Saturday, March 31, 2012

मुलाखत......

त्यादिवशी सकाळी मी पेपर वाचत बसलो होतो ......नुकताच चहा पिउन झाला होता......सकाळी सकाळी सुद्धा पंखा लावायला लागेल इतपत उन्हाचा पारा वाढला होता...मी जरी पेपर वाचत असलो तरी माझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चालू होता.....crossword मध्ये जाऊन कोणती नवीन पुस्तकं आली आहेत हे पाहायची इत्छा मनात निर्माण झाली होती.....ब्लॉग पण update  करायचा राहिला होता......तेवढयात आईने हाक मारली.....
" मन्या, अरे आज मंडइत जायचंय बरका भाजी आणायला.....तुझा काही programme ठरवू नकोसं....कळल का??
बर आई...
आणि  हो ...तुझ्यासाठी एक फोन आला होता?
कुणाचा?
नाव नाही सांगितलं .....फक्त विचारल.....राहुल आहे का??....मी म्हणल नाही तर लगेच फोन बंद केला 
हो का? जाऊ दे येयील परत फोन.....बर आई.....पुढच्या सोमवार पासून मला लवकर जायचंय ऑफिसला तेव्हा तुला सकाळी लवकर जमणार असेल तर डब्बा दे नाहीतर खाईन मी एक आठवडा ऑफिसमध्ये.....
बर  बघीन....आणि तूच मंगळवार पासन म्हणशील "आई, मला डब्बाच दे....म्हणून !!!"
बाबा  कुठे आहेत?? 
फिरायला कम फुल तोडायला गेले आहेत...
हाहाहा .....काय आई तू पण....
काय म्हणजे काय?? खरच सांगतिये मी.....एवढी फुल तोडतात की देव्हाऱ्यात देव दिसेनासे होतात....
असं म्हणत आईने स्वयपाकाची तयारी सुरु केली....त्यादिवशी मला सुट्टी असल्यामुळे मी निवांत होतो.....तेवढ्यात डोक्यात सुंदर कल्पना आली.....मी चटकन laptop on केला....net कनेक्ट केलं , ब्लॉग उघडला आणि लिहायला सुरुवात केली....

Saturday, March 24, 2012

सौनिक-२४

पूर्वार्ध 
तेवढ्यात माझा फोन वाजला....आई फोन करत होती......मी त्याच्याकडे लक्षच दिल नाही....मी निधीकडे पाहिलं......हळूच तिचे डोळे पुसले....आणि म्हणल...
" निधी, कसाटा खाणार ??
  तू जाणार नसशील तर 
  आग त्याचा काय संबंध आहे.....तू मला सौनिक म्हणजे काय सांगितलस त्याच्या आनंदात खावूयात न 
  त्याच्या आनंदात कि तू मला सोडून चाल्लायेस त्याच्या आनंदात ?
  अरे....निधी...हे बघ....आता मी तुला एक गोष्ट सांगतो.....ती निट ऐक....पण पहिले आपण कसाटा घेवू मग बोलू..." तेवढ्यात आईचा फोन परत वाजला ....मी उचलला 
"आई, मी येतोय एक आर्ध्या तासात ....
कुठे  आहेस तू?? आणि मगाशी फोन का नाही उचललास?
आग आई....सांगतो तुला आल्यावर सगळ सविस्तर...."अस म्हणून मी फोन बंद केला 
तोपर्यंत निधी कसाटा घेऊन आली होती
" निधी , एक नेहमी लक्षात ठेव ....प्रत्येक गोष्टीला एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध असतो....पूर्वार्ध संपल्याशिवाय उत्तराध सुरु होऊ शकत नाही....आणि त्याशिवाय गोष्ट पुढे कशी जाणार.....आता आपल्या बाबतीतही तेच होतंय.....
म्हणजे.....?? काय म्हणायचं तुला रोहित??
म्हणजे .....इथे आपली पण एक गोष्ट आहे.....त्या गोष्टीला सुद्धा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे.....आणि आता ह्या क्षणी पूर्वार्ध संपतोय ......आणि उत्तरार्ध सुरु होतोय ......
हे बघ रोहित हे सगळ तुम्हा लेखक मंडळींना माहित ....मला फक्त माझ सौनिक पूर्ण करायचंय.......आणि ते अपूर्ण सोडून जर तू कुठे गेलास तर मग तू काय आणि तुझी आई काय.....मी कोणालाही घाबरणार  नाही...
निधी.....जरा शांत हो....एकदम झाशीची राणी होऊ नकोस.....आणि आईच नाव घेऊ नकोस....मी सांगेन आईला.....फक्त थोडी वाट बघ.....आपल्या गोष्टीचा पूर्वार्ध भले देवानी लिहिला असेल....मात्र उत्तरार्ध मीच लिहणार.....तुला हवा तसा......सौनिक नक्की पूर्ण होणार......आणि आपण पुन्हा इथेच कसाटा कापून माझा वाढदिवस साजरा करणार.......

Monday, March 19, 2012

मी फुल तृणातील इवले

जरी तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही
                    
शक्तीने तुझिया दिपुनी
तूज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन् स्वतःस विसरून वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारा

रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे
अन् रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे

शोधीत धूक्यातून मजला
दवबिंदू  होऊनी ये तू
कधी भिजलेल्या मातिचा
मृदू सजल सुघांधीत हेतू

तू तुलाच विसरून यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे

 ह्या अफाट कल्पनेला माझा सलाम.....सलाम .......मंगेश पाडगावकर ह्यांना 

Saturday, March 10, 2012

सौनिक-२३

पूर्वार्ध 
मी ice-cream च्या दुकानात पोहचलो....निधि तिथे येउन थांबलीच होती...आज ना कसाटा होत ना तिने  केस मोकळे सोडले होते...मी जरा दबकत दबकत निधीसमोर गेलो...तिच्या डोळ्यात पाहिलं.....हजार प्रश्न त्यात मला दिसत होते....मी तिच्याशी बोलणार तोच निधी म्हणाली...
" सौनिक , माझ स्वप्न , तुझ्या बद्दलच , आपल्या बद्दलच....जे मला माझ्या इतर कोणत्याही स्वप्नापेक्षा लाख पटींनी जास्त पडणार...एक थेंब हळूच तिच्या नाजूक डोळ्यातून ओघळत गालावर आला...
तूला माहीती आहे रोहित???, मला न माझे बाबा नेहमी म्हणतात , निधी......हे जग आहे न ....ते देवाने पाहिलेलं सुदर स्वप्न आहे.....जितक देव  ह्या स्वप्नाला सुंदर बनवतो तितकच हे जगही....तेव्हा लक्षात ठेव....आपण पण मोठी स्वप्न पहावीत की जे आपल जग आणखी सुंदर बनवतील .....किती सही बोलले न ते..
निधी...हे बघ मी तुला सांगणारच होतो......
काय? तू इथून निघून चालला आहेस हे का आता मला कोणी gallery मधून बघणार नाही हे का तू माझ स्वप्न बेचिराख करायला निघालायेस हे ?? ....काय सांगणार होतास ....बोल ना
निधी....अग आस काही नाहीये...माझ जरा आईकून घे..
निधी डोळे पुसत माझ्या आणखी जवळ आली.....
" तुला सौनिक चा आर्थ हवा होता न ?? 
हो
ती माझ्या आणखी जवळ आली, माझ्या हृदयाची धकधक आणखीनच वाढली....तेवढ्यात मला काही कळायच्या आत.....  तिचे ओठ माझ्या ओठांना भिडले.........माझ्या डोळ्यातून एक अश्रू  अलगद ओघळला......
"हे आहे सौनिक...आता ह्यापेक्षा जास्त मी तुला काही सांगू शकत नाही....अस म्हणत ती माझ्या मिठीत आली..."...मला काही कळायचं बंदच झालं होत....मी काय सांगायला आलो होतो....आणि हे काय झालं होत....ह्या क्षणानंतर मी कसाकाय नाशिकला जाणार होतो.....मी पण माझे दोन्ही हात आवळले आणि तिला घट्ट मिठीत घेतलं..... 

Wednesday, March 7, 2012

Happy Holi to all of you!!!!!

रंगात रंगुनी आज रंगवू चित्र जुने
त्याच त्याच आयुष्याला दाखवू स्वप्न नवे...

सूर्य  तसाच केशरी , नद्या तश्याच निळ्या
पाने हि हिरवी अन् ....पांढर्याच ह्या कळ्या
भिजवून त्यांस नवरंगात मग करू नवे जग उभे

डोळ्यातील सुखावर अन् मनातल्या दुःखावरही
ओठातील  गीतांवर अन् हृदयीच्या श्वासांवरही
मनातल्या अंगणात ह्या टाकू प्रेमाचे सडे

रंगात रंगुनी आज रंगवू चित्र जुने
त्याच त्याच आयुष्याला दाखवू स्वप्न नवे

सर्व वाचक मंडळींना हि होळी नव चैतन्य देवो.....Happy Holi..!!!!!!                                                                             

सौनिक