Saturday, November 26, 2011

सौनिक-९

पूर्वार्ध 
अखेर मला ती चारोळी सुचली....मी पटकन कागद घेतला....ती लिहून काढली ....
"मैत्रीच्या फुलांनी, चार ह्या शब्दांनी 
शुभेच्छांची परडी, तुला देत आहे
कुठल्याही दिशेला, तू आडखळलीस जरीही
माझी ही मैत्री, तुझ्या साथ आहे ! "
  
त्याचक्षणी निधीला फोन लावला....पण तो काकूंनी उचलला....
"हेलो , काकू....निधी आहे? मी रोहित बोलतोय...
अरे रोहित बोल....अरे निधी ना जरा बाहेर गेलीये...नाहीये आत्ता...काही काम होत का??.
नाही तस महत्वाच काही काम नव्हत पण तिला आल्यावर please फोन करायला सांगाल का?
हो नक्की सांगते..."
मी फोन ठेवला....मी एक स्वत्छ कागद घेतला...त्यावर सुंदर अक्षरात ती चारोळी लिहली....आणि माझ्या drawer मध्ये तो कागद नीट ठेवून दिला....आणि अभ्यासाला बसलो...
              ५ वाजले होते....सगळे खेळायला येयची वेळ झाली होती.....म्हणून मी घाईघाईने drawer कडे गेलो...तो कागद पटकन घेतला...आणि पळत पळत बाहेर आलो....तेवढयात आजी म्हणाली....
"आरे रोहित...कधी येशील परत....
आजी, येयीन ७ वाजेपर्यंत....
आणि हे काय?? नुसता कागदच देणारेस....? फुलांची परडी कुठे आहे?
काय?? परडी?...मी काही न कळल्यासारख म्हणालो...आणि पटकन माझ्या डोक्यात tube पेटली ...मी त्या चारोळीत फुलांच्या परडीबद्दल लिहल होत....पण हे आजीला कसं कळल..??....मला काही कळल नाही आजी...मी म्हणल
अरे  काही नाही गम्मत केली....जां तू.....पण लवकर ये...."
आजीने तो कागद वाचला होता...त्यावर नाव लिह्लच नव्हत मी....त्यामुळे मी जरा निर्धास्त होतो....पण आजीच्या डोक्यात डाळ शिजायला सुरुवात झाली होती...आणि मला शिट्टी व्हायच्या आत gas बंद करण आवश्यक आहे हे माझ्या लक्षात आल...पण तेव्हा मी तसाच तिथून खेळायला निघून गेलो.... पण त्यादिवशी काय माहित निधी आलीच नाही खेळायला...शेवटी खेळ झाल्यावर मी तिच्या घरी गेलो.....बेल वाजवली....
दार उघडल तर समोर निधीचे वडील....माझ्या अंगात होत नव्हत ते सगळ त्राण गळाल....त्यांनी विचारल...कोण पाहिजे..?? माझा खरच थरकाप उडाला होता... आणि मी चुकून म्हणल....रोहित आहे?? 
कोण?? कोण पाहिजे?? काकांनी विचारल...
sorry काका, निधी आहे? मी रोहित....इथे समोरच्या building मध्ये राहतो .....मी तिचा मित्र आहे....
काकांनी वरपासून खालपर्यंत माझ्याकडे पाहिलं.....माझ्या हातातली चिट्ठी पहिली....माझे थरथरणारे हात पहिले...कपाळावरचा घाम पहिला...आणि म्हणाले...
"रोहित .....आत ये....मी बोलावतो निधीला....!!!!!!!!

No comments:

Post a Comment