त्यादिवशी सकाळी मी पेपर वाचत बसलो होतो ......नुकताच चहा पिउन झाला होता......सकाळी सकाळी सुद्धा पंखा लावायला लागेल इतपत उन्हाचा पारा वाढला होता...मी जरी पेपर वाचत असलो तरी माझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चालू होता.....crossword मध्ये जाऊन कोणती नवीन पुस्तकं आली आहेत हे पाहायची इत्छा मनात निर्माण झाली होती.....ब्लॉग पण update करायचा राहिला होता......तेवढयात आईने हाक मारली.....
" मन्या, अरे आज मंडइत जायचंय बरका भाजी आणायला.....तुझा काही programme ठरवू नकोसं....कळल का??
बर आई...
आणि हो ...तुझ्यासाठी एक फोन आला होता?
कुणाचा?
नाव नाही सांगितलं .....फक्त विचारल.....राहुल आहे का??....मी म्हणल नाही तर लगेच फोन बंद केला
हो का? जाऊ दे येयील परत फोन.....बर आई.....पुढच्या सोमवार पासून मला लवकर जायचंय ऑफिसला तेव्हा तुला सकाळी लवकर जमणार असेल तर डब्बा दे नाहीतर खाईन मी एक आठवडा ऑफिसमध्ये.....
बर बघीन....आणि तूच मंगळवार पासन म्हणशील "आई, मला डब्बाच दे....म्हणून !!!"
बाबा कुठे आहेत??
फिरायला कम फुल तोडायला गेले आहेत...
हाहाहा .....काय आई तू पण....
काय म्हणजे काय?? खरच सांगतिये मी.....एवढी फुल तोडतात की देव्हाऱ्यात देव दिसेनासे होतात....
असं म्हणत आईने स्वयपाकाची तयारी सुरु केली....त्यादिवशी मला सुट्टी असल्यामुळे मी निवांत होतो.....तेवढ्यात डोक्यात सुंदर कल्पना आली.....मी चटकन laptop on केला....net कनेक्ट केलं , ब्लॉग उघडला आणि लिहायला सुरुवात केली....
No comments:
Post a Comment