Tuesday, October 18, 2011

सौनिक-१

पूर्वार्ध.....
संध्याकाळचे ५:३० वाजले होते..सूर्याने नुकतीच आपली तीव्रता कमी केली होती...मी नेहमीप्रमाणे अभ्यास उरकून galary मध्ये आलो...नुकतीच समोरची शाळा सुटली होती..मुल घरी चालली होती...जेष्ठ मंडळी फिरायला निघाली होती..तेवढ्यात आईने मला आवाज दिला...
" रोहीत, अरे चहा झाला रे....ये लवकर....परत त्यावर साय धरेल..."
   आलो आई...."म्हणून मी आत गेलो....माझ्या मित्रांचा खेळायला बोलावण्यासाठी कधी पण आवाज येण अपेक्षित होत..म्हणून मी घाईघाईने चहा पेयला...पटकन हातपाय धुतले....आणि तयार झालो...तेवढ्यात आई म्हणाली...
"आज लवकर ये जरा...आपल्याला बाहेर जायचय"
बर येतो ......म्हणून मी खाली गेलो 
आज सगळे (??) आले होते...अमित, प्रणव ,राहुल ,पीयू ,पूजा , प्रीतेश 
 आणि मी 
आम्ही लगोरीसाठी team पाडायला सुरवात केली...दोन्ही teams तयार झाल्या आणि तेवढयात आवाज आला...
" अरे थांबा ....मी पण खेळणारे...
   मी मागे वळून पाहिलं...ज्या व्यक्तीची मी आतुरतेने वाट पाहत होतो...ती आली होती...!!!!

No comments:

Post a Comment