Thursday, April 21, 2011

गोष्ट लोकलमधली-६

 नुकताच world cup 2011....भारताने जिंकला होता.. त्यादिवशीची गोष्ट आहे....त्या दिवशी लोकल मध्ये काहीतरी निराळच वातावरण होतं...सगळीकडे एक तर mobileवरचा रदिओ किव्हा laptops चालू होते....रोजप्रमाणे ती खिडकीच्या seat जवळ आणि मी तिच्या जवळ...बसलो होतो...संध्याकाळची वेळ होती...संध्याकाळी लोकल मध्ये फिरायची मजाच न्यारी असते....तेवढ्यात तिचा phone वाजला...तिच्या आईचा phone आला होता...त्यांच्या एकंदरीत संभाषणातून ते सगळे लोक जबरदस्त क्रिकेट fans आहेत हे मात्र मला पक्कं कळलं...पण त्यापेक्षाही..एक महत्वाची गोष्ट मला कळली...कि तिला आज match पाहीची होती..पण कुठे हे ती शोधत होती...मी मनात म्हणलं..."मीत्रा. हीच वेळ आहे.....हाच तो क्षण आहे...विचारून टाक"...आणि मी धाडस केलं..."तुला क्रिकेट आवडतं वाटतं..?? if u dont mind..can i ask u somethng??...can उ come to my home फोर watching match...??....आणि तिचे डोळे खुलले..जणू मी तिच्या मनातलच विचारलं होतं.....ती हसली..."मी आलं तर चालेल..??"...मी म्हणलं...चालेल काय धावेल....तू माझ्याकडे आलीस तर..आपण match नक्की जिंकू....." so आम्ही दादरला उतरलो...आज काही मी बसची वाट पाहत बसलो नाही....सरळ रिक्षा केली आणि घर गाठलं....खाली लिफ्ट मधेच..आमच्या सोसायटीमधल्या  नको त्या चौकश्या करणाऱ्या बाई..म्हणजेच Mrs.Thatte भेटल्या... आणि बोलल्यापण "काय बहिण वाटतं???" काय स्टेशनवरून आणायला गेला होतात का??"....आमच्या बाईसाहेब...खुदकन हासल्या..एक जोरात त्या बाईच्या लगवावी असं वाटलं..पण...ते रक्तात नव्हतं...असो पण  मी विषय वाढू नये म्हणून.."हो, काकू बरोबर आहे तुमचं...कशी आहे माझी बहिण..आहे का नाही देखणी..??....काकू गप्पच झाल्या..आणि बरोबर आम्ही toss च्या वेळेस TV लावला...मला त्या खऱ्या match पेक्षा देवाने सुरु केलेल्या ह्या matchचं जास्त tension आलं होतं...कारण मी काही सचिन तेंडुलकर नव्हतो हि match सहजासहजी जिंकायला..पण ठरवलं होतं कि काही झाला तरी match चांगल्या विकेट राखून जिंकायची.....तिला विचारलं...काही खाणार...??  ती म्हणली खाणार पण एका अटीवर...मी बनवणार...पहिल्याच ballला six मारल्या सारखा वाटलं..आजची हि match खूप रंगणार असं वाटलं...!!!!!!!!

1 comment:

  1. चांगली चाललीये ही गोष्ट...

    अरे जरा मराठी टायपिंग चे बघ नीट.. गोंधळ उडतोय.

    गोष्टीची भाषा साजेशी आहे... पण मग, कविता का नाही त्याच भाषेत ? म्हणजे, कविता सुंदरच होती.. पण तीही त्याच 'आंग्ल-मराठी-तरुण-टपोरी' अशा मिश्रणातून घडली असती तर मजा आली असती. असो.

    एक छोटीशी गोष्ट सुचवावीशी वाटते: काही निर्जीव गोष्टी सजीव झाल्या की गोष्टीची रंगत अजून वाढेल.. उदा. ट्रेन चा नेमक्या वेळी होणारा आवाज, विकेट जाणं, कपड्यांचे रंग, उकाडा, वारा वगैरे गोष्टी सजीव पात्रच आहेत असं गृहीत धरून लिहता आलं तर बघ .. मजा येईल !

    असो.. पण एकसंध अर्थानं ही कथा नसून गप्पा आहेत असा भास निर्माण झालाय.. त्याला कथेच्या रुपात बसवण्याचा प्रयत्न अप्रत्यक्ष सुद्धा होऊ नये अशी सदिच्छा ! :)


    -Shrikant Wad
    https://profiles.google.com/110796541726124832023/about

    ReplyDelete