Thursday, February 7, 2013

सांजवेळा.....


मनाशी बोलणाऱ्या.....स्वतःला  मांडणाऱ्या
एकट्याला एकट्याशी बांधणाऱ्या...........सांजवेळा


ह्या जीवांना आस असते भेटण्याची
अंतरीचे भाव सारे सांगण्याची

ह्या मनाला त्या मनाशी जोडणाऱ्या ......सांजवेळा


दाटलेले दुःख येते मग भरून
मन असते हात-हाती अन धरून

अश्रूंनाही हासवून सांडणाऱ्या..........सांजवेळा


विसकटलेल्या भावनांना सावरून
मन म्हणते बघ जरा निरखून

तुझे निरोप तिलाही सांगणाऱ्या .....सांजवेळा....