Thursday, December 29, 2011

सौनिक-१५

पूर्वार्ध 
शेवटी मी फोन लावायचं बंद केलं....पलंग वगरे आवरला ...आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो.....पण काही केल्या झोप लागेना....सारखा एकच प्रश्न डोक्यात येत होता.....त्या शब्दाचा अर्थ काय असेल...मी मोबाईल घेतला .....message type करू लागलो...परत मनात विचार आला...उगीच कशाला आता message करायचा...म्हणून परत ठेवून दिला....असच मोबाईलची घे ठेव करण्यातच मला झोप लागली....
दुसऱ्यादिवशी.....सकाळी....लवकर उठलो....पटकन आवरल.....शाळेत जायचं होत....तरी काही डोक्यातून तो शब्द जात नव्हता.... तेव्हढ्यात फोन वाजला....आशिष (ढोल्याचा) फोन होता......मी घेतला...
"अबे ढोल्या?? काल मेला होतास का??....कुठे जाऊन पडतोस रे रात्री..??
  अरे....झोपून गेलो लवकर....फोन ऐकूच आला नाही...तू बोल....काय म्हणत होतास??
   साहेब...आपण कोणाला माझा नंबर दिलात??.....इतक कोणावर मेहरबान झालात??
   मी?? कोणाला दिला नंबर ?? मी दिला आणि मलाच माहित नाही??  by the way रोहीत्या....कोणाचा फोन आला?? तो होता की ती..?? आणि मला पण ओळखते म्हणजे ती व्यक्ती??...अबे बोल ना ??आता काय झाल...????
अबे ढोल्या?? रात्री बोलुयात....आता शाळा गाठायची आहे..." असं म्हणून मी फोन बंद केला....शाळा गाठली....आमच्या शाळेत नुकत्याच नवीन मिस जर्मन शिकवायला join झाल्या होत्या....मनात एकदा आल....सरळ जाव आणि त्यांना तो शब्द काय आहे विचारावा...पण...म्हणल....उगच काही प्रेमाचा वगरे शब्द असला तर माझी घुसायची....त्याचं माझ्याबद्दलच मत तर बदलेलच आणि त्या इतरांना सांगतील ते वेगळच...म्हणून मी तो विचार तिथेच थांबवला....पण काहीकेल्या तो शब्द माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता...
शाळा सुटल्यावर लगेच मी घरी आलो....हातपाय धुतले....शाळेचा अभ्यास पटकन करून टाकला....आणि  निधीला message केला...
' hey hi..!...how are u?? tu mala tya wordcha meaning ka nahi sangat aahes?? aata sangun taak bar...
mi tula meaning nahi sangnar....tyacha fakta english parallel word sangin..??
kaay??
SauNik..
wat??
its 'Saunik'

No comments:

Post a Comment