"खरच रे तुमच्या चेंबूरचा वडापाव खुपच भारी आहे ...जातोयेस न तू अजिंठा पहिला??".....असं काहीस त्यांच बोलणं चालू असतानाच मला पण call आला
" हेलो क्या कर रहा है??
काही नाही रे.....घरी चाललोय ...पुण्याला...
लेकिन किसके साथ है??....आवाज तो बहोत आ रहे है....
अरे काही नाही रे.....एक मुलगी आहे शेजारी....केव्हापासून बोलतीये फोनवर.....वैतागलो यार....
okokok बर अरे तू परत कधी येतो आहेस?
मी सोमवारी परत येयीन....का रे..?
काही नाही रे.....असच विचारतोय....ठीके बोलू मग नंतर...
ok चल ठेवतो" असं म्हणून मी फोन ठेवून दिला....
त्या मुलीच आजून बोलण चालूच होत....समोरचा माणुस अतिशय प्रचंड आवाजात घोरत होता...त्याच्या शेजारच्यानी त्याच्याच खांद्यावर मान टाकली होती, तरी त्याला काही पत्ता नव्हता...मागच्या सीट वरच्या जोडप्याची लहान मुलगी दर दोन मिनिटांनी भोकाड पसरत होती.....का तर म्हणे तिला खिडकीमधून हात बाहेर काढायचा होता.....आणि शिवनेरीच्या खिडक्या उघडत नाहीत....पण मी मात्र आता डोळे मिटून झोपायचं ठरवल होत....तेवढ्यात परत त्या मुलीची काहीतरी खटपट चालू झाली होती.....मी जड झालेले डोळे उघडत तिच्याकडे पाहिलं......ती लगबगीने तिच्या blackberry mobile मधलं sim card काढून कुठल्यातरी फडतूस LG mobile मध्ये टाकत होती.....ज्याक्षणी तिने ते कार्ड त्या mobile मध्ये टाकल ....फोन वाजला....
"अरे sorry......फोनची battery संपली....म्हणून दुसऱ्या फोन मध्ये कार्ड टाकत होते....sorry म्हणल न.. आता कशी संपली battery म्हणजे काय?.....बर ते सोड...काढलीस का तिकीट अजिंठ्यची? "
आता मात्र हे फार होत होता.....मला सहन होत नव्हतं.....आणि तितक्यात बस बोगद्यात गेली फोनची रेंज गेली....आणि एकदाचा तो मोठा call संपला....असं वाटल हा बोगदा संपूच नये....मला थोडी शांतता तरी मिळेल....सकाळी काय पाहून निघालो होतो काय माहित की.....कधीही कंटाळवाणा न वाटणारा मुंबई-पुणे प्रवास मला नकोसा झाला होता......मी मनाशी ठरवलं....आता कसलेही कितीही मोठे आवाज आले तरी उठायचं नाही आणि डोळे मिटले....
arere1
ReplyDeleteउगाच नाही भारत जगातील भ्रमण ध्वनी ची मोठी बाजारपेठ होत आहे.
ReplyDelete