Sunday, November 13, 2011

सौनिक-८

पूर्वार्ध 
खूप दिवस मी विचार करत होतो पण काही केल्या मला चारोळी सुचत नव्हती ....काय माहित, मला लिहिताना सारखं दडपण असल्यासारखं वाटत होत...निधीला आवडेल का नाही .....ह्यापेक्षा ती ते कोणाला देणार आहे ह्या प्रश्नानीच मी हतबल झालो होतो...शेवटी मी निधीला भेटायचं ठरवलं...त्यादिवशी संध्याकाळी फारसे लोक खेळायला आले नव्हते...सो खेळ लवकरच संपला....निधी परत जायला निघाली....मी तिला हाक मारली...
" निधी,
 choclate ??
 तू देणार असशील  तर चालेल....पण मला Dairy Milk Fruit and Nutच आवडत 
ठीक  आहे ....मी देतो....
चल मग
आम्ही दुकानात गेलो....एक Dairy Milk Fruit and Nut घेतलं आणि तिथल्याच कट्ट्यावर बसलो
निधी , एक विचारू?
 काय रे...बोल ना.....
आग तुला कोणाला देयचीये चारोळी ??...म्हणजे मी सहज़च विचारतोय
अरे मला न माझ्या एका मित्राला देयची आहे चारोळी
कोण मित्र ? म्हणजे कोण आहे तो....असच विचारतोय..?
अरे आहे एक मित्र....सांगेन तुला पुन्हा कधी....ए पण आता गेल पाहिजे कारण आई पुन्हा ओरडेल...काय गप्पा मारत बसलात म्हणून....आणि परत बाबा येयची वेळ पण  झाली आहे...त्यांनी पाहिलं तर
नको नको....बाबा येयची वेळ झाली का...मग तू लगेच जा....बोलू आपण नंतर...मी आजून लिहली नाहीये चारोळी ....पण लवकरच देईन लिहून तुला....
बर चल मग bye....म्हणून ती निघाली....
"निधी...हि hair style ....खूप छान दिसतीये तुला....फक्त केस मोकळे सोड आजून छान दिसशील तू ...मी म्हणल...कितीही मनाला आवरल तरी शेवटी तोंडातून निघूनच गेल...
तिने मागे वळून पाहिलं...तिचे डोळे चमकले.....ती हलकीशी लाजली.....आणि म्हणाली...उद्या नक्की...
ती गेली....मी मात्र स्वतःला विचारत बसलो...की मी एवढ सगळ निधीला म्हणल....आणि ते मलाच कसं कळलं नाही....!!!!!!!

No comments:

Post a Comment