Sunday, July 17, 2011

गोष्ट लोकलमधली-२०

नेहानी बोलावल्याप्रमाणे मी हॉटेल मध्ये पोचलो..मी काहीच घेऊन गेलो नव्हतो....hanging garden  वरून सुंदर view दिसत होता.....marine drive चा "गोल्डन नेकलेस " अगदी मनमोहक वाटत होता....मी hanging garden वर समुद्राकडे पाहत नेहाची वाट बघत बसलो होतो....तेवढ्यात माझा फोन वाजला....रोहीत्या होता...मी फोन घेतला ....
" हेलो, काय रे काय चाललंय?
   अरे काही नाही तू कुठे आहेस आत्ता ???
    अरे जरा बाहेर आहे.... marine drive वर आहे...का रे काय झाल..?
    काही नाही रे सहज केलेला फोन....
    तेवढ्यात नेहापण मला call करत होती..
     रोहितचा call waiting वर टाकला आणि नेहाचा फोन घेतला...
     हेलो,  काय आहे हे नेहा....कुठे आहेस तू..?? मी तुझी केव्हापासून वाट पाहतोय..?? कुठे आहेस तू?
    अरे राजा, आधी मला सांग, तुझ्या आईला हिरवा रंग आवडतो की मरून??
    काय?? आता आई कुठे आली मध्ये?? सोना काय चाललंय तुझ ?? सांगशील का जरा,  मला असा इथे   बोलवून तुझा काय चाललंय?
    अरे हो जरा थांब....आधी विचारल त्याच उत्तर दे...कोणता रंग ?
    तू काही ऐकणार नाहीयेस....मरून.....खुश?
    thanx dear..... असं म्हणून तिने चक्क फोन कटच केला...
     परत आपला मी समुद्राकडे पाहत उभा राहिलो...
    काही वेळानी पुन्हा नेहाचा फोन आला?
   हेलो,  sorry dear, अरे तुझ watch कोणत्या कंपनीच आहे titan ki timex??
   सोना अरे काय चाललंय हे सगळ?? तू नक्की काय करतीएस?? कुठे आहेस तू?? माझ घड्याळ titanch आहे.
    बर ठीक आहे..असं म्हणून तिने पुन्हा फोन cut केला.
  आता मात्र माझा डोक सरकल होत....मी स्वतच नेहाला फोन लावला...पण ती इतकी शहाणी होती कि फोन उचलून कट करत होती....माझे पैसे जात होते...
   वाट पाहण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही हे लक्षात आल आणि मी मावळत्या सूर्याकडे बघत डोळे मिटून विचार करू लागलो ..... 
  
 

No comments:

Post a Comment