Wednesday, August 29, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली.....५

" हेलो नेहा, कुठपर्यंत आली आहेस?
  मी कल्याणला पोह्च्लीये...तू कुठे आहेस?
  मी आलोय दादरला.....इस्टलाच उतर....मी थांबलोय platformवर"
  पहाटेचे ५ वाजत होते...मी कसे बसे डोळे उघडे ठेवत होतो...तेवढ्यात  announcement झाली...ट्रेन वेळेवरच येणार असल्याचे त्या बाईने सांगितले.....पहाटेच दादर स्टेशन म्हणजे तर बेघर लोकांच वसतिगृहच होऊन जात.....जिथे जागा मिळेल तिथे लोक झोपतात...जे मिळेल ते खातात......हे सगळ पाहून खरच त्या लोकांची दया येते....सगळ्या गोष्टींच होणार बाजारीकरण आणि त्यामुळे आयुष्याचा घसरत चाललेला भाव....हीच त्यामागची कारण.....तेवढ्यात पुन्हा announcement झाली....मी A/C च्या बोगी येतील अश्या ठिकाणी जाऊन उभा राहिलो....ट्रेन आली...हळू हळू लोकांनी उतरायला सुरवात केली....बराच वेळानंतर नेहा उतरली....तिने आज मोरपंखी रंगाचा ड्रेस घातला होता...केस मोकळे सोडले होते...कानात मोरपंखी रंगाचेच मोठे रिंग घातले होते...थोडक्यात काय तर ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती....मी पटकन तिच्या दिशेने धावलो....तिने मला पाहिलं....
" hi jaan....good morning...मी तुझी झोप disturb केली ना.....sorry..
  its ok shona......आणि मला तर तू केव्हाच disturb  केल आहेस.....त्याची सुरवात ह्याच स्टेशन वर झाली  होती....आठवतंय?
हो..न आठवायला काय झालं...तू नाही का ९:३० ची लोकल पकडायला चक्क सकाळी लवकर उठय्चास....मी पण तुझ्यासाठी जागा पकडून ठेवायचे....
काय मस्त दिवस होते न त शोना ....
hmmmm.... पण आता पण मस्तच आहेत की....आज परत आपण त्याच स्टेशनवर आहोत....वेळ थोडी वेगळी आहे....पण आता आपण जाणार कुठे आहोत.....?
मी परेलला हॉटेल केलाय बुक...
चला मग जाऊया आता...थोडा पडून मग मलाही जायचय अंधेरी ....मग त्यानंतर शॉपिंग पण करायचय...अरे हो आईंना सांगून टाक न...मी पोचले ते...आणि सगळ्यात पहिले .....पाणीपुरी खाऊयात...
नेहा??....पाणीपुरी??  पहाटे ५:३० वाजता? शुद्धीवर आहेस ना?
अरे , असं कुठ लिहलय का की सकाळी ५:३० ला पाणीपुरी खाऊ नये म्हणून?
आग पण ही काय वेळ आहे का?
हे  बघ तुला नसेल खायची तर नको खाऊस, मी खाणारे....पैसे दे मला...
नेहुडी...आग ऐक न जरा...आता नको ना...आपण संध्याकाळी पक्का खाऊयात...
पैसे दे....
मी गुपचूप खिशातून ५० ची नोट काढून दिली आणि नेहाची bag  धरून उभा राहिलो...


  

Wednesday, August 22, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली....४

"मुंबई?, सोना खेचतियेस न माझी?......काये म्हणजे?....
 अरे राजा, तुला मागे एवढा मोठा आवाज येत नाहीये का?... मला काय करायचं तुझी मस्करी करून?
तसं नाही ग राणी...पण आधीच मला जुन्या आठवणींनी कावरबावर केलाय त्यात आजून तुझी मस्करी add  झाली तर मग कसा होईल ?
काही होणार नाही....मी ५ वाजता पाहटे पोहोचतिये  दादरला...तू येतोयेस मला घेयला...
काय?....ठीके मी येतो ५ वाजता दादर....
चल ठेवते फोन आता....सारखा आवाज जातो-येतो आहे....
 बर चल  bye"
 असं म्हणून मी फोन ठेवून दिला.....तेवढ्यात मला समोरच बांगड्या आणि कानात्ल्यांच दुकान दिसलं...मी धावत तिथे गेलो.....तिथे बरीच गर्दी होती....मी तसाच आत घुसलो.....तिथे मस्त मोरपंखी रंगाचे  खडे असलेल्या बांगड्यांचा सेट होता....मी तो उचलला.......त्या दुकानदाराने तेवढ्यात मला टोकल आणि म्हणाला ....
"साब वो बिका हुआ है...आप दुसरा देख लीजिये 
  अच्छा, फिर मुझे ऐसाही दुसरा सेट दे दो भाई 
  इसमे एक हि सेट आता है सरजी...आप कोई दुसरा पसंद करलो 
  क्या भाई तुम भी..किसने लिया है येह्वाला 
 वो साबजी ने..... जो अंदर ड्रेस मटेरीअल देख रहे है"
 तेवढ्यात मला तश्याच प्रकारचे खडे असणारा पण मारून रंगाचा बांगड्यांचा सेट दिसला....मी तो उचलला ...आणि म्हणल 
"ये कितने का है?" 
 ये २८० का है....
क्या? इतना मेहंगा क्यू?
माल देखिये न साब....पुरा गोल्ड प्लेटिंग किया हुआ है....
अच्छा  ठीक है देदो ये"
मी तो सेट घेतला...तेवढ्यात सुरेशचा फोन आला....ते चर्चगेटला पोहचले होते....मी त्यांना बाहेर येयून थांबायला सांगितलं.....आम्ही बाहेर भेटलो....तिथून taxiनी थेट सम्राटला गेलो...तिथे मस्त गुजराथी थाळी मागवली....एवढे सगळे पदार्थ एका ताटात पाहून तो client तर चाटच पडला होता बहुदा....त्याला काय काय खावं आणि कशाबरोबर खावं हे काळतच नव्हत...पाण्याऐवजी ताक देणारे एकमेव हॉटेल असाव असं मला पण वाटत होत...नेहाची आवडती उन्दिओची भाजी होती...तिला आणि मला आवडणारी कढी होती....असा विचार करत असतानाच माझा फोन वाजला..
"हेलो,
हेलो, अरे आई बोलतीये.....नेहा मुंबईला येयला निघालीये...
हो माहितीये मला....तिने फोन केला होता....
आता ती आल्यावरच जां सिद्धिविनायकाला नाहीतर एकटाच जाऊन येशील..
आई हे सांगायला तू इतक्या रात्री फोन केला आहेस?
हो कारण मला माझ्या मुलाबद्दल पूर्ण खात्री आहे....तुझ्या काही हे लक्षात येणार नाही म्हणून आठवण करून देयला फोन केला...जेवण झालं का?
हो आई आताच झालं....
बर मी नेहाला तस सांगितलं आहेच पण परत तुझ्या कानावर घालते...येताना तिच्या आईसाठी छानसी साडी घेऊन या...त्या येणारेत न पुढच्या आठवड्यात...मला आणू नका....खूप साड्या आहेत...
आई आग साडी तिथे नाही का मिळत....
इथे महाग आहे....तू गुपचूप सांगितलेलं कर...नेहा आणेलाच....पण उगाच तिला बोलू नकोस...तिला हवी ती आणि हवी तशी साडी घेऊ दे....
बर बाबा....तुम्ही ना...चल आता ठेवतो....
bye"
 माझं हे सगळ बोलण ऐकून सुरेश गालातल्या गालात हसत होता...मी मात्र आता पूर्णपणे मनाची तयारी केली होती....नेहा येणार होती....म्हणजे आता ती तीची आणि आईची असं दोघींचं शॉपिंग करणार हे नक्की होत.....

     

 


Saturday, August 18, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली....३

"हेलो , अरे सुरेश, आहात कुठे तुम्ही? मी किती वेळापासून चर्चगेटला थांबलोय..?...
अरे,  पोहचतोच आहे रे....दादरला आहे...
ok, मी वेस्टला थांबलोय...बाहेर आलास की फोन कर...."
बर  बर...
फोन बंद करून मी तिथेच स्टेशनवर एक बाकावर बसलो...दोन मिनिट डोळे मिटले...आणि ते जुने दिवस आठवू लागलो....ती ९:४५ ची ठाणे लोकल.....माझी तीच लोकल पकडायची घाई....नेहाच मला त्याच लोकल मध्ये भेटण....सगळ कस आकस्मित होत...कधीही अश्या गोष्टींची अपेक्षा मी केली नव्हती....पण त्या एकामागोमाग एक घडत गेल्या...मग मी काही गोष्टींची अपेक्षा करू लागलो...त्यापण माझ्या मनाप्रमाणे घडू लागल्या...आणि अचानक एक गोष्ट अपेक्षेपेक्षा वेगळी घडली की मी ह्या सगळ्या गोष्टी विसरायचं ठरवलं.....पण आज इथे marine  driveला आल्यावर परत त्या सगळ्या अपेक्षा, आठवणी जाग्या झाल्या...रात्रीच्या सुन्न एकांतात अचानक पैजणांचा आवाज आल्यासारख झाल होत....आवाज तर येत होता पण तो आवाज करणारी पैंजणे मात्र गवसत नव्हती....आयुष्य जणू डिंकासारख झाल होत....वेळेला घट्ट चिटकून बसलेलं....सगळ असूनाही काहीतरी नसल्याची सल सारखी बोचत होती....पण मी हे सगळ मनात कोंडून ठेवलं होत....तेवढ्यात परत माझा फोन वाजला....ह्यावेळी आईचा फोन आला होता...
" हा बोल आई...
   कुठे आहेस? झाली मीटिंग व्यवस्थित ? काही फोन आला नाही म्हणून विचारलं...
   हो मस्त झाली मीटिंग....आता चर्चगेटला आहे...त्या clientला जेवायला घेऊन जायचय न म्हणून थांबलोय....
   बर आरे येताना सिद्धिविनायकाला जाऊन ये रे ...बर्याच वर्षांनी गेलायेस मुंबईला, म्हणून म्हणल सांगाव   खास फोन करून...
     मी जाणारच होतो आई... ठीके ते लोक येतील आत्ता बहुतेक त्यांचाच फोन येतोय...मी करतो परत तुला फोन , ठेवू आता?
     बर बर .....सांभाळून राहा....
    bye..."
फोन  ठेवला....पाहतो तर काय नेहाचे ५ missed call.... मला नेहमी न उलगडलेला प्रश्न आहे की आई आणि नेहा मला एकाच वेळी कसाकाय फोन करतात....
मी परत नेहाला फोन केला...
" हेलो,
  काय हेलो?
  अरे आपली बायको आहे , तिला आपली काळजी आहे , लक्षात आहे की विसरलास? 
अरे सोना , मी  marine driveवर आलोय...म्हणून मी विसरून गेलो ....कारण मी आपल्या जुन्या आठवणीत रमून गेलो होतो...तू आजवरच मला दिलेलं सगळ्यात रोमांटिक गिफ्ट आठवत होतो...
बर बर...आता मस्का पुरे....मला नाही केलास ते ठीक आहे पण आईंना केलास ना फोन?  त्या जास्त काळजी करतात? 
तिचाच आला होता आता फोन जेव्हा तू मला ५  वेळा फोन केलास....तू आहेस कुठे पण....??
ट्रेनमध्ये?
कुठे चाललीयेस?
मुंबई...."
    


 

Tuesday, August 14, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली.....२

तेवढ्यात माझा फोन वाजला...एकदम दचकलो ....पाहिलं तर सुरेशचा फोन होता......माझा ऑफिसचा कलीग ....मी फोन उचलला 
" हेलो, काय रे सुरेश?
 समीर आहेस कुठे?  केव्हाचा फोन करतोये?  उचलत का नाहीयेस?  काय आहेस कुठे? 
 अरे काही नाही.....सोड बोल न....काय काम आहे?
अरे , काय समीर विसरलास न?...आज आपल्याला इथल्या clientला पार्टीला नेयचं होतं न.....मीटिंग नंतर नाही का आपण बोललो होतो.....तू आहेस कुठे?
मी आता चर्चगेटला आहे.....अरे यार मी जाम विसरलो.....बर कुठे जायचय आपल्याला, सांग मला, मी येतो तिथे.. 
अरे आता तूच तिथे थांब. आम्हीच येतो तिकडे. मग सम्राटलाच जाऊ जेवायला.
बर, अरे पण त्याला आवडेल का सम्राट ?
अबे खाईल न.....तसही त्याला काय कळतंय पंजाबी आणि थाळीतला फरक...."
बर या मग...मी इथेच थांबतो..." असं म्हणून मी फोन ठेवून दिला....डोक्यातल विचारांच चक्र मात्र तसच चालू होत....असं वाटत होतं की, सतत कोणीतरी माझ्याबरोबर हात धरून चाललंय .......किंबहुना ह्या जागेला मला एकट्याला असं इथे चालताना  पहायची सवय नव्हती म्हणून असेल कदाचित.....पण  असो घडणाऱ्या गोष्टींना फक्त पहात राहण्यापलीकडे तेव्हा माझ्या हातात काहीही नव्हत.....लोक नेहमी म्हणतात प्रत्येक मुंबईकराच स्पिरीट खरच अफाट आहे.....पण प्रतेय्क मुंबईकराची सल्ण्याची क्षमताही अफाट आहे ह्याचा प्रत्यत त्या दिवशी मला  marin driveवर मिळाला.....

Monday, August 13, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली......१

आज खूप दिवसांनी MARINE DRIVE वर आलो होतो......ऑफिसच्या कामासाठी मी मुंबईला आलो होतो.......एक विलक्षण आनंद पण होता ....पण एक हुरहुर सारखी बोचत होती......की मला आनंद का होतोय ?.......तेव्धाय्त माझी नजर त्या हॉटेलवर गेली.....जिथे मी माझ्या आयुष्यातला आजवरचा सगळ्यात रोमांटिक वाढदिवस साजरा केला होता.......मी तिथे गेलो......सूर्य मावळला होता......संधिप्रकाश जणू रात्रीची चाहूल देत होता.....मी त्या हॉटेलमध्ये जाऊ लागलो.....मी भूतकाळात केव्हाच हरवलो होतो. आजवर ह्या जागेन मला नेहमी दिलच होत........पण आज खरच मी निर्मळ मानाने आलो होतो.....काहीही न स्वीकारण्याच्या आशेने......फक्त एकच गार्हाण घेऊन...की आजवर दिलेली कुठलीही गोष्ट ह्या जागेनी कधी परत घेतली नाही....मग ती एकच गोष्ट का हिरावून घेतली.......तेवढ्यात त्या हॉटेलच्या वाटेवरचे दोन्ही बाजूचे दिवे लागायला सुरवात झाली.....जणू खरच मी भूतकाळ जगत होतो......मी त्या वाटेच्या शेवटी पोहचलो......तिथे मात्र काळोख  होता आणि माझ्या तोंडातून चटकन निघून गेल......

"नेहा " ......