Friday, February 17, 2012

सौनिक-२२

 पूर्वार्ध
आणि तो दिवस आला....घराबाहेर ट्रक उभा होता....हळूहळू सगळ सामान ट्रक मध्ये जात होत...दादा काहीतरी खायला घेऊन आला होता....आजी तिची औषध नीट बांधून घेत होती..बाबा नाशिकच्या लोकांशी फोनवर बोलत होते....आई देवाची पूजा करत होती....आणि मी मात्र वेड्यासारख galleryमध्ये उभा होतो....सगळ्या दिशा सुन्न वाटत होत्या...निधी आणि माझी त्यादिवासानंतर भेटच झाली नव्हती....बऱ्याच शब्दांचे अर्थ तसेच कपाटात बंद होते....त्या कापाटाची किल्ली काही केल्या मिळत नव्हती..मी हताश होऊन डोळे मिटले....डोळ्यासमोर काळोख होता.....तेवढयात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला....मी दचकलो....आणि वळलो...आजी होती....माझ्या डोळ्यातला थेंब पुसत म्हणाली...
" अरे बाळा, काय अस दुरून फुल उमलायची वाट बघतोयेस....ते कधी उमलेल आणि कोण तोडून नेईल तुला पत्ताही लागायचा नाही...आणि मग अचानक एक दिवस तूच विकत घेतलेल्या गुत्छामध्ये ते दिसेल....आणि मग तू ते धड त्यातून काढूपण शकणार नाहीस आणि ते देवू पण शकणार नाहीस....त्यापेक्षा... आत्ताच जा आणि त्या फुलला तोडून आण....म्हणजे कायम स्वरूपी ते तुझ्या जवळ राहील...."
खरच आजी?? आस होईल..?? तेवढ्यात......
galleryच दार उघडलं...निधी बाहेर आली.....मला काहीच कळेना की मी काय कराव....घोड्याला मैदान दिसावं पण पळता येवू नये असं काहीस झालं होत....तेवढ्यात mobile वाजला..निधीने message केला होता....ice-cream च्या दुकानात बोलावलं होत.....पण भर दुपारी आईला .ice-cream खायला जातो आहे हे कसं सांगणार होतो...मी घरात आलो....मनाशी दोन मिनिट विचार केला आणि हाक मारली....
" आई ए आई.....मी  आशीशकडे जाऊन येतोय...आलोच...!!!

1 comment:

  1. सुंदर ब्लॉग आहे.
    माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या ब्लॉग ला विझिट द्यायला विसरू नकोस..
    http://themarathi-blog.blogspot.in/

    ReplyDelete