Wednesday, June 27, 2012

मुंबई-पुणे-मुंबई

"आज जाने की जीद ना करो ........sssssss
युही पेहरो में बैठे रहो.......आज जाने की जीद ना करो"

मी  गुणगुणलो.......आणि तिला म्हणल...."हे म्हणतेस कां?
अरे...हे..?? पण मला पूर्ण गाण माहित नाही....आणि चाल पण नीटशी आठवत नाही ना....थांब त्यापेक्षा एखाद मराठीच आठवते.....
तुला सलील-संदीपच येत एखाद गाणं...??
त्यांची  एवढी म्हणत नाही रे मी.....त्यांची गाणी
मग??
हि गुलाबी हवा म्हणू..??
पण मग ते मला नीटसं येत नाही....
अरे माझ्या बरोबर म्हण ना...
नको त्यापेक्षा तूच म्हण.....फक्त...
तिने  गाण सुरु केलं....
हि गुलाबी हवा.....वेड लावी जीवा....
हाय  श्वासातही...... ऐकू ये मारवा """
खरच तिचा आवाज खुपच गोड होता...without background music सुद्धा ती खूप सुरेख गात होती....बसमधले सगळे आमच्याकडे पाहायला लागले होते....समोरच्या घोरणाऱ्या माणसाने आता गाण्याच्या लयीत घोरायला सुरुवात केली होती....त्या मागच्या मुलीची खिडकी उघडायची धडपड चालूच होती....मी मात्र आता डोळे मिटून शांतपणे गाण ऐकत होतो....तिने पाहिलं कडव म्हणल....सुंदरच गात होती ती.....तिने गाण थांबवल....कारण परत तिचा फोन वाजला होता....असं वाटलं...त्या फोनला पायाखाली चिरडून माराव....पण तो फोन कट झाला.....
तेवढ्यात खालापूरचा टोलनाका गेला.......driverने फूडमॉलकडे गाडी वळवली ......आणि आमची गाण्याची मैफिल आर्ध्यातच थांबवत .....आम्ही मध्यांतर सुरु केला....


  

Sunday, June 17, 2012

आई-बाबा तुमच्यासाठी......

आज आई एकदम म्हणाली.....गालावर हात फिरवत....किती मोठा झालास रे......२४ पूर्ण....आणि मला एकदम जाणवल...२४ पूर्ण......बापरे.....ह्या  २४ वर्षात  .....सगळ किती बदललं आहे....सगळ किती वेगळ आहे....पण बदलले नाहोईयेत ते फक्त माझे आई आणि बाबा....ते तसेच आहेत....मला आजून लहान समजणारे.....माझ्या हर स्वप्नांसाठी झटणारे....हर हट्टासाठी असणारे.....माझ्या हर वाटेवर...माझा  हात पकडत चालणारे.......पुढे आजून अनेक बदल होतील......नवीन गोष्टी आयुष्यात येतील......पण आई आणि बाबा....तुमच्या दोघांच स्थान तेच राहील...हे हात परत तसेच तुमच्याकडे येतील......तुमची साथ घेयला.........तुमचा आशीर्वाद असाच नेहमी माझ्या पाठीशी असू दे.....आज fathers day...बद्दल...मनातल्या काही गोष्टी वाटल...सगळ्यांना सांगाव्या.....कारण त्या फक्त माझ्याच मनातल्या नाहीयेत...तर हरेक मुलाच्या आणि मुलीच्या मनातल्या आहेत.........हो ना?.....

शेवटी......

बाबा तुम्हाला ह्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा......!!!!!!

       
                                                                                                            -  सौनिक (सौरभ संजय नेने )

Monday, June 11, 2012

मुंबई-पुणे-मुंबई

नुकतीच झोप लागली होती.....त्या समोरच्या माणसाच  घोरणं  पण थांबलं होत....शेजारचा फोन पण बंद पडला होता......मोबाईल वर माझ आवडत गाण पण लागलं होत. तेवढ्यात ती शेजारची मुलगी म्हणाली.....
" excuse me, पाणी आहे?? माझ्याकडच पाणी संपलय.....मी जड झालेले डोळे उघडत तिला बाटली काढून दिली....परत ती म्हणाली....
" तू काय करतोस?
  मी अगदी बोलू कि नको अश्या स्वरात म्हणालो 
"मी सध्या PG करतोय....."
  "PG , बापरे इतका कस शिकवत रे तुम्हा लोकांना ?"
  excuse me?? म्हणजे?....आपण किती वेळापासून ओळखतो एकमेकांना?
  i guess from last 1:48 minutes....का रे??
 बर काही नाही..तू काय करतेस....??
 मी singer आहे....professional मराठी सिंगर....
ते हि म्हणाली आणि माझ्या डोळ्यावरची झोप गायब झाली
 काय??
 नाव काय तुझ??
कां आता का?? आपण किती वेळापासून ओळखतो एकमेकांना अस विचारू का मी?
बर नको सांगूस....
गार्गी कुलकर्णी...माझे stage shows असतात....उद्याच चाललीये मी.....दुबईला....म्हणून सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आले होते.......
हो का....मी पण ब्लोग लिहितो.....कविता लिहितो.....
अरे वां .....
मी लिंक देईन नक्की वाच......
हो वाचेन न नक्की......
अरे ....मी विसरलोच.......एक एवढी मोठी सिंगर असताना .....मी मोबाईल मधली गाणी का ऐकतोय......एक गाण होऊन जाऊ दे....
अरे छे ...बस मध्ये कुठे....सगळे लोकं आपल्याकडे पाहतील....
त्यांना पाहू देत न...अस समज हे सीट म्हणजे तुझ स्टेज आहे....आणि बाकीचे सगळे सीट म्हणजे प्रेक्षक आहेत....आणि होऊन जाऊ दे गाण .....
एका अटीवर
तू पण माझ्या बरोबर म्हणायचस....
मी कुठे ?? आम्ही बाथरूम मध्ये गाणारी माणस 
मग तू पण समज न तुझ्या सीटला बाथरूम ...आणि म्हण....
बर चल  म्हणेन.....कुठला म्हणतीयेस गाण ??
थांब जरा विचार करू दे...."
अचानक.....प्रवासामध्ये वेगळीच energy आली होती....कोणीतरी आस्था चानेल लावलेल असताना त्यावर अचानक Tom and Jerry लागल्यासारखं झाल होत.....
 


Wednesday, June 6, 2012

मुंबई-पुणे-मुंबई

"खरच रे तुमच्या चेंबूरचा वडापाव खुपच भारी आहे ...जातोयेस न तू अजिंठा पहिला??".....असं काहीस त्यांच बोलणं चालू असतानाच मला पण call आला
" हेलो क्या कर रहा है??
   काही नाही रे.....घरी चाललोय ...पुण्याला...
  लेकिन किसके साथ है??....आवाज तो बहोत आ रहे है....
  अरे काही नाही रे.....एक मुलगी आहे शेजारी....केव्हापासून बोलतीये फोनवर.....वैतागलो यार....
  okokok बर अरे तू परत कधी येतो आहेस?
  मी सोमवारी परत येयीन....का रे..?
  काही नाही रे.....असच विचारतोय....ठीके बोलू मग नंतर...
  ok चल ठेवतो" असं म्हणून मी फोन ठेवून दिला....
  त्या मुलीच आजून बोलण चालूच होत....समोरचा माणुस  अतिशय प्रचंड आवाजात घोरत होता...त्याच्या शेजारच्यानी त्याच्याच खांद्यावर मान टाकली होती, तरी त्याला काही पत्ता नव्हता...मागच्या सीट वरच्या जोडप्याची लहान मुलगी दर दोन मिनिटांनी भोकाड पसरत होती.....का तर म्हणे तिला खिडकीमधून हात बाहेर काढायचा होता.....आणि शिवनेरीच्या खिडक्या उघडत नाहीत....पण मी मात्र आता डोळे मिटून झोपायचं ठरवल होत....तेवढ्यात परत त्या मुलीची काहीतरी खटपट चालू झाली होती.....मी जड झालेले डोळे उघडत तिच्याकडे पाहिलं......ती लगबगीने तिच्या  blackberry mobile मधलं sim card काढून कुठल्यातरी फडतूस LG mobile मध्ये टाकत होती.....ज्याक्षणी तिने ते कार्ड त्या mobile मध्ये टाकल ....फोन वाजला....
"अरे sorry......फोनची battery संपली....म्हणून दुसऱ्या फोन मध्ये कार्ड टाकत होते....sorry म्हणल न.. आता कशी संपली battery म्हणजे काय?.....बर ते सोड...काढलीस का तिकीट अजिंठ्यची? "
आता मात्र हे फार होत होता.....मला सहन होत नव्हतं.....आणि तितक्यात बस बोगद्यात गेली फोनची रेंज गेली....आणि एकदाचा तो मोठा call संपला....असं वाटल हा बोगदा संपूच नये....मला थोडी शांतता तरी मिळेल....सकाळी काय पाहून निघालो होतो काय माहित की.....कधीही कंटाळवाणा न वाटणारा मुंबई-पुणे प्रवास मला नकोसा झाला होता......मी मनाशी ठरवलं....आता कसलेही कितीही मोठे आवाज आले तरी उठायचं नाही आणि डोळे मिटले....