Saturday, April 30, 2011

गोष्ट लोकलमधली-९

     त्या दिवशी रविवार होता...दिवसभर आराम करून संध्याकाळी marine drivela जायचा बेत केला होता....त्याप्रमाणे दुपारी मस्त झोप काढली...५ वाजता चहा करून घेतला....आणि at around ६ वाजता मी दादरला गेलो....ट्रेन पकडली....चर्चगेटला उतरलो.....पोचेस्तोर ६:३० झाले होते....सूर्य केशरी रंग क्षितिजात उदार मनाने उधळत होता....हे ठिकाण मला नेहमी जणू सांगायचं...."मित्रा....बघ हे जग ना... ह्या किनार्यासारख आहे...त्याच्या समोरच त्याची मंजिल असते...पण तरी त्याला चंद्राचा आधार लागतोच ना त्या मंजिल पर्यंत पोहचायला...त्या जागेनी मला नेहमीच प्रोत्चाहन दिलेलं होतं.... नवी उमेद दिली होती...काही नवीन करण्याची...असो...थोड्यावेळ मी शांतपणे समुद्राकडे...त्याच्या अथांगतेकडे पाहत बसलो.....वेळ कसा गेला कळलच नाही....कारण ठिकाण marine drive ....आणि कानात गाणं "इन दिनो....."....कसं लक्ष्य असणार वेळेकडे......७:३० झाले होते....मी परत जाण्यासाठी चर्चगेट कडे जायला निघालो....स्टेशनवर पोचलो...tickit काढलं....आणि मुद्दाम slow...ट्रेन मध्ये बसलो.....मला तो दिवस आठवत होता..नेहासाठी मी कविता म्हणली तो...तेवढ्यात एक कानातले विकणारा डब्यात आला....सुंदर कानातले होते त्याच्याकडे....मी आईला घेयचे म्हणून शोधू लागलो...एक सुंदर जोड सापडला....मी घेतला..पण काय जणू मनात एक हलकासा विचार येऊन गेला...नेहासाठी घेऊ का..?? आणि मी घेतले पण....
          दुसर्यादिवशी...नेहा दादरला उभीच होती....मला जरा पोहचायला उशीर झाला होता...मी तिच्यासाठी कानातले घेतले खरे...पण तिला देयचे कसे...हा मोठा प्रश्न होता...ट्रेन मध्ये बसलो...आज ती जरा गप्पंगप्पच होती....मी हळूच कानातल्याच पाकीट काढलं..तिला म्हणलं..."नेहा....काय झालं?? आज गप्पं गप्पं?....ती म्हणाली काही नाही रे...आज visitors येणारेत...ऑफिसमध्ये...आणि घाईघाईत मी कानात्लेच घातले नाहीयेत...???...किती विचित्र दिसतेय मी...???" पुन्हा एकदा sixer मारायचा chance देवाने मला दिला होता...तिला म्हणलं...हे मात्र खरये कि तू खूप विचित्र दिस्तीयेस?? पण हे बघ...हे घे कानातले...मी आणलेत तुझ्यासाठी...तिने ते हातात घेतले...एखाद्या गायकाने सुंदर जागा घेतल्यावर....त्याला जसा आनंद व्हावा तसा तिला झाला होता...ती म्हणाली खूप सुंदर आहेत....ये आता तूच घाल माझ्या कानात.... मी हळूच तिचे केस बाजूला घेतले......कानातले घातले.....डब्यातले सगळे लोक आमच्याकडेच पाहत होते.....  

Tuesday, April 26, 2011

गोष्ट लोकलमधली-८

आणि finally भारत विश्वविजेता झाला.....सगळीकडे फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली...त्या रात्रीला दिवाळीच जणू रूप आलं होतं....आता मात्र खूप उशीर झाला होता...नेहाला घरी सोडायला जाण भागच होतं...आम्ही निघालो...रात्र झाली होती so आम्ही ट्रेननीच जायच ठरवलं.....दादरला पोचलो....कुपन पंच केले...आणि ट्रेनची वाट पहायला लागलो.....अचानक मला खूप मोठं झाल्यासारखं वाटत होतं...तेवढ्यात नेहा म्हणाली....सो Mr.Samir...एका मुलीबरोबर रात्री बारा वाजता दादर स्टेशनवर तुम्ही ट्रेनची वाट बघत होता हे तुमच्या आईला कळलं तर...???   मी तिच्याकडे खुन्नस देऊन पाहिलं....हे सगळे क्षण romantic आहेत हे कळण्याआधीच ते निसटत चालले होते...ट्रेन आली...आम्ही चढलो...तेवढ्यात माझा एक मित्र मला दिसला...खूप वर्षांनी तो भेटला होतां..आम्ही ९वी ला एकत्र होतो शाळेत...त्याच नाव..राहुल....थोडं बोललो वगरे...मी नेहाची ओळख करून दिली...मला हळूच बाजूला नेऊन राहुल म्हणाला...मस्त जोडी आहे...तीच का हि 'तूझ्या कवितांमधली .'..???तुझ्या ब्लोग्वरची...??? मी म्हणलं."हेहेहे....तू पण ना राहुल्या..अरे ती कविता आहे...तिला वास्तवापासून जितकं दूर ठेवशील तितकी ती खरी वाटेल मित्रा....आणि तू माझा ब्लोग वाच्तोयेस म्हणजे...thts gud.. तो म्हणाला अरे बरेच वाचतायेत....छान लिहतोयेस...चल माझं स्टेशन आलं...no दे तुझा पटकन...मी msd call देतो....
इकडे काय माहित ते कवितेच नेहानी कसकाय ऐकलं होतं...ती एकदम सुरु झाली...काय कविता??? सो Mr Sameer तर तुम्ही कवी आहात...ब्लोग लिहिता....आता कविता ऐकवा त्याशिवाय मी उतरणारच नाही....मी म्हणलं काय हे नेहा...आत्ता नाही...उद्या ट्रेन मध्ये....मी वहीच आणतो...तू वाच....no way आत्ता म्हणजे आत्ताच....ठीके...मी आठवू लागलो...

"मनातल्या मनात मी..काही बोलतो आहे..
स्वप्नातल्या त्या कळीचे नाव शोधतो आहे..

नाजूक त्या पाकळ्याशी खेळतो आहे...
उनाड त्या हासण्याशी भांडतो आहे...

गोंजारून त्या बटांना छेडतो आहे
ओठांवरील अबोल शब्द ऐकतो आहे

वार्यातल्या गंधासवे मी हिंडतो आहे
अवचित येयून गालांवरी मी तुझ स्पर्शतो आहे

तू इथे नाहीतरी, तुझ पाहतो आहे....
तव डोळ्यांमधील प्रेम सखे हे मांडतो आहे...."

तिने एव्हाना डोळे मिटले होते...त्या पापण्या जणू लाजून मला दाद देत होत्या...कविता संपली खरी...पण...माझ्या ब्लोगचा एक follower नक्की वाढला....एका अर्थाने...कवितेला खरी दाद मिळाली...होती...तिला घरी सोडलं....मी प्रथमच अशी कविता कुणासाठीतरी सादर केली होती...

Saturday, April 23, 2011

गोष्ट लोकलमधली-७

  आज मी खूपच खुश होतो...एकतर मनातून सारखं वाटत होतं की भारत world cup जिंकणार....आणि दुसरं म्हणजे मला तिच्या हातचं खायला मिळणार होतं....मी म्हणलं काय बनवतेस?? काय काय येत तुला?? ती म्हणाली पोळी सोडून सगळं येत...काय करू सांग???...." कर तुला काय करायचं ते...take the responsibility of the kitchen..i l take u thr and show u what is where..बाईसाहेबांना पोहे खायचा मूड आला होता...पण मला पोहे फार आवडतात..आणि माझी आई ते इतके चान बनवते कि ते मला तसेच perfect लागतात...मनात म्हणलं...आज ही पोह्यात नक्की fail होणार...since आई is आई..!!!!....पण खरी मजा तर कांदा कापण्यापासून सुरु झाली.....ज्या डोळ्यात मला फक्त उद्याची स्वप्नं पहायची इत्छा होती त्याच डोळ्यात मला पाणी दिसलं..मी खुदकन हासलो....अरे हसतोस काय...?? माझे हात मिरचीचे आहेत....पटकन ये आणि डोळ्यातलं पाणी पूस...कांदा खूपच जास्त तिखट आहे......इकडे तेव्हाच लंकेच्या डोळ्यात पाणी येयला सुरुवात झाली होती...दिलशान out झाला होता.....मी चटकन उठलो.....रुमाल घेतला...आणि....प्रथमच डोळे पुसायला माझे हात थरथर कापू लागले.....दिलशान out झाल्यामुळे बाहेर लोकांनी फटाके वाजवायला सुरुवात केली आणि एक फटाका खूपच जोरात फुटला.....मोठा आवाज झाला...(thank God!!!).....तिचं लक्ष विचलित झालं आणि तिचं सुरीने बोट कापलं....रक्त येयला सुरुवात झाली...मी पटकन हळद काढली...तिचा हात हातात घेतला...तिला म्हणलं...थोडं दुखेल....आणि तिच्या जखमेवर हळद लावली...ह्या सगळ्या गडबडीत...kadhaital तेल खूपच तापलं.....तिने फोडणी केली कांदा परतला आणि finaly पोहे तयार झाले...तोपर्यंत इकडे जयवर्धनेनी मारायला सुरुवात केली होती...एक number झालेत पोहे....मी म्हणलं......फक्त आमच्यात मीठ घालतात पोह्यात...ते असतं तर आणखी छान लागले असते...तिने माझ्याकडे रागाने पाहिलं...typical...maharashtrian raag..पण त्या दिवसाला alreadych तिच्या येण्याने इतकी चव आली होती...कि ते पोहे खरच चविष्ट लागत होते....गप्पा मारत मारत पोहे खाणं झालं....तोपर्यंत लंकन innings संपत आली होती....आणि मला फोन आला....आईचा आला होता...मी म्हणलं
" हेलो, आई
काय चाललय???
काही नाही..तू काय म्हणतोयेस??..अभ्यास काय म्हणतोय??...
मस्त चालूये आभ्यास...आता जरा tp करतोय...match आहे न आज..
आणि पोहे खातोय....
पोहे?? तू केलेस?? अरेवा...
मी शी...मला काय येतंय...ते तर नेहानी केले....
काय?? कोणी? कोणी केले..??
मी जीभच चावली....आता काहीतरी सावरून नेणं भाग होतं..मी म्हणलं काय कुठे काय?? अगं कोण करणार....
बाईने केले..तुझ्यासारखे नाहीयेत झाले....तुझेम्हणजे काय..?? १००% perfect !!!!!!!
hmmmmmm...पुरे पुरे...उगाच चढवू नकोस....उगाच match पाहण्यात वेळ घालवू नकोस....अभ्यास कर...!!! ठेवते आता...bye ...
नेहाचं हसून हसून पार पुन्हा  डोळ्यातनं पाणी आलं होतं.....क्षणोक्षणी नवनवीन गोष्टी इतक्या वेगाने घडत होत्या की....वेळेचा वेगही त्यासमोर फिका पडेल...पण काही असो....एका अर्थाने...सगळं बदलत चाललं होतं ...
हेच खरे....

Thursday, April 21, 2011

गोष्ट लोकलमधली-६

 नुकताच world cup 2011....भारताने जिंकला होता.. त्यादिवशीची गोष्ट आहे....त्या दिवशी लोकल मध्ये काहीतरी निराळच वातावरण होतं...सगळीकडे एक तर mobileवरचा रदिओ किव्हा laptops चालू होते....रोजप्रमाणे ती खिडकीच्या seat जवळ आणि मी तिच्या जवळ...बसलो होतो...संध्याकाळची वेळ होती...संध्याकाळी लोकल मध्ये फिरायची मजाच न्यारी असते....तेवढ्यात तिचा phone वाजला...तिच्या आईचा phone आला होता...त्यांच्या एकंदरीत संभाषणातून ते सगळे लोक जबरदस्त क्रिकेट fans आहेत हे मात्र मला पक्कं कळलं...पण त्यापेक्षाही..एक महत्वाची गोष्ट मला कळली...कि तिला आज match पाहीची होती..पण कुठे हे ती शोधत होती...मी मनात म्हणलं..."मीत्रा. हीच वेळ आहे.....हाच तो क्षण आहे...विचारून टाक"...आणि मी धाडस केलं..."तुला क्रिकेट आवडतं वाटतं..?? if u dont mind..can i ask u somethng??...can उ come to my home फोर watching match...??....आणि तिचे डोळे खुलले..जणू मी तिच्या मनातलच विचारलं होतं.....ती हसली..."मी आलं तर चालेल..??"...मी म्हणलं...चालेल काय धावेल....तू माझ्याकडे आलीस तर..आपण match नक्की जिंकू....." so आम्ही दादरला उतरलो...आज काही मी बसची वाट पाहत बसलो नाही....सरळ रिक्षा केली आणि घर गाठलं....खाली लिफ्ट मधेच..आमच्या सोसायटीमधल्या  नको त्या चौकश्या करणाऱ्या बाई..म्हणजेच Mrs.Thatte भेटल्या... आणि बोलल्यापण "काय बहिण वाटतं???" काय स्टेशनवरून आणायला गेला होतात का??"....आमच्या बाईसाहेब...खुदकन हासल्या..एक जोरात त्या बाईच्या लगवावी असं वाटलं..पण...ते रक्तात नव्हतं...असो पण  मी विषय वाढू नये म्हणून.."हो, काकू बरोबर आहे तुमचं...कशी आहे माझी बहिण..आहे का नाही देखणी..??....काकू गप्पच झाल्या..आणि बरोबर आम्ही toss च्या वेळेस TV लावला...मला त्या खऱ्या match पेक्षा देवाने सुरु केलेल्या ह्या matchचं जास्त tension आलं होतं...कारण मी काही सचिन तेंडुलकर नव्हतो हि match सहजासहजी जिंकायला..पण ठरवलं होतं कि काही झाला तरी match चांगल्या विकेट राखून जिंकायची.....तिला विचारलं...काही खाणार...??  ती म्हणली खाणार पण एका अटीवर...मी बनवणार...पहिल्याच ballला six मारल्या सारखा वाटलं..आजची हि match खूप रंगणार असं वाटलं...!!!!!!!!

गोष्ट लोकलमधली-५

  तिच्या त्या msg ने एक वेगळाच रंग ह्या गोष्टीत भरला होता.....basically त्या msg  नंतरच मला हे कळलं होता कि आमच्यात काहीतरी गोष्ट आहे or सुरु होतीये.....हरेक दिवस काहीतरी नवी रंगत आयुष्यात घेऊन येत होता.....त्यादिवशीपण नेहमीप्रमाणे सगळा आवरून घाईघाईने मी स्टेशनवर पोचलो..९:२५ झाले होते..मी ट्रेनच्या announcement ची वाट पाहत होतो...तेवढ्यात announcement झाली..."ठाणे जानेवाली १२ डीब्बोकी धीमी लोकल आज रद्द कर दि गायी है...यात्रियोको होनेवाली असुविधा के लिये खेद है...." माझ्यासाठी जणू ती आकाशवाणीच होती......आज ती भेटणार नाही हे जाणवल्यावर...आयुष्यात कधी नव्हत्या घातलेल्या त्या सगळ्या शिव्या "भारतीय रेल" ला घालून मी पुढच्या ट्रेन मध्ये चढलो....सगळा mood off झाला होता....विक्रोळी आलं...मी उतरलो..चहा टपरीवर गेलो..एक चहा सांगितला....समोरच एक ड्रेस चा सेल लागला होता..एक सुंदर maroon रंगाचा पंजाबी suit बाहेर लावला होता...मी सहज त्याला जाऊन हात लावला..तेव्हढ्यात...."भैयाजी....इस्की किमत क्या है"??? असा गोड पण परिचित आवाज माझ्या कानी आला...आयला नेहा???....आम्हाला दोघानाही एकच ड्रेस आवडला होता.....पण ती इथे कशी असेल..??? असा मीच मला विचारलं....तेवढ्यात पुन्हा आवाज आला..." कुछ तो काम करो.. " आता मात्र मी पुन्हा वळलो..थेट दुकानात गेलो...नेहा ड्रेस घेत होती...तिला पाहून सकाळी १२च्या उन्हात वाळा घातलेलं थंड पाणी पेयला सारखा वाटलं....तिनी पाहिलं....म्हणाली.."काय आलास??" मी तुझीच वाट बघत होते.. म्हणलं तू येयीपर्यंत timepass  करावा....so आले इथे..hws this suit??"....हे सगळं मला स्वप्नच वाटत होतं...मी म्हणल हो....खूप..!!!! तुला खूपच छान दिसेल... सो काय राग नाही न आला माझा....no ची गम्मत केली म्हणून विचारते....."नाही ग its k".....keep it up..!!!..नंतर .ती चहाची ओर्डर घेतली...तिच्या त्या दिवशी माझ्याबरोबर अनपेक्षितपणे असण्याने त्या चहाची मजा सुद्धा फिकी पडली होती.....वाटलं त्यापेक्षा दिवस खूपच छान होता...तिचं माझ्यासाठी स्टेशनवर थांबणं खूपच धक्कादायक होतं...पण असो...हे सगळं मला आवडत होतं....    

Sunday, April 17, 2011

गोष्ट लोकलमधली 4

घरी पोहचलो....जेवण केलं...assignment करायला घेतली...डोक्यात मात्र एकच विचार चालू होता...ती असं का म्हणाली??  तिचा no खरच आहे माझ्याकडे??????...मी वेड्यासारखा mobile contacts तीनतीनदा उघडून पाहू लागलो...पण काही सापडेना..डोक्याला दुसरा विचारच करता येयीना....हे काय होत होतं माहित नाही...मी नेहमी प्रमाणे डोळे मिटले....आजूबाजूची शांतता अनुभवायचा प्रयत्न करू लागलो....आणि आपोआप मी पेन उचलला आणि लिहायला लागलो....

" तू आहेस कुठेतरी....
         
        फुलांच्या पाकळ्या तोडत बसलीयेस 
         माझ्या प्रेमाचं अस्तित्व शोधतीयेस
        त्या काळ्याभोर डोळ्यांनी लाजतीयेस
       क्षणातल्या प्रत्येक सेकंदाला जणू माझा पत्ता विचारतीयेस.......तू....

        इकडे मी..हसतोय चंद्राकडे पाहून
         दरवळतोय मातीचा सौरभ बनून 
         त्या लख्खं अंधारात जळतोय दिवा बनून 
        मनातल्या सगळ्या भावना लिहतोय आठवून आठवून.......तू 
        
आज वाटलं सापडलीयेस  
मनाला बिलगून गेलीयेस 
डोळ्यातून सांगून गेलीयेस 
हृदयातल्या हरेक श्वासावर जणू तुझं नाव कोरतीयेस......तू...

हे कडवा संपलं आणि...msg tone वाजला....तिचाच msg आला होता....लिहिलं होतं....
" hey..hi..
              this is me Neha.... sorry yar...mi asa navta karayla pahije..
              pan mhanal tuzi maja karu....mhanun mi mhanala ki u have already my no and all..
              actuly tu tuzya mitrala no sangat hotas tevha mi aiklela...ani note kelela...aani mag mazya dokyat hi                     
              ki nw i can gve my no anytime to u and will surprise u!!! sorry if u r hearted...bhetu udya 
              9:30...dadar.....will wait for u....gn sd tc "

msg वाचताच मनात कुठेतरी...आल्हादायक वाटलं...गोष्ट पुढे सरकतीये  अस वाटायला लागलं....ती लोकल आता जणू माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली होती...मी कागद पेन खाली ठेवल....१२:१५ झाले होते..उद्या लोकल मध्ये काय बोलायचं ह्याचा विचार करता करता डोळे मिटले... 

Thursday, April 14, 2011

गोष्ट लोकलमधली 3

  त्यादिवसापासून मी लवकर झोपू लागलो..सकाळी लवकर उठण्यासाठी...मी नेहमी प्रमाणे...उठलो...आवरलं...स्टेशन गाठलं.....आज मुद्दाम मी पाण्याची बाटली बाहेर काढलीच नाही....आणि मी तिची वाट पाहू लागलो...एखाद्या बेवारस वस्तूला जसं वाटत असेल कि आपल्याला कोणीतरी येऊन उचलावं तसं माझं झालं होतं....आणि लोकल ची शिट्टी वाजली....लोकल  platform जवळ जसजसी येऊ लागली तसतसी मनातली बेचैनी वाढू लागली....आज ती येणार नाही कि काय या विचारानी मन उदास झालं....ट्रेन आली मी चढलो...खरं पण मन आजून स्टेशनवरच वाट पाहत उभं होतं.....ट्रेन निघाली....मी नेहमीप्रमाणे जागा शोधायच्या कामाला लागलो...आणि पाहतो तर काय ती ट्रेन मधेच...माझी जागा धरून बसली होती...ती माझ्याकडे पाहून हसली....आज ती खूपच सुंदर दिसत होती...पंजाबी suit , त्या मोठ्या मोठ्या बांगड्या, ते झुमके, आणि डोळ्यात घातलेलं काजळ, सगळ हवेतल्या अत्तराच काम करत होतं....
          मी बसलो...काय विषय काढून बोलाव ह्याचा विचार करतो तोच ती म्हणाली..आज कॉफ्फी घेयची का?......मनात किती ठरवला नाही तरी....त्याचक्षणी हो म्हणून मी मोकळा झालो...विक्रोळी आलं...ठरल्याप्रमाणे आम्ही हॉटेलात गेलो...२ कॉफ्फीची ओर्डेर दिली...मी आपला वेड्यासारखा एकदा घड्याळात, एकदा mobile मध्ये  पहात होतो...मग तीच म्हणाली...कोणाची वाट बघतोयेस..?? का कुठे जायचय?? मी म्हणल  नाही...कुठे काय..तू IITM मधून केलस ना engineering? इतका छान मराठी कसाकाय बोलतेस? कुठली आहेस तू? पुणे? आणि आज तू कुठून बसलीस ट्रेन मध्ये???? ती म्हणाली अरे बास एकदम सगळे प्रश्न नको...आधी एकाच तर उत्तर देऊ दे..nopes i m nt from pune or mumbai...i m frm kolhapur..i did my 12th in pune and then cracked JEE, got IITM and finaly came here for job...आणि आज मी चीन्चपोकलीहून बसले....and btw u had not said even thanx to me...!!!
मी आपला पक्का पुणेरीपणा जपत...thanx?? कशाबद्दल?? असं म्हणलं आणि माझा phone वाजला...
"हेल्लो, हा बोल रे...
    नाही रे मी आज नाही येते lect ला....आरे आता ना मंदिरात जायचय सो उशीर होईल मला...तेवढ्यात बाईसाहेब हासल्या आणि मी फसलो...coffee आली .....दोघही एकमेकांकडे पाहत हसत ती पीत होतो...ती म्हणाली चला निघुयात...hey मला no  दे ना तुझा मी म्हणलं...ती म्हणली का? u already have my no.....chalo bye....म्हणून ती निघून गेली....मी आपला विचार करू लागलो आपल्याकडे आहे no? hws that possible?? i have realised that she doesnt want to gve me her no so she said that....i hve got disspointed.... गेलो तसाच collegela aani tithun ghari...

     

             

Thursday, April 7, 2011

गोष्ट लोकलमधली-2....

दुसऱ्या दिवशी काय माहित एक वेडी आशा घेऊन मी ती लोकल पकडायची म्हणून कधी नव्हे ते लवकर उठलो...पटकन आवरलं....नाष्टा केला...आणि थेट दादर स्टेशन गाठल..थंडीचे दिवस होते....मुंबईत असं म्हणणं,
जरा odd वाटेल...पण ठीके that is not the point....तर मी platform वर पोहचलो....धाप लागली होती म्हणून मी पाण्याची बाटली काढली आणि  पाण्याचा घोट घेणार तोच आवाज आला...."hi..आज मी लवकर आले"....अन बाटली  माझ्या हातातून सटकली....जणू पहिल्या पावसाच्या सरी पडाव्यात असं पाणी आम्हा दोघांच्या अंगावर पडलं....ती खुदकन हसली....ट्रेन आली...दोघ चढलो...सगळं एकदम फिल्मी style होत होतं....वाटलं आज train ला  गर्दी का नाहीये.....आणि ती म्हणाली....तू काय करतोस....whats ur name??? ....मी म्हणलं मी समीर .....studyng in IITB.....u? she said....hi i m Neha....just completed Btech from IITM....विक्रोळी आलं.....my day has been  made already....we have introduced each other......एकाच गोष्टीच वाईट वाटत होतं कि आता रोज लवकर  उठायला लागणार ...९:३५ ची लोकल मिस करायची नसेल तर........कारण मनाने बरेच प्रश्न  विचारायला सुरुवात केली होती...आणि त्याची उत्तर तीच लोकाल देणार होती..... 
  

गोष्ट लोकलमधली-1.....

ती ९:३५ ची लोकल...ठाणे .....तो  First class चा डब्बा.....तो हवाहवासा वारा......आणि ती.......मला वाटला नव्हतं कि हि गोष्ट अशी सुरु होईल.......पण ती कशी आणि केव्हा झाली कळलच नाही......अन एका सामान्य मुंबईकरासारखच मीही त्या वेळेशी आणि त्या लोकलशी जणू बांधला गेलो....मी तसा मुंबईत आणि त्यात लोकल मध्ये नवीनच होतो....तो माहित नाही कोणता वार होता.....पण नेहमीप्रमाणेच मी ट्रेन मध्ये चढलो....जागा शोधायला लागलो.....तेवढ्यात माटुंगा आल......आणि मी जागा शोधत असतानाच अगदी बारीक आवाजात मला कोणीतरी म्हणालं.....विक्रोळी कितव station हो??  मी मागे वळून पाहिलं.....आणि एका सुजाण रसिकाने एक सुगम कवीला चटकन दाद द्यावी तसं मी म्हणलं....."क्या बात"......ते काळे भोर डोळे, ते गोरेपान गाल, ते रेशमी केस, आणि तो गोड आवाज.....असलेली ती मुलगी मला म्हणाली "sorry, i didt get u??".....मी म्हणलं "sorry. वोख्रोळी ना इथून 5th station....तुमी बसा ना.....म्हणून मी तिला जागा दिली.....त्या क्षणी वाटलं....विक्रोळी कधी येयुच नये.....मी तिला विचारल....तुम्ही रोज जाता विक्रोळीला.....ती म्हणाली....तसं असता तर मी तुम्हाला का विचारला असता कितवा स्टेशन?......तेव्हा मला कळलं........तीपण माझ्यासारखीच नवीन आहे मुंबईत...आणि मी काय माहित सुटकेचा निश्वास टाकला.... हि सुरवात होती खरी पण मला जसजसा विक्रोळी जवळ आला तासतास शेवट आहे अस वाटू लागल....आणि मीहि कसले फिल्मी विचार करतोय अस स्वतःला म्हणून...पुन्हा जागा शोधायला लागलो....