Sunday, April 17, 2011

गोष्ट लोकलमधली 4

घरी पोहचलो....जेवण केलं...assignment करायला घेतली...डोक्यात मात्र एकच विचार चालू होता...ती असं का म्हणाली??  तिचा no खरच आहे माझ्याकडे??????...मी वेड्यासारखा mobile contacts तीनतीनदा उघडून पाहू लागलो...पण काही सापडेना..डोक्याला दुसरा विचारच करता येयीना....हे काय होत होतं माहित नाही...मी नेहमी प्रमाणे डोळे मिटले....आजूबाजूची शांतता अनुभवायचा प्रयत्न करू लागलो....आणि आपोआप मी पेन उचलला आणि लिहायला लागलो....

" तू आहेस कुठेतरी....
         
        फुलांच्या पाकळ्या तोडत बसलीयेस 
         माझ्या प्रेमाचं अस्तित्व शोधतीयेस
        त्या काळ्याभोर डोळ्यांनी लाजतीयेस
       क्षणातल्या प्रत्येक सेकंदाला जणू माझा पत्ता विचारतीयेस.......तू....

        इकडे मी..हसतोय चंद्राकडे पाहून
         दरवळतोय मातीचा सौरभ बनून 
         त्या लख्खं अंधारात जळतोय दिवा बनून 
        मनातल्या सगळ्या भावना लिहतोय आठवून आठवून.......तू 
        
आज वाटलं सापडलीयेस  
मनाला बिलगून गेलीयेस 
डोळ्यातून सांगून गेलीयेस 
हृदयातल्या हरेक श्वासावर जणू तुझं नाव कोरतीयेस......तू...

हे कडवा संपलं आणि...msg tone वाजला....तिचाच msg आला होता....लिहिलं होतं....
" hey..hi..
              this is me Neha.... sorry yar...mi asa navta karayla pahije..
              pan mhanal tuzi maja karu....mhanun mi mhanala ki u have already my no and all..
              actuly tu tuzya mitrala no sangat hotas tevha mi aiklela...ani note kelela...aani mag mazya dokyat hi                     
              ki nw i can gve my no anytime to u and will surprise u!!! sorry if u r hearted...bhetu udya 
              9:30...dadar.....will wait for u....gn sd tc "

msg वाचताच मनात कुठेतरी...आल्हादायक वाटलं...गोष्ट पुढे सरकतीये  अस वाटायला लागलं....ती लोकल आता जणू माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली होती...मी कागद पेन खाली ठेवल....१२:१५ झाले होते..उद्या लोकल मध्ये काय बोलायचं ह्याचा विचार करता करता डोळे मिटले... 

1 comment: