Thursday, October 27, 2011

सौनिक-६

पूर्वार्ध 
मी ठरल्याप्रमाणे निधीकडे गेलो....बेल वाजवली ...काकूंनी दार उघडल......
"रोहित ये....काय म्हणतोयेस?? कसा चाललाय अभ्यास..??
ठीक आहे काकू...आता परीक्षा जवळ आली आहे सो अभ्यास जोरात चालू आहे...निधी कुठे आहे? तिने गणितांसाठी बोलावलं होता..
निधी आहे न....तिच्या रूम मध्ये असेल....थांब ह मी बोलावते..निधीस्स्स आग रोहित आलाय बघ...
आले आई..."
निधी बाहेर आली...मला म्हणाली...
"अरे आत ये न...आपण माझ्याच खोलीत बसुयात गणित करायला..."
मी आत गेलो....पलंगावर सगळीकडे पुस्तक पसरवली होती...मी म्हणल
"काय निधी??....किती अभ्यास करतेस?? तुझ्या बेडलापण अभ्यासू बनवून ताक्लायेस अगदी.??"
अरे नाही..माझ्या बेडलापण गणिताची भीती वाटते....
हो का ...बर मग आज तुम्हा दोघ्नाची गणिताची भीती घालवू टाकतो....
खरच...असं केलंस न तर माझ्याकडून एक ice-cream तुला .. 
चल मग...सांग काय प्रोब्लेम आहे ते....
अरे मला न trigonometry समजावून दे ....ह्या सगळ्या sin, cos आणि tan मध्ये नुसतं गुरफटून जायला झालय...
मी हातात पेन उचलला .....काटकोन त्रिकोण काढला ....आणि समजावून देयला सुरुवात केली...

 

Tuesday, October 25, 2011

सौनिक - ५

पूर्वार्ध 
त्या दिवशी रविवार होता ....मी असाच galaryt उभा होतो..संध्याकाळची वेळ होती....मी असाच शांतपणे उभा होतो...फोन वाजला ....मी उचलला .....
हेलो, रोहित आहे का काकू?
रोहितच बोलतोय ....
ohh .....मला वाटल काकू आहेत..
काय काम होत..??
अरे मला न काही गणित सुटत नाहीयेत...तुझ गणित चांगलं आहे अस आई म्हणाली...सो मला समजावून देशील का..?? आहे का वेळ तूला..
वेळ आणि मला...आहे न...पण आईला विचाराव लागेल...
मग मी विचारू का काकुंना
नको मी विचारतो..
बर...मग त्या हो म्हणल्यावर माझ्याकडे ये..
ok.."
"आई , निधीचा फोन आला होता...तिला म्हणे गणित येत नाहीयेत ती समजवायला ती बोलव्तीये जाऊ का..?
  बर ये जाऊन...पण अभ्यास करा..गप्पा नकोत...
  हो आई..आईची परवानगी मिळाली आणि मी निधीकडे निघालो..

Monday, October 24, 2011

सौनिक-४

पूर्वाध
माझी रूम आईने नुकतीच आवरली होती...त्यामुळे सगळ ज्या त्या जागी ठेवलेल होत..निधी आत आली...तिने चारीही बाजूने रूम कडे पाहिलं...मग ती माझ्या टेबल जवळ आली..आणि म्हणाली..
" रोहित..मस्त आहे रे तुझी रूम..
thanks निधी..
अरे तुझ्या PC मध्ये काही नवीन movies  आहेत का? किंव्हा काही नवीन गाणी आहेत का?? असली तर मला दे न...
आहेत  ना ...तुला कुठली हवियेत ती घेऊन जा...
अरे पण मी काही PD  वगरे आणल नाहीये...
आग माझा घेऊन जा न मग...
ok....hey तुला प्रियांका चोप्रा आवडते का??
काय? कशावरून? 
नाही तुझ्या mobileवर , PC वर सगळी कडे तीच आहे म्हणून विचारल..
तसा काही नाहीये...पण तिचा हा फोटो मला खूप आवडतो...तिचे लांब केस ....लाल रंगाचा ड्रेस ....मस्तच दिसतो न तिला..??
ह्म्म्म असेल...
रोहित, चला तुम्ही दोघ..आपल्याला मामाकडे जायचंय."..आईने आवाज दिला
"ठीके आई...आलोच..निधी चल...आई बोलाव्तीये" अस म्हणून मी घाईघाईने रूमच दार उघडून आत जायला आणि निधी बाहेर येयला एकच वेळ आली....मी तिला धडकलो...आणि आम्ही दोघही माझ्या पलंगावर पडणार तोच मी निधीचा हात पकडला आणि आम्ही एकमेकांना सावरल...मनातली एखादी इत्छां इतक्या पटकन पूरी झाल्यावर किती समाधान वाटत ह्याचा अनुभव त्यावेळी मला जाणवत होता 


Friday, October 21, 2011

सौनिक-३

पूर्वार्ध
"रोहित ....चल वर ये.....आपल्याला बाहेर जायचंय..." आईने आवाज दिला..
मी सगळ्यांना सांगून वर आलो...आम्हाला मामाच्या घरी जायचं होत..मी कपडे वगरे बदलले .....आणि आम्ही बाहेर पडणार तोच...बेल वाजली...मी दार उघडल.....पाहतो तर निधीची आई आली होती...
" काय रोहित ?? काय म्हणतोयेस??कसा चाललंय अभ्यास 
काही नाही काकू, मी मजेत, अभ्यास चालुये ठीक...
आई आहे?
हो आहे न .....ए आई...जोशी काकू आल्या आहेत.."
आई बाहेर आली..." या न वाहिनी..काय झाल??
आहो काही नाही ...मी न जरा दवाखान्यात चालले होते ....माझ्या चुलत सासुबाईंना भेटायला ....निधी तुमच्याकडे थोड्यावेळ आली  तर चालेल न?"
मी ते ऐकल...माझे कान आईकडे टवकारले..
ते काय आहे न वाहिनी , मी रोहितच्या मामाकडे निघाले होते..पण ठीक आहे निधी जर आमच्याबरोबर येणार असेल तर येऊ दे...तुम्ही जा दवाखान्यात..."
निधीच्या आईने तिला आवाज दिला..."निधी ....जरा वर ये पटकन.." तू काकूंबरोबर थांबणारेस का थोड्यावेळ..
?? मी दवाखान्यात जाऊन येते..
उम्म्म ठीक आहे आई....तू जाऊन ये...मी थांबेन काकूंकडे ...... 
मी  आपला लक्ष्य नाही आहे हे दाखवण्यासाठी....मासिक वाचत असल्याच नाटक करत होतो....आईने मला आवाज दिला...."रोहित, इकडे ये जरा...निधीला तुझी रूम दाखव...मी निधीला आत घेऊन गेलो...

Wednesday, October 19, 2011

सौनिक-२

पूर्वार्ध ...
 
"मला कोणी आवाज का नाही दिला??"...मी पण रोज येते माहिती आहे ना तुम्हाला..??
पीयू तू पण आवाज नाही दिला मला??....
अरे निधी...माफ कर यार....गलती होगयी जो तुझे आवाज नही दिया....sorry yar..चल आ जा न अब....
निधी कोणाच्या team मध्ये? .....अमितने हळूच माझ्याकडे पाहिलं...
कोणी काही बोलायच्या आत मी म्हणल....."toss करूयात"
त्याप्रमाणे आम्ही toss केला....प्रणव ने नाण फेकल...मी म्हणल..."heaads!!"
मनापासून  वाटत होत..निधी माझ्या team मध्ये यावी..आणि अमितचा आवाज आला..."heads!!"
मी toss जिंकलो होतो...शेवटी खेळ सुरु झाला...मी captain होतो..आम्हाला पहिले लगोरी फोडायचा chance मिळाला होता...मी ball हातात घेतला....पहिल्याच झटक्यात लगोरी फुटली...पण आता जिंकण्यासाठी ती परत लावण पण महत्वाच होत...ते पण कुणी out न होता..मी ६ पैकी ४ फरश्या लावल्या होत्या...२ लावण बाकी होत...तेवढयात ball प्रणवच्या हातात गेला...निधी अगदी त्याच्या समोर उभी होती...तो निधीला नक्की  out करणार हे माझ्या लक्षात आल...आणि पटकन मी ओरडलो...
"निधी.....मी लावतो...तू ball कडे बघ...अस म्हणताच तीच प्रणवकडे लक्ष गेल...आणि त्याने नेम धरून मारलेला ball तिने चुकवला...
आम्ही पूर्ण लगोरी रचली...खेळ संपला....निधी माझ्या जवळ आली आणि म्हणाली...thanx रोहित...मी मनात म्हणल...."anything for you. mam"!!!!!!!!!

Tuesday, October 18, 2011

सौनिक-१

पूर्वार्ध.....
संध्याकाळचे ५:३० वाजले होते..सूर्याने नुकतीच आपली तीव्रता कमी केली होती...मी नेहमीप्रमाणे अभ्यास उरकून galary मध्ये आलो...नुकतीच समोरची शाळा सुटली होती..मुल घरी चालली होती...जेष्ठ मंडळी फिरायला निघाली होती..तेवढ्यात आईने मला आवाज दिला...
" रोहीत, अरे चहा झाला रे....ये लवकर....परत त्यावर साय धरेल..."
   आलो आई...."म्हणून मी आत गेलो....माझ्या मित्रांचा खेळायला बोलावण्यासाठी कधी पण आवाज येण अपेक्षित होत..म्हणून मी घाईघाईने चहा पेयला...पटकन हातपाय धुतले....आणि तयार झालो...तेवढ्यात आई म्हणाली...
"आज लवकर ये जरा...आपल्याला बाहेर जायचय"
बर येतो ......म्हणून मी खाली गेलो 
आज सगळे (??) आले होते...अमित, प्रणव ,राहुल ,पीयू ,पूजा , प्रीतेश 
 आणि मी 
आम्ही लगोरीसाठी team पाडायला सुरवात केली...दोन्ही teams तयार झाल्या आणि तेवढयात आवाज आला...
" अरे थांबा ....मी पण खेळणारे...
   मी मागे वळून पाहिलं...ज्या व्यक्तीची मी आतुरतेने वाट पाहत होतो...ती आली होती...!!!!

Saturday, October 15, 2011

ओंजळ.....२

मुंबई हे शहरच अस आहे...एका नाण्याच्या दोन बाजू म्हणतात न अगदी तसं......एका बाजूला सगळी रोषणाई..मोठे मोठे towers, पूर्ण अंग झाकण्यासाठी कपडे घेयची ऐपत असताना सुधा छोटे छोटे कपडे घालणारे लोक तर  दुसऱ्या बाजूला तेवढाच अंधार , अगणित झोपड्या, आणि ऐपत नाही म्हणून कसे बसे अंग झाकणारे लोक.....हे सगळे विचार त्या मुलाच्या बोलण्याने माझ्या मनात सुरु झाले होते..रवीला कधी आईच प्रेम मिळाल नाही...वडिलांचा आधार मिळाला नाही....हे कुठ तरी सारख जाणवत होत....त्या दिवशी मुद्दाम मी त्या चहाच्या टपरीवर गेलो...मला रवीला भेटायचं होत...बसलो..एक नवीनच मुलगा आला ...मला वाटल रवी दुसरीकडे कुठे असेल...म्हणून मी त्या नवीन मुलाला एक चहा आणायला सांगितल....मी रवीला शोधत होतो..तो मला कुठेच दिसत नव्हता...तेवढ्यात तो मुलगा चहा घेऊन आला...शेवटी मी त्याला विचारल अरे रवी कुठे आहे...?? दिसत नाहीये आज....
तो मुलगा म्हणाला...त्याला साहेबांनी काढून टाकल कामावरून...तो घरी आहे...
" मी म्हणल का रे? काय झाल?? 
काही नाही साब..उसको हमारे साब ने बहोत मारा....बहोत सारी गालिया दी...इसलिये वो काम छोडके चला गया...?
मारा ?? क्यु?? 
अब क्या बताये साब...एक आपके जैसे साबनेही राविको कपडे और कुच चीजे लेने के लिये..कुछ पैसे दिये थे...हमारे साबने वोह देख लिया था ......वोह पैसे हमारे साबने साबने उससे जबरदस्ती ले लिये तो उसने साब को कहा की येह मेरे पैसे हैन तो हमारे साबने  उसे बहोत मारा...
मी हे ऐकल...मनात खूप कालवाकालव झाली.....मनात म्हणल....काय देवा हे...काही लोकांना तू ओंजळ भरून भरून देतोस आणि काही लोकांच्या भरल्या ओंजळीतून काढून घेतोस???

Wednesday, October 5, 2011

साहेबा ....

इन हवाओं ने कहा 
तेरे साँसों का पता 
जान हैं तू मेरी, जान ले ये साहेबा  

मेरी निगाहे, तरसी यह बाहें
काटे कटेना, अब तो यह राहें 
मेरी दुआए, उसकी सदाए 
मिलके तुझे अब मुझासे मिलाए 
उसकी मरजी को तू ऐसे न ठुकरा 
साहेबा ...

तेरी तमन्ना, तेरे वोह अरमा 
लागे मुझे अब सारे वोह तनहा
सुन ले तू  दिल का जो हे कहना 
अब तो उसे भी मेरे बिन ना रहना 
मान ले अब तुजे प्यार हैं होगया 

साहेबा