Sunday, June 12, 2011

आधार...

छोटस कौलारू घर होत...त्यात त्याचे आई-वडील आजी आणि बहिण राहतात अस त्याने मला सांगितलं....मी हात पाय धून बाहेर अंगणात बसलो होतो...आणि आधी म्हणल्याप्रमाणे मी तिला पाहिलं....गोरीपान, लांब केस, पण ती बरीच दूर होती...ती वाड्याच्या दारात आली...तिच्या बरोबर एक वयस्कर बाई होत्या....त्या तिचा हात धरून तिला घेऊन येत होत्या....मला जरा वेगळ वाटल..त्या तिला धरून का आणत होत्या?? हा प्रश्न मला पडला.....ती तेवढ्याच दमाने त्या बाईना झिडकारत होती....बहुदा तिला घरी येयच नसाव...त्या बाईंनी तसच तिला धरून घरात नेल...जाताना त्या मुलीने माझ्याकडे पाहिलं...तिचे डोळे जणू मला मदत मागत होते.....सांगत होते.....ह्या सगळ्यात माझी काय चूक आहे...?? मला हा त्रास का?....तेव्हड्यात मला आतून कोणीतरी  हाक  मारली..मी आत गेलो..सुनील मला त्याचे फोटो दाखवायला बोलवत होता....मी फोटो पाहू लागलो खरंच पण माझ्या डोळ्यासमोरून  ते डोळे आणि त्यातली ती मदतीची आस काहीकेल्या जाईना....
            शेवटी मधेच सुनीलला मी विचारलं...अरे आता ती मुलगी आत आली त्या बाईंबरोबर ती कोण आहे?
सुनीलने पहिले लक्ष न दिल्यासारखं केलं...तो काहीच बोलला नाही....मी त्याला परत तेच विचारल...तरी तो काहीच बोलला नाही.....मग त्याला जरा मोठ्या आवाजात विचारल तेव्हा तो म्हणाला...
"अरे रोह्या तुझ काय रे एकच....इथे एन्जोय करायचं सोडून काय तू हे प्रश्न घेऊन बस्लायेस....
कोण ती न ती माझी बहिण आहे....mentally retarded आहे....बस आता...फोटो पाहूयात का..??"
मी क्षणभर सुन्न झालो...सुनीलनी मला फक्त त्यला एक बहिण आहे असच सांगितलं होतं...पण त्याला आजून एक बहिण होती पण केवळ ती abnormal होती म्हणून तो तिला बहिण पण मानत नव्हता....हे सांगितलं नव्हतं...माझ्या डोळ्यातून का कलाल नाही पण त्या बहिणीसाठी पाणी आल....

No comments:

Post a Comment