ही कसली अनाम ओढ़
सतत बिलगून असते
मन गाभाऱ्याच्या आत
ती सरकन कैसी शिरते
मग उनाड होते सारे
उन्मळून पडतो धीर
मनातील गोंधळ तेव्हा
नेमका होतो अधीर
अशावेळी स्मरतात
आईचे ते बोल
सावरावे ठेचण्याआधी
न पडता विचारात खोल
वावटळीत विचारांच्या
ती ओढच हरवून जाते
मन शोधत असते तेव्हा
एक अनाम अल्लड नाते
नात्यांच्या गुंत्यामध्ये
मी गुंततो पुन्हा जेव्हा
अवचित दिसते मजला
ती अबोल ओढ़ तेव्हा
मग कळते सारे सगळे
उलगडताच साऱ्या गाठी
ही तर ओढ़ होती
माझी तुझ्याचसाठी
- सौरभ नेने
सतत बिलगून असते
मन गाभाऱ्याच्या आत
ती सरकन कैसी शिरते
मग उनाड होते सारे
उन्मळून पडतो धीर
मनातील गोंधळ तेव्हा
नेमका होतो अधीर
अशावेळी स्मरतात
आईचे ते बोल
सावरावे ठेचण्याआधी
न पडता विचारात खोल
वावटळीत विचारांच्या
ती ओढच हरवून जाते
मन शोधत असते तेव्हा
एक अनाम अल्लड नाते
नात्यांच्या गुंत्यामध्ये
मी गुंततो पुन्हा जेव्हा
अवचित दिसते मजला
ती अबोल ओढ़ तेव्हा
मग कळते सारे सगळे
उलगडताच साऱ्या गाठी
ही तर ओढ़ होती
माझी तुझ्याचसाठी
- सौरभ नेने
खुप छान कविता आहे.आमच्या ब्लॉगल पण नक्की भेट द्या.
ReplyDeleteJIo Marathi