Saturday, July 30, 2011

गोष्ट लोकलमधली-२२

तेवढ्यात रोहीत्या म्हणाला...
अरे सम्या....आम्ही पण आहोत बरका इथे...आणि नुसते आम्हीच नाही तर काका काकुपण आहेत इथेच..."
तेवढ्य नेहाचे आई बाबा पुढे आले....आमी दोघही पुढे गेलो आणि त्यांना नमस्कार केला....
"सुखी रहा, आम्ही खूप खुश आहोत...कारण तुम्ही खूप खुश आहात...नेहाचा जेव्हा मला फोन आला आणि तिने मला ह्या surprise  party बद्दल सांगितलं तेव्हा मी तिला चटकन हो म्हणल"...नेहाचे बाबा बोलत होते....
मी नेहाकडे पाहिलं आणि म्हणल..
"नेहा हे सगळ तुझ डोक आहे तर...
नाही...मी फक्त ह्यात actor आहे...ह्याच direction तर वेगळ्याच व्यक्तीच आहे..
कोणाच?
guess कर....
आता सांगून टाक न नेहा...
हिंट देऊ?....तू त्या व्यक्तीशिवाय जगूच शकणार नाहीस...
हेहेहे नेहा किती सोपं आहे हे ओळखण ....आई....right ?
बरोबर....त्यांचीच होती हीं idea...
मी आईकडे धावत गेलो....तिला नमस्कार केला....तिच्या डोळ्यात पाणी आलच होत...ते पुसत मी म्हणल...आई कस काळत ग तुला माझ्या मनातल....???
बस पुरे....जास्त लाड नकोयेत...तुझी नेहा तुझ्यासारखीच आहे भित्रट...!!
नेहापण तिथे आली....आईने तिला पण जवळ घेतलं....आणि म्हणाली...साडी खूपच छान आहे...माझा आवडता रंग आहे...नेहाने माझ्याकडे पहिला आणि खुदकन गालात हसली....
नंतर आम्ही सगळे....त्या हॉटेलमध्ये गेलो...माझ्या सगळ्या मित्रांनी cake आणला होता...मी,नेहा आणि आमचे आई बाबा अश्या सगळ्यांनी मिळून तो कापला....खूप धमाल केली...सगळीकडे कस आनंदाच जणू नंदनवनच झाल होत...marine drive ने परत एकदा अविस्मरणीय संध्याकाळ मला दिली होती..
  सगळ झाल्यावर नेहानी gifts वाटायला सुरुवात केली..तिने आईसाठी तिच्याचसारखी अगदी same साडी आणली होती...ती तिला दिली...बाबांना छानस vollet आणलं होत...तिच्या आईला सुद्धा साडी आणि बाबांना parkerch पेन आणल होत...रोहीत्या आणि माझ्या friends साठी आमचा group फोटो असलेला मग दिला..तिच्या friendsla पण तेच दिल ...सगळे झाले....मीच राहिलो होतो...मी आपली आतुरतेने वाट पाहत होतो...पण नेहानी माझ्यासाठी काहीच आणल नव्हत.....तेवढ्यात नेहाने माझा हात धरला....मला view point च्य इथे नेल....खाली सुंदर golden neckless चकाकत होता....तिने माझा हात तिच्या कंबरेवर ठेवला ....माझ्या जवळ आली...आणि मला माझ गिफ्ट मिळाल.... 


Saturday, July 23, 2011

गोष्ट लोकलमधली-२१

मी त्या अस्ताकडे जाणाऱ्या सूर्याकडे बघत उभा राहिलो..तेवढ्यात माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला....
" नेहा...किती उशीर ?? कुठे होतीस तू.??" असं म्हणत मी मागे वळलो...आणि पाहतो तर काय रोहीत्या..??
"काय रे तू आणि इथे??
का? मी येयू शकत नाही का इथे..?? तुझी नेहाच का फक्त?
नाही रे असं काही नाही....ते सोड..काय म्हणतोयस?
काही  नाही रे..म्हणल बऱ्याच दिवसात आपण बोललो नाही म्हणून आलो...चल ना एक फेरी मारुयात..
अरे खर तर ना मी नेहाची वाट बघतोय....ती येण्यातच असेल आता...परत आमची चुकामुक होईल...
अरे एवढ काय... ती समजा आली तर फोन करेल ना....तुला भेटल्याशिवाय थोडी जाणारे...
बर चल " असं म्हणून आम्ही निघालो...बऱ्याच दिवसांच्या गप्पा राहिल्या होत्या...प्रॉफ लोकांबद्दल, स्वतःच्या guide बद्दल चर्चा सुरु झाल्या...वेळ कसा गेला कळलच नाही...शेवटी परत फेरी मारून आम्ही त्याच जागी परत आलो..अंधार झाला होता...गार्डन मधले दिवे आजून का लागले नव्हते कुणास ठाऊक...? तेवढ्यात रोहीत्यचा फोन वाजला.....तो बोलत बोलत जरा लांब गेला...आता मात्र फारच उशीर झाला होता...नेहाचा आजून पत्ता नव्हता...मला आता काळजी वाटायला लागली होती...मी तिला फोन लावला...तर switchoff येत होता....माझी काळजी आणखीच वाढली....तेवढ्यात गार्डन मधले दिवे लागायला सुरुवात झाली...मी जिथे उभा होतो त्याच्या समोरच एक वाट होती आणि त्याच्या दोन्ही बाजूला दिवे होते...ते दिवे हळू हळू लागू लागले.....त्या वाटेवरून कोणीतरी येतंय असं अंधुकसा भास मला होऊ लागला होता ..ती व्यक्ती जशी जशी पुढे येयू लागली...तसे तसे त्या वाटेवरले दिवे लागत जात होते...आणि जेव्हा सगळे दिवे लागले तेव्हा ती व्यक्ती माझ्या मिठीत होती...आर्थात ती नेहा होती...आज ती काय दिसत होती...तिने चक्क साडी नेसली  होती...मरून रंगाची...केसाची एक बट हलकीशी चेहऱ्यावर येत होती...कानात छोटेच पण खड्यांचे झुमके घातले होते...हातात मी दिलेलं ब्रेसलेट होतच आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे हातात खूप साऱ्या पिशव्या होत्या...मी तर ह्या सगळ्यात पार विरघळून गेलो होतो...मला फक्त नेहाच दिसत होती...नंतर टाळ्यांचा आवाज येयू लागल्यावर मला कळल की, एकटी नेहा आली नव्हती...माझे सगळे मित्र...तिच्या खास मैत्रिणी आणि माझे आणि तिचे दोघांचेही आई बाबा समोर उभे होते.....इतक romantic surprise आणि ते पण marine drive च्या साक्षीने ....खरच माझे  डोळे नकळत पाणावले...मी नेहाला आजून घट्ट मिठीत आवळल आणि म्हणल "Thanx" !!!!!!!

Sunday, July 17, 2011

गोष्ट लोकलमधली-२०

नेहानी बोलावल्याप्रमाणे मी हॉटेल मध्ये पोचलो..मी काहीच घेऊन गेलो नव्हतो....hanging garden  वरून सुंदर view दिसत होता.....marine drive चा "गोल्डन नेकलेस " अगदी मनमोहक वाटत होता....मी hanging garden वर समुद्राकडे पाहत नेहाची वाट बघत बसलो होतो....तेवढ्यात माझा फोन वाजला....रोहीत्या होता...मी फोन घेतला ....
" हेलो, काय रे काय चाललंय?
   अरे काही नाही तू कुठे आहेस आत्ता ???
    अरे जरा बाहेर आहे.... marine drive वर आहे...का रे काय झाल..?
    काही नाही रे सहज केलेला फोन....
    तेवढ्यात नेहापण मला call करत होती..
     रोहितचा call waiting वर टाकला आणि नेहाचा फोन घेतला...
     हेलो,  काय आहे हे नेहा....कुठे आहेस तू..?? मी तुझी केव्हापासून वाट पाहतोय..?? कुठे आहेस तू?
    अरे राजा, आधी मला सांग, तुझ्या आईला हिरवा रंग आवडतो की मरून??
    काय?? आता आई कुठे आली मध्ये?? सोना काय चाललंय तुझ ?? सांगशील का जरा,  मला असा इथे   बोलवून तुझा काय चाललंय?
    अरे हो जरा थांब....आधी विचारल त्याच उत्तर दे...कोणता रंग ?
    तू काही ऐकणार नाहीयेस....मरून.....खुश?
    thanx dear..... असं म्हणून तिने चक्क फोन कटच केला...
     परत आपला मी समुद्राकडे पाहत उभा राहिलो...
    काही वेळानी पुन्हा नेहाचा फोन आला?
   हेलो,  sorry dear, अरे तुझ watch कोणत्या कंपनीच आहे titan ki timex??
   सोना अरे काय चाललंय हे सगळ?? तू नक्की काय करतीएस?? कुठे आहेस तू?? माझ घड्याळ titanch आहे.
    बर ठीक आहे..असं म्हणून तिने पुन्हा फोन cut केला.
  आता मात्र माझा डोक सरकल होत....मी स्वतच नेहाला फोन लावला...पण ती इतकी शहाणी होती कि फोन उचलून कट करत होती....माझे पैसे जात होते...
   वाट पाहण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही हे लक्षात आल आणि मी मावळत्या सूर्याकडे बघत डोळे मिटून विचार करू लागलो ..... 
  
 

Saturday, July 9, 2011

ओले क्षण.....

ओली  हि हवा....धुन्द ह्या दिशा....स्वत्व चिंब झाले असे
ओल्या ह्या  क्षणी,  माझ्या गं  मनी , दिसे तुझे चित्र कसे ???

हिरव्या ह्या वाटेवरी  शोधले तुला
विचारले वाऱ्यासही माझ्या फुला
आसुसल्या स्पर्शासावे ,बोलक्या गंधासवे, वाहिले मन खुळे
ओल्या....

धावली सर् एकटी हाक ऐकुनी
काढले मम प्रेम तिने शोधुनी
धावुन येताच तू , मिठीत अन्  हसताच तू , जाहले पूर्ण बघ चित्र ते ....    
ओल्या....

                                                                                                  सौनिक

Friday, July 8, 2011

स्वप्न...

स्वप्न...

त्या क्षितिजावर एक गोजिरे स्वप्नं पाहिले होते..
नाजूक काया, ओठ लाजरे...नयन बोलके होते....

उजाडलेल्या मनावारले...थेंब मधाचे होते...
कुजबुजलेल्या गोष्टींमधले रंग उद्याचे होते...

कसे कळेना भाव मनीचे तिला उमगले होते..
शब्दांमधले अर्थ तिने तर कधीच जाणले होते...

डोक्यामधले प्रश्न सारखे उत्तर मागत होते...
तिच्यालेखी हे सत्य होते वा फक्त स्वप्नच होते...

त्या क्षितिजाला माझे मागणे जेव्हा मागितले होते...
माहित नव्हते तिनेही तेव्हाच हात जोडले होते.....

                                                                 -सौनिक