Thursday, December 15, 2011

सौनिक-११

पूर्वार्ध 
अलार्म वाजला....सकाळचे ७ वाजले होते....इतक्या सकाळचा अलार्म कोणी लावला होता काय माहित...???....कारण त्यादिवशी रविवार होता....म्हणून मी अलार्म लावला नव्हता हे नक्की .....तेव्हड्यात आई आली......माझ्या कपाळावर हात फिरवत म्हणाली....
"किती लवकर मोठा झालास रे मन्या ....असं वाटतंय कालचीच गोष्ट आहे की मी तुला चांदोबाची गोष्ट सांगत सांगत जेवायला घालायची.....हात धरून शाळेत सोडायला यायची....."असं म्हणता म्हणता दोन थेंब हळूच तिच्या डोळ्यातून ठीबकले आणि माझ्या गालावर पडले....मी आईला म्हणल...
"आई....असच डोक्यावर हात फिरवत बस न.....सगळ tension पळून गेल्यासारख वाटतं" पण आज आहे काय?? आणि हो हा अलार्म कोणी लावलाय??? मी आज उशिरा उठतो न आई.....तुला माहिती आहे ना?
तेव्हढ्यात आजी आली आणि म्हणाली...happy birthday!!!!.....बघ मी तुझ्यासाठी तुझा आवडता बदामाचा शिरा  केलाय...चल उठ पटकन ....दात घास......
बदमाचा शिरा .....असं म्हणून मी ताडकन उठलो...आजीला घट्ट मिठी मारली...आणि म्हणल 
"Thank you आजी...."
मी पटकन तोंड धुतल....आजीने केलेला शिरा खाल्ला ....तेवढयात बाबा आले.....फिरून येतानाच त्यांनी..माझ्यासाठी मला खूप आवडते म्हणून जिलबी आणली.....त्यांना बहुदा शिऱ्याचा बेत माहित नसावा म्हणून त्यांनी आणली....मी पटकन आंघोळ वगरे उरकून घेतली...आईने मग औक्षणाची तयारी केली....सगळीकडे कसं आनंदायी वातावरण होत... सगळ आटोपताच मी ...galleryt गेलो...चहुकडे पाहून शेवटी एका galleryकडे पाहत स्थिरावलो ....दरवाजा बंद होता...पण खिडकीचे पडदे लावलेले नव्हते म्हणजे सगळे घरीच होते....असा  मी अंदाज बांधला....तेवढयात खिडकीचे पडदे लागले.....मी तरी तसाच उभा राहिलो....बराच वेळ वाट पहिल्या नंतर वाटल .....बहुदा गेले सगळे बाहेर....म्हणून मी मागे वळतो तोच दराचा किर्रर्र असा आवाज झाला...."हो आई...कपडे सगळे आत आणलेत तेच पहायला मी दार उघडल"....अस म्हणत ती बाहेर आली.....!!!!!

No comments:

Post a Comment