Saturday, December 31, 2011

सौनिक-१६

पूर्वार्ध
मी निधीला फोन केला ...
"सौनिक??? हे काय आहे???...ह्याचा काय आर्थ आहे???....
काय रे तुला सगळ सांगावं लागतं.....सगळ मीच सांगायचं.....जरा तू डोक लाव ना काहीतरी....
अरे तू अशी शब्दकोडी घालणार आणि ती मी सोडवत बसायची का निधी?? आणि ह्यात डोक लावण्यासारख काय आहे..??
काही नाही.....मी आता ह्यापुढे काहीही सांगणार नाही...मी एवढं भारी गिफ्ट दिलंय आणि तू त्याला शब्दकोडं म्हणतोयेस??
अरे....निधी हे बघ...मला सांग तरी...मी खरच खूप उत्सुक आहे ग
तुला एकच सांगते आत्ता .....सौनिक हे माझ स्वप्न आहे....ज्यात तू आहेस....मी आहे....आपली कुटुंब आहेत...हि गल्ली आहे....हे शहर आहे.....आणि आपली लगोरी आहे....
काये राव....तू न नुसता गुंता वाढव्तीयेस...निधी....
नाही...तू गुंता करून घेतोयेस...
दे सोडून तू काही ऐकायची नाहीस...."
"रोहित...."तेव्हढ्यात आईने आवाज दिला..
"चल फोन ठेवतो....भेटूयात उद्या लागोरीच्या इथे....
hey रोहित....
काय?
काही नाही.....बोलू नंतर..."असं म्हणून तिने फोन ठेऊन दिला...
हि निधीपण ना एकदम विचित्र आहे.....स्वप्न बघते, त्यात मी पण असतो पण ते मलाच सांगत नाही...असं म्हणून मी स्वयम्पाघरात गेलो...
"रोहित....काय हे..? काय करत होतास?? किती हाका मारायच्या तुला?? काय करत होतास??
काही नाही गुंता सोडवायचा प्रयत्न करत होतो...सुटतच नाहीये...??
काय?? कसला गुंता??
मला एकदम लक्षात आल....मी म्हणल
"आग आई..त्या माझ्या headphonesचा गुंता झाला होता ना तो सोडवत होतो.."
असं म्हणून मी उत्तर दिल खर....पण एकाचवेळी इतक्या साऱ्या गुंत्यांमध्ये आडकल्यावर किती सोडवायचे आणि किती नाही हेच काळात नव्हत......

No comments:

Post a Comment