स्वप्न मनाशी पडलेले ...
डोळ्यांमधले अवघे काही.....मनामध्ये घडलेले
दिसले होते चित्र देखणे , सूर्य केशरी पाणी गहिरे
बसलो होतो त्याच किनारी , जेथे वसती प्रेम दिवाणे
हात हाती तू घेताच मग जे अतूट नाते जूळलेले
स्वप्न मनाशी पडलेले ...
ह्या हृदयातील म्हणणे कैसे कळले अन् त्या हृदयाला
अबोल वारे सांगून गेले ह्या ओठाचे त्या ओठाला
डोळे मिटताच लाख पिसारे अंतरात ह्या फुललेले

No comments:
Post a Comment