Thursday, January 26, 2012

सौनिक-२१

पूर्वार्ध 
आमच्या परीक्षा जवळ आल्या होत्या....त्यामुळे संध्याकाळच लगोरी खेळण बंद झाल होत.....जशी जशी परीक्षा संपायची तारीख जवळ येवू  लागली तस तस एक नकोसं दडपण येयला सुरुवात झाली....परीक्षा झाल्यावर आम्ही नाशिकला शिफ्ट होणार होतो......मी आजून निधीला काहीच सांगितलं नव्हत...ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी सौनिक बद्दल पण निधीशी काहीच बोललो नव्हतो...मधून मधून रियाचे messages चालूच होते....सगळ प्रकाशाच्या वेगानी घडत होत.......पण परीक्षा संपेल त्या दिवशी निधीला सांगून टाकायचं अस मी ठरवल आणि पुन्हा आभ्यासाला लागलो....
अखेर परीक्षा संपली ......शेवटचा पेपर थोडासा आवघड गेला होता....पण असो....आज मला निधीला सांगायचं होत.....आज जवळपास सगळ्यांचीच परीक्षा संपली असल्याने .....सगळे लगोरी खेळायला जमणार होते....त्याप्रमाणे सगळे ५ वाजता आले.....आम्ही खेळायला सुरुवात केली....आजून निधीचा पत्ता नव्हता ....नेहमीच ती एक दोन डाव झाल्यावर येयची.....त्याप्रमाणे ती आली....नंतर आम्ही २-३ डाव खेळलो .....ते सम्पेस्तोर ७ वाजले होते..... सगळे आपल्या आपल्या घरी गेले.....मी निधीला आवाज दिला...

" निधीssssss, जरा थांब
  काय रे??
  ice cream??
  अरे उशीर झालाय??
  जाऊयात ना....कसाटा खाउयात मग तर झाल??
  बर चालेल...."
  आम्ही त्या ice creamच्या दुकानात गेलो...दोन कसाटा घेतले आणि तिथल्याच कट्ट्यावर जाऊन बसलो....
  "निधी......आज तू मला एक गोष्ट सांगणारेस ..??
   गोष्ट ? कोणती गोष्ट?? लहानेस का तू रोहित गोष्टी ऐकायला ..
   निधी.....हे सौनिक म्हणजे काय आहे??
   पुन्हा तेच .....तुला म्हणला न की संगीत पुन्हा कधीतरी....वेळ आली की सांगीन...
   आग पुन्हा तू सांगशील हे खर आहे ....पण ऐकायला मी असेन की नाही हे माहित नाही....
   काय??? तू कुठे जाणारेस???...काहीपण काय???
   नाशिकला??....आमची बदली झालीये....पुढच्या आठवड्यात बहुतेक आम्ही जाऊ नाशिकला....
   काय??" असं निधी म्हणाली आणि तिच्या हातातून ते ice-cream खाली पडल....ती काही न बोलताच तिथून निघून गेली.....त्या दिवशीपण चंद्र दिमाखात माझ्याकडे बघून जणू मला हसत होता....मला चिडवत होता...आणि मी स्वतःला चिडवून घेत होतो...



Friday, January 20, 2012

सौनिक-२०

पूर्वार्ध 
मी डोळे चोळत जागा झालो....बरोबर नको त्या गोष्टी नको त्यावेळी आठवतात आणि झोपमोड करतात हे मला जाणवल...मी हॉल मध्ये गेलो....आई पेपर वाचत होती...आईला म्हणलं
" आई चहा कर न थोडा....डोक जरा जड झालंय...
   तेव्हड्यात बेल वाजली...मी दार उघडलं.....निधी आली होती....
" hi 
  निधी, ये न आत.....
  हेलो काकू...
  ये निधी...बरेच दिवसांनी आलीयेस..??
  हो ना काकू...सध्या वेळच होत नाही.....आज खरंतर मी गणित समजावून घेयला आली आहे रोहीतकडून
  बर बर....तू बस ....चहा घेणारेस....रोहीतसाठी बनव्तीये मी ...
  हो घेईन ना ....
  थांब आधी तुला पेढा देते ... 
  पेढा?? वां!!!! कशाबद्दल??
  आग ते रोहितच्या बाबांचं प्रमोशन....SSSSSS
  आई ....आम्हाला आभ्यास करायचाय....तू चहा झाला की हाक मार ...मी येतो घेयला....असं म्हणून मी त्याचं संभाषण तोडलं...माल काही केल्या निधीला बदली झाल्याच कळू देयच नव्हत...
  बर मी देते आवाज...असं म्हणून आई चहा करायला गेली....मी आणि निधी माझ्या खोलीत गेलो...तिने गणिताची पुस्तकं आणि नवनीतच गाईड बाहेर काढलं....
  सो निधी सांग काय येत नाहीये तुला..??
 मला आधी सांग ...कसला पेढा देत होत्या काकू..??
आरे तुला पेढा महत्वाचा आहे की अभ्यास ..??
of course पेढा ....!!!!...hahahaha!!!!
निधी .....गणित सुरु कर ...पेढा आला की सांगेन...
बर बाबा ....हे उदाहरणसंग्रह १२ मधल  १९ व गणित मला सुटत नाहीये ...
थांब बघू दे मला ...अरे हे तर सोपं आहे गणित....त्यांनी जे उद्यान म्हणलंय न गणितामध्ये ते काटकोन त्रिकोणी आकारात आहे तेव्हा तुला गणितात दिल्याप्रमाणे त्याची आकृती काढावी लागेल ...मग लगेच सुटेल...बघ सोडवून....
रोहित ....चहा झालाय रे....ये लवकर !!!!....आईने हाक मारली
बर आलो ....निधी तू सोडव मी आलो ...
दे ग आई...
हा ...हे घे चहा ....आणि हे दोन पेढे...
बर ..म्हणून मी ते सगळ घेऊन माझ्या खोलीत आलो....
मला सुटल रे ते गणित.....माझ्या लक्षात नाही आल ते की काटकोन त्रिकोणात आहे.....
ह्म्म्म.....बर चहा घे....आणि हा पेढापण...
हो.....आणि आता सांग...हा पेढा कशासाठी आहे ते...
आग....बाबांचं प्रमोशन झालंय.....त्याबद्दलचा आहे....
वॉव!!!!.....एकदम झकास....काकांना माझ्याकडून congrats सांग ....
ह्म्म्म सांगेन...."
मी निधीला आजून २-३ गणित समजावून दिली..... मी कटाक्षाने बदलीचा विषय टाळला होता...पण मला हे माहित होत की ....काही गोष्टी टाळतापण येत नाहीत आणि सांगतापण येत नाहीत....  !!!!!!!!

Saturday, January 14, 2012

सौनिक-१९

पूर्वार्ध 
मी अखेर त्या unkown नंबर ला फोन लावला....
" हेलो" , असं अगदी गोड आवाजात मला ऐकू आल..मी म्हणल..
  " कोण बोलतय?? तुमच्या फोन वरून message आला होता...कोण आहात आपण..??
अरे अहो-जाओ काय करतोयेस रोहित, मी रिया ...आपण 8th standard ला बरोबर होतो ....ओळखल नाहीस???
तू ....तर ती तू आहेस?? ढोल्याकडून तू नंबर घेतला होतास माझा?? तुला म्हणल होता न की माझ्याशी कुठलाही contact ठेवू नकोस...तरी पुन्हा??
हे  बघ रोहित, मला वाटत ते सगळ विसरून जाऊयात.....आणि तासही आता मी इकडे नाशिकला असते सो परत भेटून भांडण्याचा प्रश्नच येत नाही....फक्त मधून मधून आपल hi hello केलं तेवढच पुरेस आहे..
काय????? तू नाशिकला आहेस?......
हो ...मी नाशिकलाच आहे .....म्हणून म्हणल....भेटायचा प्रश्न नाही....पण उगाच भांडण कशाला जपून ठेवायचं त्यापेक्षा दूरची मैत्री बरी ....नाही का??
हे बघ ....रिया .....मला माहित नाही.....हे सगळ....पण मी तुला आत्ताचकाही सांगू शकत नाही....मी विचार करेन सध्या आजून बरच काही चालू आहे सो मी सांगेन....असं म्हणून मी फोन ठेवून दिला....निधीचे ४ missed calls आले होते...मी तिला फोन लावला...
"काय रे रोहित??.....इतकावेळ कोणाशी बोलत होतास??
 कोणी नाही....तू बोल काय म्हणतीयेस ??  
काही नाही....रे मला ना परत trigonometryची काही गणितं सुटत नाहीयेत....मी येवू का ...मला सांगतोस का तेवढी ...
ये न....सांगतो की....मला आजून एक महत्वाची गोष्ट पण सांगायची आहे तुला...
काय??
आधी गणित मग गोष्ट....चल ये पटकन..."असं म्हणून मी फोन ठेवून दिला...दोन मिनिट डोळे मिटून टेबल वर डोक ठेवलं...कधी डोळा लागला कळलच नाही...आणि मी भुतकाळात गेलो...
मला तो दिवस आठवला...gathering चा दिवस होता....मी शाळेच्या स्नेहसंमेलनाच सुत्रसंचालन करणार होतो.....त्यासाठी मी काय बोलायचं ते लिहून काढत होतो....एक सुंदर चारोळी मी लिहली होती....तेवढयात रिया आली...तिने तो कागद हिसकावून घेतला.आणि मोठमोठ्यांनी वाचू लागली...
" " मनोरंजनानी नटलेलं , 
   सुरातालांनी सजलेलं
  स्नेहसंमेलन माझ्या शाळेचं
  क्षण हे मी अनुभवतो आहे
  भाग्य हे माझ्या डोळ्यांचं..."
वां....रोहित काय सुरेख आहे हे...कुठे मिळाल....?कुठल्या पुस्तकातून घेतल....???
रिया कागद आण तो इकडे....आणि ते मी स्वतः लिहलय .....
काय फेक्तोस?? तू आणि हे लिहल?? कुणाला बनव्तोयेस???
बनवायचा काय प्रश्न आहे?? ते खरच मी लिहल आहे??
खरच??? ....काय सीमा miss ला इम्प्रेस करण्यासाठी......??? 
अये.....मुर्ख....काही अक्कल आहे का थोडीतरी??....नसेल न तर शाळा सोडून दे.....डोक्यात काय भरलाय काय तुझ्या??.....जेव्हा पाहाव तेव्हा हेच विषय असतात डोक्यात.....त्याच तिच्याशी ह्याच ह्याच्याशी...जुळवत राहतेस???....वेडी झालीयेस तू....ह्यापुढे माझ्याशी बोललीस ना तर एक कानाखाली वाजविन  मग तुझ्या हाकेला ओ देईन....समजल....???"
तेवढयात घड्याळाचे टोल पडले .....मी दचकून जागा झालो......भूतकाळ डोळ्यासमोर येऊन कडी वाजवून गेला होता....

Saturday, January 7, 2012

सौनिक-१८

पूर्वार्ध 
"आई......नाशिकला आपण कसकाय जाऊ शकतो??
  म्हणजे?? न जायला काय झालंय....तुझी ही वार्षिक परीक्षा झाली की जायचं....नाशिकला...नववी  नवीन शाळेत....त्यात काय आवघड आहे?
आई पण ......छे बाबा मला नाही जायचं हे गाव सोडून....ह्या गावाशी माझी सगळी स्वप्न दडलीएत......
काय?? कोणती स्वप्न?? काय बोलतोयेस तू..??
जाऊ दे काही नाही.....आपण माझी परीक्षा होईस्तोर तरी आहोत न इथे??
हो....बर चल पटकन हात-पाय वगरे धुवून ये....आणि मी सगळ्यांना जेवायला वाढतीये..."
  अस म्हणून आई स्वयम्पाघरात निघून गेली....मला मात्र काही केल्या हे पटत नव्हत....मी आजीकडे गेलो....अश्यावेळेला आजी सारखी निवाऱ्याची दुसरी कोणतीच जागा असू शकत नाही....मी तिच्या मांडीवर डोक ठेवल....आणि म्हणालो...
" आजी....आपण नाशिकला का चाललोय..??....मला नाही जायचंय नाशिकला...असं का होतंय..??
  बाळा....हे  बघ शांत हो....आणि नीट ऐक .... प्रत्येक माणसाची न एक गोष्ट असते...ती प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी सुरु होते....त्यात वाटेत अनेक वळण येतात ....ती नेहमी आपल्याला हवी असतील अशीच असतील असं नाही....पण तरी त्या वळणांवर आपल्याला पुढे जावच लागत...तुझ्या बाबतीत हि  गोष्ट इथे सुरु झाली....कदाचित ती संपेल नाशिकला...कदाचित ती संपेल आता इथे ...हे गाव सोडताना पण एक गोष्ट लक्षात ठेव....की फुलांचे गुच्छ जसे सगळीकडे मिळतात तसे ते देण्यालायक लोकपण सगळीकडेच असतात ...आणि हे आयुष्य खूप मोठ आहे आणि तुझी गोष्ट सुरु करण जरी देवाच्या हातात असल तरी ती संपवण मात्र तुझ्या हातात आहे....तेव्हा आता फार विचार करू नकोस...चल जेवायला..."
आजीच्या ह्या शब्दांनी खरच मला विचारांच्या गुंत्यातून बाहेर काढल....मला आजून हे सगळ निधीला सांगायचं होत....
जेवण झाल....मी माझ्या खोलीत आलो...परत त्या unknown नंबर वरून message आला होता....
whats this yaar?? ....i dont know why are u angry on me??....but lets forget the past and start a new strory in present..?? what say??
मला काहीच काळत नव्हत.....past??...आणि तो पण विसर्ण्यासारखा?? काय असेल??? कोण असेल ??? हा ढोल्या पण ना .....आधीच उल्हास अन् त्यात फाल्गुन मास सारखी गत झालीये....??....सौनिक.....निधी...नाशिक....आणि भरीत भर तो unknown नंबर .....ह्या सगळ्यांनी माझ जीवन रहस्यमय बनवल होत....हे खरं.....

Thursday, January 5, 2012

सौनिक -१७

पूर्वार्ध 
त्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही सगळे लगोरी खेळायला जमलो...निधी नेहमीप्रमाणे माझ्याच टीम मध्ये होती...पाहिले दोन्ही डाव आम्ही जिंकलो होतो.....नंतर सगळ्यांनी दुसरा खेळ खेळायचं ठरवल....आम्ही त्या खेळला साखळी  म्हणत होतो....ह्या खेळात ज्याचा डाव असतो तो एकेकाला out करतो आणि जो out झाला तो किंवा ती त्याचा एक हात पकडतात आणि मग ते दोघ मिळून तिसऱ्याला बाद करतात आणि अशाप्रकारे त्यांची साखळी बनत जाते....त्यादिवशी नेमका माझ्यावरच डाव आला....खेळ सुरु झाला...मी राज्य देयला सुरुवात केली....मी मनात ठरवल होत की आधी निधीलाच out करायचं कारण ती पहील्यांदा out झाली तर तिचा हात मला शेवटपर्यंत पकडता येयील....
                     आमच्या गल्लीत समोरच नवीन street lights साठी खांब बसवले होते....निधी त्या खांबाला धरून उभी होती.....मी तिच्या दिशेने जाऊ लागलो.....तेवढयात पूजा म्हणाली 
" बरोबर आहे ....तू तिकडेच जाणार....!!! थांब आता आम्ही सकले निधीच्या चेहऱ्याचा मास्कच लाऊन येतो....
ये गप्प्पे .....तू तुझी उभी राहा न....
असं म्हणून मी निधीला out केलं....नंतर मी तिचा हात पकडला....तो स्पर्श .....तो हात....इतके मऊ होते की असं वाटत होत की पाकळीच आहे हातात आणि आजून थोडा जोर दिला तर हि पाकळी मलूल होऊन  जाईल....
तिने हात अगदी घट्ट पकडला होता...वाटलं की तो हात कधीच सुटू नये.....नंतर आम्ही दोघांनी मिळून सगळ्यांना out केलं....खेळ संपला.....मी परत घरी आलो.....मी खूप खुश येतो.....घरात जाताच मला सगळीकडे अजूनच आनंदाच वातावरण दिसल....मी आत गेलोच तो आईने मला पेढा दिला....
" आई काय आज एकदम पेढा??.....काय काही विशेष?
  अरे मन्या......आहेच विशेष......
  काय?
  अरे बाबांना प्रमोशन मिळालय .
wow...काय सांग्तीयेस काय?? ......एकदम भारी....
ते उद्याच जोइन होतायेत नाशिकला....
काय?? नाशिक??? असं म्हणून मी त्याच जागी...बसलो.....