Thursday, October 17, 2013

आनंदाश्रम.....

संध्याकाळ झाली होती....मी चहा पीत बाल्कनीत बसलो होतो.....सूर्याच आसपास कुठेही नामोनिशाण दिसत नव्हत....आकाश जणू काही काळ्याभोर ढगांनी पुरत व्यापुन टाकल होत..मधेच विजांचा गडगडाट तर मधेच पक्ष्यांचा किवकीवाट कानी पडत होता....हे वातावरण जणू कोणीतरी कुठेतरी खूप दुःखी आहे तर कुणीतरी कुठेतरी चिंब भिजण्यासाठी उत्सुक आहे अशी प्रचीती करून देत नेहमी मला ....मी चहाच्या प्रत्येक घोटागणीक त्या वातावरणाशी एकरूप होत चाललो होतो....

"चहा कसा झालाय?", साखर पडलीये ना बरोबर?, माझ्याहातून कमी पडते म्हणून विचारलं....

मी मागे वळून पाहिलं.....नेहमीप्रमाणे काहीच न बोलता.....सईच सगळ बोलण मला ऐकू आल होत...तिचे डोळे बोलतातच मुळी इतक्या जोरात .....

"चांगला झालाय चहा"

" पाऊस येणारे खूप जोरात....मी सगळे कपडे आत घेते नाहीतर उगाच ओले होतील....तू आज कसाकाय एवढा निवांत...."

अरे हा पाउंस का येत नाहीये....पटकन येवून कोसळून जाऊ दे....कुणाच मन किती हलक होईल....त्याच दुःखं ह्या सारीन्बरोबर वाहून निघून जाईल.....तर कोणीतरी त्यात चिंब होऊन तृप्त होईल....

पण पाउस येतच नाहीये...

सगळ नेहमी इतका सोप नसत....श्रेयस....

म्हणजे

काही नाही.....

आज ईशाच्या पोलिओ डोस ची तारीख आहे....तिला नेयच आहे.बूथ वर ....पाउस येयील तेव्हा येयील.....आपल्याला निघायला हवय....

मोरे काका सकाळीच गेलेत....आश्रमात......जोशी आजींना अस्वस्थ वाटत होत....डॉक्टरांना घेऊन गेलेत.....
तिथेपण जाव लागेल आपल्याला ...चल पटकन आवर.....

सई......खरच .....लहानपण आणि म्हातारपण किती सारख आहे हे कस लोकांना कळत नाही...काही लोक लहानपाणी लोक सोडून जातात तर काही लोक म्हातारपणी लोक सोडून जातात....आज मला कळतंय....देवाने दोन वेळा आपल्याला बालपण जगायचा chance दिलाय......लोकांना हे जेव्हा कळेल ना तेव्हा बघ आपल्या सारख्या लोकांची गरजच उरणार नाही....

तेवढ्यात बेल वाजली....सईने दार उघडल....

" श्रेयस बघ कोण आलय........  

4 comments:

  1. ".देवाने दोन वेळा आपल्याला बालपण जगायचा chance दिलाय......" खुपच सुंदर कल्पना... :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आदित्य.....

      blogsite....join कर जमल तर

      Delete
  2. .लहानपण आणि म्हातारपण किती सारख आहे हे कस लोकांना कळत नाही...काही लोक लहानपाणी लोक सोडून जातात तर काही लोक म्हातारपणी लोक सोडून जातात....आज मला कळतंय....देवाने दोन वेळा आपल्याला बालपण जगायचा chance दिलाय......लोकांना हे जेव्हा कळेल ना तेव्हा बघ आपल्या सारख्या लोकांची गरजच उरणार नाही. PLEASE ELABORATE

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Tejashree!

      you must wait for the further parts of the story to come to know the meaning.

      Delete