नमस्कार मित्रानो,
अनेक माझे मित्र मला नेहमी विचारतात, तू कविता करतोस, चांगल्या करतोस, पण काश्याकाय सुचतात युला ह्या कविता....माझं आपलं एकच ठरलेलं उत्तर, सुचतात अश्याच......मित्रानो कवितांचं आसच आहे....त्याला का हा प्रश्न सहसा विचारता येत नाही....अस मला वाटतं, मी माझ्या ८ वी पासून कविता करायला लागलो...पहिले मी आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे आई....वर कविता केली...जस जस आपलं वय वाढत जात तसतसं कवितांचं वयपण वाढत जात...आपल्या आयुष्यातील महत्वाचे विषय बदलतात तसच कवितांचेपण विषय बदलत जातात.....कविता सुचणं ह्याला नशीब लागतं आणि त्या लोकांना आवडणं ह्याला अजूनच नशीब लागतं...मला माहित नाही मी का आणि किती कविता लिहणार आहे...पण एक गोष्ट नक्की....त्या माझ्या जीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत...मित्रानो तुम्हाला माझ्या कविता कश्या वाटतात हे नक्की सांगा...कारण दाद हिच कवितेला पूर्ण करते....
सौरभ नेने
शुभेच्छा :)
ReplyDelete