Wednesday, March 16, 2011

रे सख्या....

रे सख्या सांग ना,आहे का ती तशीच
कळी मनातली, धून ओठातली
तिच्याही डोळ्यात आहे का रे तो माझाच भास
आहे का रे तिच्याही मनात भेटण्याची आस  

रे सख्या सांग ना, ती तशीच येते का आजून नटून
तशीच पडते का रे तिला लाजरी खळी हासताना
 तसेच का नाक तिचे लाल होते रडताना
आहे का रे ती माझ्याशिवाय खरच उदास
सांग ना..

 रे सख्या सांग ना, ती हिरवळ आहे का तशीच
तो कट्टा आजून आहे का तसाच मोहरलेला
आजून जमतात का सगळे पाऊस पडताना
ती शोधते का तेव्हा मला आसपास
सांग ना.....

रे सख्या सांग ना, तिने सारे ते क्षण ठेवलेत का जपून
भेटेल का ती मला पुन्हा आलो तर हासून
ती ऐकेल का सगळ हातात हात घेऊन
तेव्हा टिपशील का रे तो क्षण खास
सांग ना.......

                                                 - सौरभ नेने

5 comments: