तू
रे.....
मनातले
हे भाव तू रे...
डोळ्यातले
ते गाव तू रे ....
अनोळखीसे
नाव तू रे....
तू
सखा अन तूच तू रे...
ओठातले
ते गीत तू रे
स्पर्शातले
ते स्मित तू रे
गाजलेली
रीत तू रे....
तू
सखा तूच तू रे.....
दाटलेले
मेघ तू रे
वाटलेले
प्रेम तू रे
गुंतलेले
श्वास तू रे.....
तू
सखा तूच तू रे....
कल्पनांची
वाट तू रे
भावनांची
गाठ तू रे...
पेटलेली
वात तू रे....
तू
सखा अन तूच तू रे.....
आज
तू अन काल तू रे
अनंत
तू नि अंत तू रे....
दान
तू वरदान तू रे
तू
सखा अन ईश तू रे.....
तू
सखा अन तूच तू रे.....
- सौनिक ....
खूप तुरे तुरे झालेत का :D ? तसंदेखील यमक जुळलं असतं … बाकी छान वाटली
ReplyDelete