पूर्वार्ध
मी ठरल्याप्रमाणे निधीकडे गेलो....बेल वाजवली ...काकूंनी दार उघडल......
"रोहित ये....काय म्हणतोयेस?? कसा चाललाय अभ्यास..??
ठीक आहे काकू...आता परीक्षा जवळ आली आहे सो अभ्यास जोरात चालू आहे...निधी कुठे आहे? तिने गणितांसाठी बोलावलं होता..
निधी आहे न....तिच्या रूम मध्ये असेल....थांब ह मी बोलावते..निधीस्स्स आग रोहित आलाय बघ...
आले आई..."
निधी बाहेर आली...मला म्हणाली...
"अरे आत ये न...आपण माझ्याच खोलीत बसुयात गणित करायला..."
मी आत गेलो....पलंगावर सगळीकडे पुस्तक पसरवली होती...मी म्हणल
"काय निधी??....किती अभ्यास करतेस?? तुझ्या बेडलापण अभ्यासू बनवून ताक्लायेस अगदी.??"
अरे नाही..माझ्या बेडलापण गणिताची भीती वाटते....
हो का ...बर मग आज तुम्हा दोघ्नाची गणिताची भीती घालवू टाकतो....
खरच...असं केलंस न तर माझ्याकडून एक ice-cream तुला ..
चल मग...सांग काय प्रोब्लेम आहे ते....
अरे मला न trigonometry समजावून दे ....ह्या सगळ्या sin, cos आणि tan मध्ये नुसतं गुरफटून जायला झालय...
मी हातात पेन उचलला .....काटकोन त्रिकोण काढला ....आणि समजावून देयला सुरुवात केली...
No comments:
Post a Comment