Saturday, August 27, 2011

ओंजळ ...१

मुंबई शहर......त्यातलं छोटस खेड 'गोवंडी '....प्रचंड मोठी झोपडपट्टी.....चक्क २-२ मजली झोपड्या...जवळपास प्रत्येक घराला एक एक A/C....घराच्या मागे रेल्वे मार्ग.....ह्या सगळ्या रहाणीमानाला चांगल म्हणाव की वाईट .....काही कळत नव्हत...कारण वाइट म्हणाव तर त्या लोकांकडे सगळ काही होत....सगळ्या सुखसोई होत्या...आणि चांगल म्हणाव  तर अतिशय घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेच साम्राज्य पसरलेल होत....लोक कायद्यानुसार राहत होते की नाही हा तर दूरचा मुद्दा होता पण ते कसे राहत होते हाच महत्वाचा पेच मला पडला होता...हे सगळ पाहून माझी झोपडी ह्या शब्दाची व्याख्याच बदलून गेली....मुंबईतली झोपडी एकीकडे आणि इतर खेड्यातली झोपडी एकीकडे.....पण हे सगळ अतिशय दुर्दैवी असल तरी ते सत्य होत......सगळ्या धर्माची, पंथाची लोक तिथे राहत होती...त्यातच राहत होता एक १५ वर्ष्याचा मुलगा रवी...तो तिथेच समोर स्टेशन जवळच्या एका होटेल मध्ये काम करायचा....त्याला ३ बहिणी आणि १ भाऊ होता...सगळे त्याच्यापेक्षा लहान होते.....मी नेहमी त्या होटेल मध्ये चहा पेयला जात असे...
एकदा नेहमीप्रमाणे मी चहा पीत होत होतो....तेवढ्यात मला आवाज आला....
 "ए रवी....काम करणा हैन तो कर...वरना भाग यहा से....तेरे जैसे बच्चे रोज पैदा होते हैन और मर भी जाते हैन लेकिन उसकी  किसी को खबर भी नही होती... "
"माफ करो सेठ...ऐसी गलती दोबारा नही होगी......"
 माझ चहा वरच लक्ष केव्हाच उडाल होत..त्या मुलाकडे मी रोज पहायचो...त्याच्या डोळ्यात एक अजब चमक होती....हुशारी होती....पण त्याच बरोबर पोरकेपण पण होत...जबाबदारीच ओझ पण होत....मी त्यादिवशी त्यला गाठल आणि त्याच्याशी बोललो...
त्याला म्हणल..."ए रवी, काम ठीकसे क्यु नही करता??" हमेशा सेठ की गालिया खाता हैन?
क्या साब तुम भी शुरू होगये...जिसके दिन की शुर्वात हि गालिया सुनके होती हैन उसे अगर गालिया सुनी न दे तो दिन काटता नाही...."
लेकिन तू ये काम क्युन करता हैन? तेरी मां तुझे रोक्ती नाही?
त्याच्या डोळ्यातून पाणी आल.....पण चटकन त्यांनी ते पुसल आणि म्हणाला
मा? वोह क्या होती हैन साब?? ......मैने तो पेहला शब्द सिखा  वोह था 'सेठ'.....डोळे पुसत पुसतच तो हे बोलला......त्याच्या बोलण्यातला खोटेपणा त्या अश्रूंनी केव्हाच सांगून टाकला होता......
 

No comments:

Post a Comment