Wednesday, June 27, 2012

मुंबई-पुणे-मुंबई

"आज जाने की जीद ना करो ........sssssss
युही पेहरो में बैठे रहो.......आज जाने की जीद ना करो"

मी  गुणगुणलो.......आणि तिला म्हणल...."हे म्हणतेस कां?
अरे...हे..?? पण मला पूर्ण गाण माहित नाही....आणि चाल पण नीटशी आठवत नाही ना....थांब त्यापेक्षा एखाद मराठीच आठवते.....
तुला सलील-संदीपच येत एखाद गाणं...??
त्यांची  एवढी म्हणत नाही रे मी.....त्यांची गाणी
मग??
हि गुलाबी हवा म्हणू..??
पण मग ते मला नीटसं येत नाही....
अरे माझ्या बरोबर म्हण ना...
नको त्यापेक्षा तूच म्हण.....फक्त...
तिने  गाण सुरु केलं....
हि गुलाबी हवा.....वेड लावी जीवा....
हाय  श्वासातही...... ऐकू ये मारवा """
खरच तिचा आवाज खुपच गोड होता...without background music सुद्धा ती खूप सुरेख गात होती....बसमधले सगळे आमच्याकडे पाहायला लागले होते....समोरच्या घोरणाऱ्या माणसाने आता गाण्याच्या लयीत घोरायला सुरुवात केली होती....त्या मागच्या मुलीची खिडकी उघडायची धडपड चालूच होती....मी मात्र आता डोळे मिटून शांतपणे गाण ऐकत होतो....तिने पाहिलं कडव म्हणल....सुंदरच गात होती ती.....तिने गाण थांबवल....कारण परत तिचा फोन वाजला होता....असं वाटलं...त्या फोनला पायाखाली चिरडून माराव....पण तो फोन कट झाला.....
तेवढ्यात खालापूरचा टोलनाका गेला.......driverने फूडमॉलकडे गाडी वळवली ......आणि आमची गाण्याची मैफिल आर्ध्यातच थांबवत .....आम्ही मध्यांतर सुरु केला....


  

No comments:

Post a Comment