Monday, December 19, 2011

सौनिक-१२

पूर्वार्ध
संध्याकाळ झाली होती...दादानी blackforest cake आणला होता...आईने तो केक box मधून काढून तो बाहेर  घेऊन आली....आजी, बाबा , दादा , आई आणि मी सगळे hall मध्ये जमलो....मी cake कापला.....दादानी फोटो काढले .....आजीने मला खूप मोठा केकचा घास भरवला .....सगळ अगदी मनासारख होत..फक्त एक गोष्ट सोडून....निधिनी आजून मला wish केल नव्हत....मी आईला म्हणल....
"आई मी जरा खाली जाऊन येतो...
लवकर ये रे...!!
हो आई...असं म्हणून मी खाली आलो....आज नेमका रविवार असल्याने सगळे लोक कुठे न कुठे बाहेर गेले होते....निधीच्या पण घरचे पडदे बंदच होते....ते पाहून मी ते बाहेर गेले आहेत असा अंदाज बांधला...तेवढयात मला mobileवर एक message आला ......
"A very happy birthday to u..!!!...May God bless you always and give you what u deserve and desire in life...i m waiting with your gift in Ice-cream shop...do come !!!
yours,
Nidhi"
मी त्याचक्षणी निघालो ...त्या दुकानाच्या जवळ आलो...निधी मला दुरूनच दिसत होती....तिने आज गुलबक्षी रंगाची सलवार कमीझ घातली होती...कानात त्याच रंगाचे खडे असणारे कानातले घातले होते...केसाची एक बट  हळूच डोळ्यावर येत होती....ती हळूच ती मागे सरकवत होती...एकंदरीत काय तर ती.....खुपच सुंदर दिसत होती.... मी तिला आवाज दिला.....
"निधी...."
तिच्या हातात मोठ ग्रीटिंग होत...तिने आधीच कसाटा ice-cream मागवून ठेवलं होत.....आयुष्यात पहिल्यांदाच कसाटा कापून वाढदिवस साजरा करणार होतो....तिने सगळी तयारी केलीच होती .....आधी आम्ही कसाटा कापल.....निधिनी मला त्यातला एक घास भरवला .....नंतर तिने मला ते ग्रीटिंग दिल .....मला म्हणाली.....घरी जाऊन वाच.... इथे नाही....मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि..मग ती मला म्हणाली...
"चल आता निघाल पाहिजे....आईला मी सांगितलंय मी दळण घेऊन येते....
काय?? एवढ सजून वगरे तू दळण आणायला जातेस असं सांगितलस??....वेडी आहेस का??
अरे आई कपडे बदलायला खोलीत गेली होती....तिने कुठे पाहिलंय मला तयार झालेलं.....सो पटकन सागून आले.......
पण आता गेल्यावर कळेलच ना
नाही
कसकाय?
कारण घरी कोणीच नसेल.....
ok....मग काय घाई आहे..हे ग्रीटिंग इथेच वाचुयात ना ....
नको....सांगितलं न की तू घरी वाच.....
बर , पण मोकळे केस खरच छान दिसतायेत तुला....निधी.....
हम्म्म्म  .....म्हणल होत ना तुला next time म्हणून....
ह्म्म्म...आज खरच खूप छान दिस्तीयेस तू.....
तू पण....पण तू चष्म्याऐवजी lenses का नाही try करत...
बर नक्की next time.....
असं म्हणून आम्ही निघालो....पौर्णिमेचा चंद्र टवकारून आमच्या कडे बघत होता....आणि म्हणत होता....
"वाढदिवस असावा तर असा "!!!!

No comments:

Post a Comment