आयुष्यात प्रत्येकालाच देवाने काही ना काही दोष दिलेच आहेत....काहीचे ते दृश्य आहेत काहींचे ते अदृश्य आहेत...पण ज्याचे ते दृश्य आहेत त्यांना बरेच लोक चांगली वागणूक समाजात देत नाहीत....सगळे लोक म्हणतात त्यांना आधारची गरज असते......ते जन्मालाच मुळी देवाचा आधार घेऊन येतात....
"आधार" ....मुलाला-आईचा , फुलाला-पानांचा, थरथरत्या हातांना-काठीचा, थंड पावसाळी हवेला-चहाचा, त्याला-तिचा आणि जगण्याला-मरण्याचा आधार आहे म्हणून ह्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे...खरच माणूस आधाराशिवाय किती निराधार आहे ना....!!!!!! हे सगळे विचार माझ्या मनात त्यारात्री घुमू लागले.....सकाळी उठलो.....बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता....सगळीकडे हिरवगार झाल होत.....आणि अचानक मला शेजारच्या रूम मधून आवाज आला...."मला बाहुली पाहिजे आत्ता"....मी दार हळूच उघडलं...सुनीलकडे आलेल्या पाहुण्यांपैकी कुणाची तरी छोटी मुलगी तिच्या आईकडे हट्ट करत होती...सुनीलची ती बहिण तिथेच बसली होती.....ती एकटक त्या रडणाऱ्या मुलीकडे पाहत होती.....अचानक ती उठली....तिथे पडलेली पेन्सील तिने उचलली आणि चटकन तिची drawingchi वही उघडली.....त्यात अतिशय सुंदर बाहुलीच चित्र तिने काढल आणि त्या छोट्या मुलीच्या हातात दिल...ती मुलगी डोळे पुसत पुसत त्या चित्राकडे पाहू लागली....आणि चक्क गालातल्या गालात हसली...मी दारात उभ राहून सगळ पाहत होतो....माझे डोळे आणि विचार काही काळ सुन्न झाले होते....ज्या व्यक्तीला सगळे निराधार, अपंग म्हणत होते...तिनेच त्या छोट्या मुलीच्या आईला खरा आधार दिला ह्यात काही शंकाच नव्हती...
bhaarich re
ReplyDelete