आणि अभ्यासाला बसलो...
              ५ वाजले होते....सगळे खेळायला येयची वेळ झाली होती.....म्हणून मी घाईघाईने drawer कडे गेलो...तो कागद पटकन घेतला...आणि पळत पळत बाहेर आलो....तेवढयात आजी म्हणाली....
"आरे रोहित...कधी येशील परत....
आजी, येयीन ७ वाजेपर्यंत....
आणि हे काय?? नुसता कागदच देणारेस....? फुलांची परडी कुठे आहे?
काय?? परडी?...मी काही न कळल्यासारख म्हणालो...आणि पटकन माझ्या डोक्यात tube पेटली ...मी त्या चारोळीत फुलांच्या परडीबद्दल लिहल होत....पण हे आजीला कसं कळल..??....मला काही कळल नाही आजी...मी म्हणल
अरे  काही नाही गम्मत केली....जां तू.....पण लवकर ये...."
आजीने तो कागद वाचला होता...त्यावर नाव लिह्लच नव्हत मी....त्यामुळे मी जरा निर्धास्त होतो....पण आजीच्या डोक्यात डाळ शिजायला सुरुवात झाली होती...आणि मला शिट्टी व्हायच्या आत gas बंद करण आवश्यक आहे हे माझ्या लक्षात आल...पण तेव्हा मी तसाच तिथून खेळायला निघून गेलो.... पण त्यादिवशी काय माहित निधी आलीच नाही खेळायला...शेवटी खेळ झाल्यावर मी तिच्या घरी गेलो.....बेल वाजवली....
दार उघडल तर समोर निधीचे वडील....माझ्या अंगात होत नव्हत ते सगळ त्राण गळाल....त्यांनी विचारल...कोण पाहिजे..?? माझा खरच थरकाप उडाला होता... आणि मी चुकून म्हणल....रोहित आहे?? 
कोण?? कोण पाहिजे?? काकांनी विचारल...
sorry काका, निधी आहे? मी रोहित....इथे समोरच्या building मध्ये राहतो .....मी तिचा मित्र आहे....
काकांनी वरपासून खालपर्यंत माझ्याकडे पाहिलं.....माझ्या हातातली चिट्ठी पहिली....माझे थरथरणारे हात पहिले...कपाळावरचा घाम पहिला...आणि म्हणाले...
"रोहित .....आत ये....मी बोलावतो निधीला....!!!!!!!!

Wednesday, November 16, 2011

कबुतर आणि मी

वाटते ..
कबुतर व्हावे 
अन् मुंबईत यावे

ना लोकलची कटकट
 प्रवास होईल झटपट 
  मग काय दादर अन् काय VT
  इशाऱ्यावर नाचेल अख्खी मुंबई City
वाटते ....

  काय METRO आणि काय BEST
  आपल्यासाठी तर पंखच बेस्ट 
  राहिला मिळेल मस्त sea facing Balcony,
  अन् खायला करीन रोज नवीन नवीन taste
  वाटते ....

असे जरी असले , सगळे जरी हसरे
नसेल माझी आई, नसतील माझे बाबा 
नसतील माझे मित्र , नसेल कोणी आपला 
म्हणून हे देवा तुझे आभार तू केलस मला मी 
आता असो शहर पुणे वा हि मुंबई


Tuesday, November 15, 2011

प्रिय वाचकांनो ,
                         तुम्हाला ब्लॉग वरील गोष्टी आवडतायेत हे पाहून खूप आनंद झाला....पण तरी तुम्हाला सौनिक गोष्ट कशी वाटली हे मला सांगा...तुम्ही माझ्या ह्याच पोस्टला comment केली तरी चालेल...esspecially readers from US.....plz do it..!!.....तुमच्या प्रतिक्रिया हेच मला आजून चांगलं लिहायला भाग पाडणार आहेत....धन्यवाद !!!!

                                                                                                                                       तुमचा
                               
                                                                                                                                       सौनिक

Sunday, November 13, 2011

सौनिक-८

पूर्वार्ध 
खूप दिवस मी विचार करत होतो पण काही केल्या मला चारोळी सुचत नव्हती ....काय माहित, मला लिहिताना सारखं दडपण असल्यासारखं वाटत होत...निधीला आवडेल का नाही .....ह्यापेक्षा ती ते कोणाला देणार आहे ह्या प्रश्नानीच मी हतबल झालो होतो...शेवटी मी निधीला भेटायचं ठरवलं...त्यादिवशी संध्याकाळी फारसे लोक खेळायला आले नव्हते...सो खेळ लवकरच संपला....निधी परत जायला निघाली....मी तिला हाक मारली...
" निधी,
 choclate ??
 तू देणार असशील  तर चालेल....पण मला Dairy Milk Fruit and Nutच आवडत 
ठीक  आहे ....मी देतो....
चल मग
आम्ही दुकानात गेलो....एक Dairy Milk Fruit and Nut घेतलं आणि तिथल्याच कट्ट्यावर बसलो
निधी , एक विचारू?
 काय रे...बोल ना.....
आग तुला कोणाला देयचीये चारोळी ??...म्हणजे मी सहज़च विचारतोय
अरे मला न माझ्या एका मित्राला देयची आहे चारोळी
कोण मित्र ? म्हणजे कोण आहे तो....असच विचारतोय..?
अरे आहे एक मित्र....सांगेन तुला पुन्हा कधी....ए पण आता गेल पाहिजे कारण आई पुन्हा ओरडेल...काय गप्पा मारत बसलात म्हणून....आणि परत बाबा येयची वेळ पण  झाली आहे...त्यांनी पाहिलं तर
नको नको....बाबा येयची वेळ झाली का...मग तू लगेच जा....बोलू आपण नंतर...मी आजून लिहली नाहीये चारोळी ....पण लवकरच देईन लिहून तुला....
बर चल मग bye....म्हणून ती निघाली....
"निधी...हि hair style ....खूप छान दिसतीये तुला....फक्त केस मोकळे सोड आजून छान दिसशील तू ...मी म्हणल...कितीही मनाला आवरल तरी शेवटी तोंडातून निघूनच गेल...
तिने मागे वळून पाहिलं...तिचे डोळे चमकले.....ती हलकीशी लाजली.....आणि म्हणाली...उद्या नक्की...
ती गेली....मी मात्र स्वतःला विचारत बसलो...की मी एवढ सगळ निधीला म्हणल....आणि ते मलाच कसं कळलं नाही....!!!!!!!

Wednesday, November 9, 2011

मोरा पिया .....

मोरा पिया  ........क्यूँ समझे ना... ????
प्यार हुआ हे आखिर उसको 
दिल भी दिया हैं उसने मुझको..
फिर भी क्यूँ वोह माने ना.....मोरा पिया ....

लाख बताया मैंने उसको ....
सुनले अपनी इस धड़कन को 
वरना जी नहीं पायेगा .......मोरा पिया 

आखें तेरी कहती हैं अब 
तेरे सपने मुझसे हैं सब...
जानके तू क्यूँ जाने ना....मोरा पिया....क्यूँ समझे ना

Sunday, November 6, 2011

सौनिक-७

पूर्वार्ध 
शेवटी एकदाच तिला trigonomertry कळल...मुळात तिला गणित आवडत नाही त्यात भूमिती म्हणल की संपलच....पण निधी खुपच खुश होती....ती पटकन उठली....तिच्या आईला जाऊन म्हणाली आई मला आली सगळी गणित....मी आणि रोहित ice-cream खायला जातोय....आम्ही तिथल्याच Dinshow's च्या दुकानात गेलो...तिने कसाटा २ ....अशी तिने ऑर्डर दिली .....मला विचारलं पण नाही ......मी पण तसाच खूप खुश होतो...मी आणि निधी ice-cream खायला.....कल्पनाच खूप मोहक होती...ती दोन कसाटा घेऊन आली....मी विचारल..
" तुला कसाटा  आवडत वाटत फार ??
  ह्म्म्म ...मला न सगळ वेगळच आवडत....आणि माझ्याबरोबर आल न की सगळ्यांना हेच ice-cream खाव लागत...dnt mind.... मी तुला direct ice cream आणून दिल...पण hope की तुला आवडत असेल....कसाटा ...
"अरे ते तर माझ favourite ice-cream आहे " ("आजपासून", मनातल्या मनात मी म्हणल)
पण खरच रोहित thanks. मला एवढ छान समजावून सांगितल्याबद्दल .....मला वाटलाच नव्हतं मला येयील....
बर रोहित मला एक आजून काम होत तुझ्याकडे....मी अस ऐकलंय की तू चारोळ्या लिहितोस....
माझा ice-cream चा घास तसाच आडकला 
तुला कोणी सांगितल निधी?
आधी  सांग हो की नाही...
हो...लिहितो...सांग कोणी सांगितलं ते...
मला एक मैत्री वर चारोळी लिहून दे न please...मला न माझ्या एका friendla birthday greeting वर लिहून देयच आहे 
बर देईन .....चल आता खूप उशीर झालाय...आपल्याला गेल पाहिजे न...
ok ....अस म्हणून आम्ही परत निघालो...हे कुणालाच माहित नव्हतं की निधी ज्याच्यासाठी चारोळी ळून घेतीये तो/ती कोण आहे...माझ्या डोक्यात विचार सुरु झाले...