Saturday, April 14, 2012

मुलाखत......

"हेलो, कोण बोलतय?
I am Komal, RJ , radio hits ८९.५ , am I talking to Mr.Rahul?
yeah, am Rahul, How Can I help You??
सर, आम्हाला तुमची मुलाखत घेयचीये ??
माझी??, कशाबद्दल???, न माझा कोणता अल्बम हिट झालाय , न मला कोणत अवार्ड मिळालं आहे , न मी कोणी celebrity आहे , मग माझी मुलाखत कशाला??
सर, मी स्वतः तुमचे लेख वाचले आहेत....मला स्वतःला त्याबद्दल तुम्हाला खूप काही प्रश्न विचारायचे आहेत...आणि मीच काय तुमचे बरेच  fans आहेत ज्यांना तुम्हाला काही विचारायचे असेल...
hey, if you dont mind, मला सर म्हणू नकोसं....राहुल म्हण.....बर ठीक आहे .....मी येयीन मुलाखतीला.....पण वेळ, स्थळ कधी कुठे..??
सर, ooops sorry, राहुल I will mail you the details , please give me your mail ID.
rahulta@gmail.com
ok, rahul then.....bye see you at my live show.....
bye, nice talking to you Ms.komal
Same to you Rahul.......Sir....
मी फोन ठेवला.....बाबा माझ्या खोलीत येयून थांबलेच होते....हातात खूप सारे कागद होते.....माझी त्यांच्याकडे पाठ असल्यामुळे मी त्यांना आताच पाहत होतो.....
"बाबा", तुम्ही कधी आलात....तुझी मुलाखत संपली आणि मी आलो....कोण हि मुलाखत??
अहो बाबा , आम्हाला कंपनीत येणाऱ्या एका गेस्टची मुलाखत घेयचीये....त्याचासाठीच माझ्या कलिगचा फोन आला होता....तुम्ही बोला काय काम आहे....(मी आई बाबांना माझ्या मुलाखतीच surprise देयच ठरवला होत...)
काही नाही रे....ते FD mature होतायेत न.....तर ते आता renew करायचे आहेत.....तुझ्या सह्या हव्या होत्या.....
अहो मग मला बोलवायच न.....मी आलो असतो....
जाऊ दे रे......बघ इथे दोन सह्या कर....
माझ्या डोळ्यासमोर मात्र आता माझे fans माझी सही घेयला थांबल्याचे दिसू लागले....   


No comments:

Post a Comment