काळ ....सरत जाणारा.....
आयुष्यात रुतत जाणारा...
क्षणांशी स्पर्धा करणारा ....काळ
पक्ष्यांसवे सरकन उडणारा...
सरींसवे चिंब भिजणारा
अनोळखी वाटेवरती हात हाती देणारा ....काळ
क्षितीजापारी अथांग असणारा...
समुद्रापरी निवांत असणारा
वाऱ्याच्या प्रत्येक लाटेवरती वाहणारा ......काळ
डोळ्यातली सारी स्वप्नं जाणणारा
घडणारी हर गोष्ट पाहणारा...
जीवनातली प्रत्येक वेळ जगणारा.....काळ.
काळ.....नेहमी वेळेबरोबर राहणारा...
घड्याळाबरोबर घडणारा
नकोतीथे...नको त्यावेळी बदलणारा.....काळ.....
- सौनिक
mast ahe
ReplyDeleteबरोबर आहे...
ReplyDeleteनको तिथे, नको तेवा, नको तसा बदलणारा...
awesome lines.....
ReplyDelete