Thursday, April 7, 2011

गोष्ट लोकलमधली-1.....

ती ९:३५ ची लोकल...ठाणे .....तो  First class चा डब्बा.....तो हवाहवासा वारा......आणि ती.......मला वाटला नव्हतं कि हि गोष्ट अशी सुरु होईल.......पण ती कशी आणि केव्हा झाली कळलच नाही......अन एका सामान्य मुंबईकरासारखच मीही त्या वेळेशी आणि त्या लोकलशी जणू बांधला गेलो....मी तसा मुंबईत आणि त्यात लोकल मध्ये नवीनच होतो....तो माहित नाही कोणता वार होता.....पण नेहमीप्रमाणेच मी ट्रेन मध्ये चढलो....जागा शोधायला लागलो.....तेवढ्यात माटुंगा आल......आणि मी जागा शोधत असतानाच अगदी बारीक आवाजात मला कोणीतरी म्हणालं.....विक्रोळी कितव station हो??  मी मागे वळून पाहिलं.....आणि एका सुजाण रसिकाने एक सुगम कवीला चटकन दाद द्यावी तसं मी म्हणलं....."क्या बात"......ते काळे भोर डोळे, ते गोरेपान गाल, ते रेशमी केस, आणि तो गोड आवाज.....असलेली ती मुलगी मला म्हणाली "sorry, i didt get u??".....मी म्हणलं "sorry. वोख्रोळी ना इथून 5th station....तुमी बसा ना.....म्हणून मी तिला जागा दिली.....त्या क्षणी वाटलं....विक्रोळी कधी येयुच नये.....मी तिला विचारल....तुम्ही रोज जाता विक्रोळीला.....ती म्हणाली....तसं असता तर मी तुम्हाला का विचारला असता कितवा स्टेशन?......तेव्हा मला कळलं........तीपण माझ्यासारखीच नवीन आहे मुंबईत...आणि मी काय माहित सुटकेचा निश्वास टाकला.... हि सुरवात होती खरी पण मला जसजसा विक्रोळी जवळ आला तासतास शेवट आहे अस वाटू लागल....आणि मीहि कसले फिल्मी विचार करतोय अस स्वतःला म्हणून...पुन्हा जागा शोधायला लागलो....

                                                                     

No comments:

Post a Comment