Sunday, May 27, 2012

मुंबई-पुणे-मुंबई

कसबसं ६ च्या बसच तिकीट मिळाल.....बस आजून आलीच नव्हती.......त्या मुलीची पुण्याला पोह्चायची तगमग काहीतरी वेगळीच होती.....ती परत माझ्याजवळ आली आणि म्हणाली....
" हे तिकीट परत घेतात का??
 का? काय झालं?
 काही नाही मला खूप उशीर होईल पुण्याला पोहचायला...
पण मग तू कशी जाणार आहेस.....
ती काय समोर नीता volvo उभी आहे.....त्यानी जाते पटकन...
अरे मग आधीच जायचस न....तिकीट कशाला काढलस...?? आता ते परत घेत नाहीत...
मी अस करते...त्यापेक्षा मागे रांगेत कोणाला तरी विकते.....black मध्ये??
काय??? hehehe....कर तुला काय करायचं ते...."अस म्हणून मी पाण्याची बाटली आणायला गेलो...बाटली घेतली परत आलो तर बस लागलेली होती....सारखी announcement होत होती....
"६ वाजता सुटणारी A/C शिवनेरी बस नंबर ४५६७ फलाट क्रमांक एक वर उभी आहे....ती औंध मार्गे जाते..धन्यवाद..." बस नंबर पण काय हटके मिळाला होता....हा प्रवासच काहीसा निराळा होणार होता हे नक्की...
मी चटकन गाडीत शिरलो.....मला नशिबाने window सीट मिळाली होती....पाहतो तर काय....शेजारी तीच मुलगी....मी bag वगरे वर ठेवली.....बसलो....आणि म्हणालो...
" काय blackcha धंदा मंदावला का..??
अरे  नाही...मी एकाला विचारायला जाणार तोच एक जन माझ्याकडे नीता volvo तिकीट घेऊन आला...विकायला....
मग...
मग काय....मी गुपचूप परत आले....तेवढ्यात बस आली....आणि बसले....
ह्म्म्म..ok...असं म्हणून मी मोबाईलला हेडसेट लावला ....माझ आवडत song play केलं.....आणि डोळे मिटून ऐकू लागलो.....

No comments:

Post a Comment