पूर्वार्ध
तेवढ्यात माझा फोन वाजला....आई फोन करत होती......मी त्याच्याकडे लक्षच दिल नाही....मी निधीकडे पाहिलं......हळूच तिचे डोळे पुसले....आणि म्हणल...
" निधी, कसाटा खाणार ??
तू जाणार नसशील तर
आग त्याचा काय संबंध आहे.....तू मला सौनिक म्हणजे काय सांगितलस त्याच्या आनंदात खावूयात न
त्याच्या आनंदात कि तू मला सोडून चाल्लायेस त्याच्या आनंदात ?
अरे....निधी...हे बघ....आता मी तुला एक गोष्ट सांगतो.....ती निट ऐक....पण पहिले आपण कसाटा घेवू मग बोलू..." तेवढ्यात आईचा फोन परत वाजला ....मी उचलला
"आई, मी येतोय एक आर्ध्या तासात ....
कुठे आहेस तू?? आणि मगाशी फोन का नाही उचललास?
आग आई....सांगतो तुला आल्यावर सगळ सविस्तर...."अस म्हणून मी फोन बंद केला
तोपर्यंत निधी कसाटा घेऊन आली होती
" निधी , एक नेहमी लक्षात ठेव ....प्रत्येक गोष्टीला एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध असतो....पूर्वार्ध संपल्याशिवाय उत्तराध सुरु होऊ शकत नाही....आणि त्याशिवाय गोष्ट पुढे कशी जाणार.....आता आपल्या बाबतीतही तेच होतंय.....
म्हणजे.....?? काय म्हणायचं तुला रोहित??
म्हणजे .....इथे आपली पण एक गोष्ट आहे.....त्या गोष्टीला सुद्धा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे.....आणि आता ह्या क्षणी पूर्वार्ध संपतोय ......आणि उत्तरार्ध सुरु होतोय ......
हे बघ रोहित हे सगळ तुम्हा लेखक मंडळींना माहित ....मला फक्त माझ सौनिक पूर्ण करायचंय.......आणि ते अपूर्ण सोडून जर तू कुठे गेलास तर मग तू काय आणि तुझी आई काय.....मी कोणालाही घाबरणार नाही...
निधी.....जरा शांत हो....एकदम झाशीची राणी होऊ नकोस.....आणि आईच नाव घेऊ नकोस....मी सांगेन आईला.....फक्त थोडी वाट बघ.....आपल्या गोष्टीचा पूर्वार्ध भले देवानी लिहिला असेल....मात्र उत्तरार्ध मीच लिहणार.....तुला हवा तसा......सौनिक नक्की पूर्ण होणार......आणि आपण पुन्हा इथेच कसाटा कापून माझा वाढदिवस साजरा करणार.......
No comments:
Post a Comment