Saturday, August 27, 2011

ओंजळ ...१

मुंबई शहर......त्यातलं छोटस खेड 'गोवंडी '....प्रचंड मोठी झोपडपट्टी.....चक्क २-२ मजली झोपड्या...जवळपास प्रत्येक घराला एक एक A/C....घराच्या मागे रेल्वे मार्ग.....ह्या सगळ्या रहाणीमानाला चांगल म्हणाव की वाईट .....काही कळत नव्हत...कारण वाइट म्हणाव तर त्या लोकांकडे सगळ काही होत....सगळ्या सुखसोई होत्या...आणि चांगल म्हणाव  तर अतिशय घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेच साम्राज्य पसरलेल होत....लोक कायद्यानुसार राहत होते की नाही हा तर दूरचा मुद्दा होता पण ते कसे राहत होते हाच महत्वाचा पेच मला पडला होता...हे सगळ पाहून माझी झोपडी ह्या शब्दाची व्याख्याच बदलून गेली....मुंबईतली झोपडी एकीकडे आणि इतर खेड्यातली झोपडी एकीकडे.....पण हे सगळ अतिशय दुर्दैवी असल तरी ते सत्य होत......सगळ्या धर्माची, पंथाची लोक तिथे राहत होती...त्यातच राहत होता एक १५ वर्ष्याचा मुलगा रवी...तो तिथेच समोर स्टेशन जवळच्या एका होटेल मध्ये काम करायचा....त्याला ३ बहिणी आणि १ भाऊ होता...सगळे त्याच्यापेक्षा लहान होते.....मी नेहमी त्या होटेल मध्ये चहा पेयला जात असे...
एकदा नेहमीप्रमाणे मी चहा पीत होत होतो....तेवढ्यात मला आवाज आला....
 "ए रवी....काम करणा हैन तो कर...वरना भाग यहा से....तेरे जैसे बच्चे रोज पैदा होते हैन और मर भी जाते हैन लेकिन उसकी  किसी को खबर भी नही होती... "
"माफ करो सेठ...ऐसी गलती दोबारा नही होगी......"
 माझ चहा वरच लक्ष केव्हाच उडाल होत..त्या मुलाकडे मी रोज पहायचो...त्याच्या डोळ्यात एक अजब चमक होती....हुशारी होती....पण त्याच बरोबर पोरकेपण पण होत...जबाबदारीच ओझ पण होत....मी त्यादिवशी त्यला गाठल आणि त्याच्याशी बोललो...
त्याला म्हणल..."ए रवी, काम ठीकसे क्यु नही करता??" हमेशा सेठ की गालिया खाता हैन?
क्या साब तुम भी शुरू होगये...जिसके दिन की शुर्वात हि गालिया सुनके होती हैन उसे अगर गालिया सुनी न दे तो दिन काटता नाही...."
लेकिन तू ये काम क्युन करता हैन? तेरी मां तुझे रोक्ती नाही?
त्याच्या डोळ्यातून पाणी आल.....पण चटकन त्यांनी ते पुसल आणि म्हणाला
मा? वोह क्या होती हैन साब?? ......मैने तो पेहला शब्द सिखा  वोह था 'सेठ'.....डोळे पुसत पुसतच तो हे बोलला......त्याच्या बोलण्यातला खोटेपणा त्या अश्रूंनी केव्हाच सांगून टाकला होता......
 

गोष्ट लोकलमधली-२४

 मुंबईत त्यादिवशी खूपच पाउस होता...ठीकठिकाणी पाणी भरायला सुरवात झाली होती....ट्रेन्स लेट धावत होत्या....आणि आदल्या रात्रीच आम्ही शोप्पिंग्ला जायचा प्लान केला होता....नेहा पुढच्या आठवड्यात बंग्लोरेला शिफ्ट होणार होती....हा लास्ट वीकेंड होता ती मुंबईत असतानाचा सो आम्ही हा प्लान केला होता.... मी सकाळी १०:३० च्या सुमारास दादरला गेलो....आम्ही दादर वेस्टला shopping करायचं ठरवल होतं...नेहा पण वेळेतच आली...आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो...पाऊसामुळे फारशी गर्दी नव्हती.... आम्ही प्रथम ड्रेसेसच्या दुकानात गेलो....मी नेहाला म्हणल  होत mall मध्ये जाऊ तिथे सगळच मिळत पण नाही.....४-५ दुकान हिंडलो...शेवटी एका दुकानात एक top तिला पसंद पडला......त्यानंतर आम्ही makeupचं समान खरेदी करायला गेलो...तिथे माझ काय काम होता कोणास ठाऊक पण नाही मी बरोबर पाहिजेच होतो.....त्यानंतर दादर स्टेशन जवळ लस्सी पेयली.....पण महत्वाची खरेदी आजून बाकीच होती...तिला माझ्याकडून गुलाबाच्या फुलांचा गुच्छ हवा होता...काय ह्या बायकांनाना केव्हा काय मागाव वाटेल ह्याचा काही नेम नाही.....शेवटी एका ठिकाणी तो फुलवाला दिसला.....त्याच्याकडून तो गुच्छ घेतला.....नेहाला म्हणल घे....झाल आता .......ती म्हणाली काय हे...नीट जरा प्रेमाने देना.....शेवटी मी एका गुडघ्यावर खाली बसलो ....हात पुढे केला .....तिने तिचा हात माझ्या हातात दिला......तिच्या हातात मग मी गुच्छ दिला ....सकाळची सगळी खरेदी संपली होती...आम्ही परत ट्रेन मध्ये बसलो होतो....सगळीकडे आनंद होता....पण मनात एक प्रकारची हुरहूर होती....प्रत्येक गोष्टीला काही न काही शेवट असतो....आमच्या गोष्टीचा शेवट काय असेल?? सगळ तर तसच राहणार होत...मी...नेहा...आमच प्रेम....ती ९:३० ची लोकल त्यामुळे मला चटकन जाणवल...अरे ह्या गोष्टीला शेवट तर नाहीच आहे....कारण हे सगळ आमच्या ह्या गोष्टीला नेहमी सुरूच ठेवणार आहे.......जिवंत ठेवणार आहे....

Saturday, August 13, 2011

गोष्ट लोकलमधली-२३

दिवस कसले पटापट जात होते...मला माझ्या projectchya कामासाठी IISc,Banglore ला जायचं असं नुकतच कळल होत..त्यानुसार मी tickits काढले. मी आजून नेहाला काहीच सांगितलं नव्हत. तिला माहीतच नव्हत की मी banglore ला जाणारे......त्यादिवशी आम्ही नेहमीप्रमाणे ट्रेन मध्ये भेटलो....तिने आज माझ्यासाठी प्रथमच गुलाब जाम बनवून आणले होते...ती म्हणाली,
" आज न मी तुझ्यासाठी काहीतरी आणलय...?
 "  हो..? हल्ली माझी फारच सेवा चाललीये ?? काय काही हवाय का?."..मी म्हणल
   जा बाबा , तुला न काही कौतुकाच नाहीये केल्याच....
   किती छान चिडतेस न तू सोना.....अग मी गम्मत करतोय गं....बोल काय आणलयेस
   ए मी ना तुझ्यासाठी गुलाब जाम आणलेत..मी स्वतः केलेयेत..
   हो का ...अरे वा ....ते खायचे पण आहेत का..???
   जा रे आता मी ना बोलणारच नाहीये तुझ्याशी....तुला ना बोलून काही उपयोगच नाहीये...
   okokok baba.....sorry...." असं म्हणून मी त्यातला एक गुलाब जाम उचलला....
  " वां काय मस्त झालेत....खरच खूप मस्त.... 
    नेहानी हळूच माझ्याकडे पाहिलं....तिच्या नाकावरचा राग तिला नको वाटत होता तरी केव्हाच उडून गेला होता.... ह्या सगळ्या उद्योगात परत मी नेहाला सांगायचं विसरलो की मी उद्या बंगलोर ला जाणार आहे ते.....आम्ही उतरलो ती तिच्या ऑफिस मध्ये गेली..मी IIT  मध्ये गेलो...
     दुसऱ्या दिवशी मी ट्रेन मध्ये बसलो...अजूनही मी नेहाला काहीच सांगितलं नव्हत.....ट्रेन सुटली.....ठाणे cross केल....नेहाचा फोन आला...
   हेलो , आज संध्याकाळी movieला जायचंय...मी tickits काढलेत....संध्याकाळी ७ चा शो आहे...आपण ६ ला स्टेशन वर भेटू....घाटकोपरच tickit मिळालय...ok bye.." असं म्हणून तिने फोन चक्क ठेवून दिला...
मी तिला परत call  केला...." हेलो नेहा, जरा ऐक , मी ट्रेन मध्ये आहे...बंग्लोरेला चाललोय...३ दिवसांनी परत  येणारे...so मला नाही गं येता येणार..हेलो हेलो??? नेहा??
तिने फोन केव्हाच कट केला होता......तिला माझा प्रचंड राग आला होता...एक तर मी तिला न सांगता ३ दिवसांसाठी बाहेर चाललो होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची tickits वाया जाणार होती...
मी तिला परत फोन केला
" नेहा जरा ऐक माझ...मी चुकून विसरलो तुला सांगायचं...आग काल खुपच गडबड झाली college मध्ये....घाईघाईत विसरलो गं...sorry  म्हणतोय न....."
"तेवढ्यात  seat no 86 येही है ना ?? असा एक बारीक आवाज आला .....मी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं....एक सुंदर तरुणी माझ्या शेजारी बसायला आली होती.....मी चुकून फोन कट केला आणि म्हणाल..
yeah....please have a seat...नेहाचा आता स्वतःहूनच फोन आला ...
"हेलो, आग चुकून कट झाला फोन....
तुझ्याबरोबर कोण आहे .....?
कोणी नाही...तेवढ्यात ती मुलगी म्हणाली....
hi, my name is shreya....
श्रेया ?? कोण श्रेया? समीर हे सगळ काय चाललंय...कोणाबरोबर चाललायेस  तू...???
आग सोना, ती मुलगी आता चढली आहे गाडीत, माझ्या शेजारच्या सीट वर आहे ...मग आता ती बोलल्यावर तर मला उत्तर द्याव लागेल ना...
ok ...पण फार उत्तर देवू नकोस नाहीतर ती प्रश्न विचारतच राहील....
मला खरच खूप हसू येत होत...मी म्हणल बर ठीक आहे मी नाही जास्त बोलणार...खुश?
बर, ३ दिवस काय काम आहे तुझ तिकडे...?? लवकर ये....
बर बघतो....आता ठेवू का??
का ती श्रेया बोलावतिये का??
काये नेहा?? तू पण ना जास्तच कर्तीयेस आता
हो आता मीच जास्त करतीये आणि तू केलस ते...ते फार कमी होत नाही....?? असं म्हणून तिने फोन ठेवला...
      त्या दिवशी मला कळल की शक्यतो प्रेमात पडलेल्या मुलाच्या शेजारच्या सीट वर कधी सुंदर मुलगी येवू नये आणि जर आलीच तर तेव्हाच त्याच्या girlfriendचा फोन येयू नये.....कारण जर एकदाका तो फोन आला की तो फोन पूर्ण प्रवासभर येत राहतो....जस माझ्या प्रवासात झाल....