Friday, October 21, 2011

सौनिक-३

पूर्वार्ध
"रोहित ....चल वर ये.....आपल्याला बाहेर जायचंय..." आईने आवाज दिला..
मी सगळ्यांना सांगून वर आलो...आम्हाला मामाच्या घरी जायचं होत..मी कपडे वगरे बदलले .....आणि आम्ही बाहेर पडणार तोच...बेल वाजली...मी दार उघडल.....पाहतो तर निधीची आई आली होती...
" काय रोहित ?? काय म्हणतोयेस??कसा चाललंय अभ्यास 
काही नाही काकू, मी मजेत, अभ्यास चालुये ठीक...
आई आहे?
हो आहे न .....ए आई...जोशी काकू आल्या आहेत.."
आई बाहेर आली..." या न वाहिनी..काय झाल??
आहो काही नाही ...मी न जरा दवाखान्यात चालले होते ....माझ्या चुलत सासुबाईंना भेटायला ....निधी तुमच्याकडे थोड्यावेळ आली  तर चालेल न?"
मी ते ऐकल...माझे कान आईकडे टवकारले..
ते काय आहे न वाहिनी , मी रोहितच्या मामाकडे निघाले होते..पण ठीक आहे निधी जर आमच्याबरोबर येणार असेल तर येऊ दे...तुम्ही जा दवाखान्यात..."
निधीच्या आईने तिला आवाज दिला..."निधी ....जरा वर ये पटकन.." तू काकूंबरोबर थांबणारेस का थोड्यावेळ..
?? मी दवाखान्यात जाऊन येते..
उम्म्म ठीक आहे आई....तू जाऊन ये...मी थांबेन काकूंकडे ...... 
मी  आपला लक्ष्य नाही आहे हे दाखवण्यासाठी....मासिक वाचत असल्याच नाटक करत होतो....आईने मला आवाज दिला...."रोहित, इकडे ये जरा...निधीला तुझी रूम दाखव...मी निधीला आत घेऊन गेलो...

No comments:

Post a Comment