आज मी खूपच खुश होतो...एकतर मनातून सारखं वाटत होतं की भारत world cup जिंकणार....आणि दुसरं म्हणजे मला तिच्या हातचं खायला मिळणार होतं....मी म्हणलं काय बनवतेस?? काय काय येत तुला?? ती म्हणाली पोळी सोडून सगळं येत...काय करू सांग???...." कर तुला काय करायचं ते...take the responsibility of the kitchen..i l take u thr and show u what is where..बाईसाहेबांना पोहे खायचा मूड आला होता...पण मला पोहे फार आवडतात..आणि माझी आई ते इतके चान बनवते कि ते मला तसेच perfect लागतात...मनात म्हणलं...आज ही पोह्यात नक्की fail होणार...since आई is आई..!!!!....पण खरी मजा तर कांदा कापण्यापासून सुरु झाली.....ज्या डोळ्यात मला फक्त उद्याची स्वप्नं पहायची इत्छा होती त्याच डोळ्यात मला पाणी दिसलं..मी खुदकन हासलो....अरे हसतोस काय...?? माझे हात मिरचीचे आहेत....पटकन ये आणि डोळ्यातलं पाणी पूस...कांदा खूपच जास्त तिखट आहे......इकडे तेव्हाच लंकेच्या डोळ्यात पाणी येयला सुरुवात झाली होती...दिलशान out झाला होता.....मी चटकन उठलो.....रुमाल घेतला...आणि....प्रथमच डोळे पुसायला माझे हात थरथर कापू लागले.....दिलशान out झाल्यामुळे बाहेर लोकांनी फटाके वाजवायला सुरुवात केली आणि एक फटाका खूपच जोरात फुटला.....मोठा आवाज झाला...(thank God!!!).....तिचं लक्ष विचलित झालं आणि तिचं सुरीने बोट कापलं....रक्त येयला सुरुवात झाली...मी पटकन हळद काढली...तिचा हात हातात घेतला...तिला म्हणलं...थोडं दुखेल....आणि तिच्या जखमेवर हळद लावली...ह्या सगळ्या गडबडीत...kadhaital तेल खूपच तापलं.....तिने फोडणी केली कांदा परतला आणि finaly पोहे तयार झाले...तोपर्यंत इकडे जयवर्धनेनी मारायला सुरुवात केली होती...एक number झालेत पोहे....मी म्हणलं......फक्त आमच्यात मीठ घालतात पोह्यात...ते असतं तर आणखी छान लागले असते...तिने माझ्याकडे रागाने पाहिलं...typical...maharashtrian raag..पण त्या दिवसाला alreadych तिच्या येण्याने इतकी चव आली होती...कि ते पोहे खरच चविष्ट लागत होते....गप्पा मारत मारत पोहे खाणं झालं....तोपर्यंत लंकन innings संपत आली होती....आणि मला फोन आला....आईचा आला होता...मी म्हणलं
" हेलो, आई काय चाललय???
काही नाही..तू काय म्हणतोयेस??..अभ्यास काय म्हणतोय??...
मस्त चालूये आभ्यास...आता जरा tp करतोय...match आहे न आज..
आणि पोहे खातोय....
पोहे?? तू केलेस?? अरेवा...
मी शी...मला काय येतंय...ते तर नेहानी केले....
काय?? कोणी? कोणी केले..??
मी जीभच चावली....आता काहीतरी सावरून नेणं भाग होतं..मी म्हणलं काय कुठे काय?? अगं कोण करणार....
बाईने केले..तुझ्यासारखे नाहीयेत झाले....तुझेम्हणजे काय..?? १००% perfect !!!!!!!
hmmmmmm...पुरे पुरे...उगाच चढवू नकोस....उगाच match पाहण्यात वेळ घालवू नकोस....अभ्यास कर...!!! ठेवते आता...bye ...
नेहाचं हसून हसून पार पुन्हा डोळ्यातनं पाणी आलं होतं.....क्षणोक्षणी नवनवीन गोष्टी इतक्या वेगाने घडत होत्या की....वेळेचा वेगही त्यासमोर फिका पडेल...पण काही असो....एका अर्थाने...सगळं बदलत चाललं होतं ...
हेच खरे....
No comments:
Post a Comment