Saturday, August 27, 2011

गोष्ट लोकलमधली-२४

 मुंबईत त्यादिवशी खूपच पाउस होता...ठीकठिकाणी पाणी भरायला सुरवात झाली होती....ट्रेन्स लेट धावत होत्या....आणि आदल्या रात्रीच आम्ही शोप्पिंग्ला जायचा प्लान केला होता....नेहा पुढच्या आठवड्यात बंग्लोरेला शिफ्ट होणार होती....हा लास्ट वीकेंड होता ती मुंबईत असतानाचा सो आम्ही हा प्लान केला होता.... मी सकाळी १०:३० च्या सुमारास दादरला गेलो....आम्ही दादर वेस्टला shopping करायचं ठरवल होतं...नेहा पण वेळेतच आली...आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो...पाऊसामुळे फारशी गर्दी नव्हती.... आम्ही प्रथम ड्रेसेसच्या दुकानात गेलो....मी नेहाला म्हणल  होत mall मध्ये जाऊ तिथे सगळच मिळत पण नाही.....४-५ दुकान हिंडलो...शेवटी एका दुकानात एक top तिला पसंद पडला......त्यानंतर आम्ही makeupचं समान खरेदी करायला गेलो...तिथे माझ काय काम होता कोणास ठाऊक पण नाही मी बरोबर पाहिजेच होतो.....त्यानंतर दादर स्टेशन जवळ लस्सी पेयली.....पण महत्वाची खरेदी आजून बाकीच होती...तिला माझ्याकडून गुलाबाच्या फुलांचा गुच्छ हवा होता...काय ह्या बायकांनाना केव्हा काय मागाव वाटेल ह्याचा काही नेम नाही.....शेवटी एका ठिकाणी तो फुलवाला दिसला.....त्याच्याकडून तो गुच्छ घेतला.....नेहाला म्हणल घे....झाल आता .......ती म्हणाली काय हे...नीट जरा प्रेमाने देना.....शेवटी मी एका गुडघ्यावर खाली बसलो ....हात पुढे केला .....तिने तिचा हात माझ्या हातात दिला......तिच्या हातात मग मी गुच्छ दिला ....सकाळची सगळी खरेदी संपली होती...आम्ही परत ट्रेन मध्ये बसलो होतो....सगळीकडे आनंद होता....पण मनात एक प्रकारची हुरहूर होती....प्रत्येक गोष्टीला काही न काही शेवट असतो....आमच्या गोष्टीचा शेवट काय असेल?? सगळ तर तसच राहणार होत...मी...नेहा...आमच प्रेम....ती ९:३० ची लोकल त्यामुळे मला चटकन जाणवल...अरे ह्या गोष्टीला शेवट तर नाहीच आहे....कारण हे सगळ आमच्या ह्या गोष्टीला नेहमी सुरूच ठेवणार आहे.......जिवंत ठेवणार आहे....

No comments:

Post a Comment