Sunday, March 13, 2011

कधी....


 कधी....

पाण्यासही भिजण्याची गरज भासेल कधी
आगीसही जळण्याची गरज भासेल कधी
मनातल्या व्यथानाही दुख होत असेल
त्यांनाही सुखाची गरज भासेल कधी  

विजेलाही सौम्यतेची गरज भासेल कधी
वादळास शांततेची गरज भासेल कधी
डोळ्यातील स्वप्नांनाही रडू येत असेल
त्यांनाही पूर्णत्वाची गरज भासेल कधी

एकेका शब्दाला अर्थाची गरज असते
हुरहुरत्या सांजेला रात्रीची आस असते
मैत्री करणे एखाद्याला जरी जमत नसेल
उन्हाला सावलीची गरज भासेलच कधी

त्याच त्याच रंगांचा वीट आला आहे
सारया त्या गीतांचा अर्थ एकाच आहे
" फुल बनणे आयुष्यात जरी जमणार नसेल
एक कळी नक्कीच दारी उमलून येईल कधी"

कोरड्या त्या आकाशात ढग येतील कधी
हृदयाच्या एका कोपरयात धकधक होईल कधी
पाऊस भले तेव्हा जरी पडणार नसेल
तुझे अंग आठवणींनी चिंब होईल कधी

निरसतेचे जगणे हे मला बोचते आहे
नात्यातले गुंतणे हे मला खुपते आहे
आदेश्यांच्या वणव्यात जरी मी जळत असेल
एक नाजूक फुंकर बनून तरी  तू येशील कधी....
                                                             सौरभ नेने

9 comments:

  1. मस्त माण्डलेत विचार....आवडली!!!
    लिहीत रहा...

    ReplyDelete
  2. khup sundar ahe kavita saurabh

    ReplyDelete
  3. उगाच कौतुक नाही करणार... नाही आवडली ही कविता

    भाव चांगले आहेत, उपमा आणि दाखले सुद्धा सुंदर निवडलेस. पण, बऱ्याचदा रसभंग झालाय किंवा सलगता हरवलीये.... काही ठिकाणी दोन-तीन भिन्न ओळींची अखेर त्यातल्या एखाद्याच ओळीला न्याय देते असं झालंय...

    सलगता म्हणजे...हे बघ:

    उदा. पाण्यासही भिजण्याची गरज भासेल कधी
    आगीसही जळण्याची गरज भासेल कधी : अंगभूत गुणधर्म
    मनातल्या व्यथानाही दुख होत असेल
    त्यांनाही सुखाची गरज भासेल कधी : व्यथा आणि सुख : इथे उदाहरणांचा नेमका संबंध लागत नाही... एकवेळ 'अश्रू आणि व्यथा' किंवा 'तृप्ती आणि सुख' असं काही असतं तर रसभंग नसता झाला...

    अशीच काही इतरही उदाहरणं आहेत...

    असो, मी कोणी समीक्षक नाही :)

    ReplyDelete
  4. सौनिक या शब्दाचा अर्थ मी google वर शोधला... भयानक आहे.. तुला नक्की काय सांगायचंय या नावातून?

    ( April 22, 2011 6:55 AM ही post सुद्धा माझीच आहे.. तिथे shri आणि इथे shrikant का आलंय माहीत नाही )

    -Shrikant Wad
    https://profiles.google.com/110796541726124832023/about

    ReplyDelete