त्या दिवशी रविवार होता...दिवसभर आराम करून संध्याकाळी marine drivela जायचा बेत केला होता....त्याप्रमाणे दुपारी मस्त झोप काढली...५ वाजता चहा करून घेतला....आणि at around ६ वाजता मी दादरला गेलो....ट्रेन पकडली....चर्चगेटला उतरलो.....पोचेस्तोर ६:३० झाले होते....सूर्य केशरी रंग क्षितिजात उदार मनाने उधळत होता....हे ठिकाण मला नेहमी जणू सांगायचं...."मित्रा....बघ हे जग ना... ह्या किनार्यासारख आहे...त्याच्या समोरच त्याची मंजिल असते...पण तरी त्याला चंद्राचा आधार लागतोच ना त्या मंजिल पर्यंत पोहचायला...त्या जागेनी मला नेहमीच प्रोत्चाहन दिलेलं होतं.... नवी उमेद दिली होती...काही नवीन करण्याची...असो...थोड्यावेळ मी शांतपणे समुद्राकडे...त्याच्या अथांगतेकडे पाहत बसलो.....वेळ कसा गेला कळलच नाही....कारण ठिकाण marine drive ....आणि कानात गाणं "इन दिनो....."....कसं लक्ष्य असणार वेळेकडे......७:३० झाले होते....मी परत जाण्यासाठी चर्चगेट कडे जायला निघालो....स्टेशनवर पोचलो...tickit काढलं....आणि मुद्दाम slow...ट्रेन मध्ये बसलो.....मला तो दिवस आठवत होता..नेहासाठी मी कविता म्हणली तो...तेवढ्यात एक कानातले विकणारा डब्यात आला....सुंदर कानातले होते त्याच्याकडे....मी आईला घेयचे म्हणून शोधू लागलो...एक सुंदर जोड सापडला....मी घेतला..पण काय जणू मनात एक हलकासा विचार येऊन गेला...नेहासाठी घेऊ का..?? आणि मी घेतले पण....
दुसर्यादिवशी...नेहा दादरला उभीच होती....मला जरा पोहचायला उशीर झाला होता...मी तिच्यासाठी कानातले घेतले खरे...पण तिला देयचे कसे...हा मोठा प्रश्न होता...ट्रेन मध्ये बसलो...आज ती जरा गप्पंगप्पच होती....मी हळूच कानातल्याच पाकीट काढलं..तिला म्हणलं..."नेहा....काय झालं?? आज गप्पं गप्पं?....ती म्हणाली काही नाही रे...आज visitors येणारेत...ऑफिसमध्ये...आणि घाईघाईत मी कानात्लेच घातले नाहीयेत...???...किती विचित्र दिसतेय मी...???" पुन्हा एकदा sixer मारायचा chance देवाने मला दिला होता...तिला म्हणलं...हे मात्र खरये कि तू खूप विचित्र दिस्तीयेस?? पण हे बघ...हे घे कानातले...मी आणलेत तुझ्यासाठी...तिने ते हातात घेतले...एखाद्या गायकाने सुंदर जागा घेतल्यावर....त्याला जसा आनंद व्हावा तसा तिला झाला होता...ती म्हणाली खूप सुंदर आहेत....ये आता तूच घाल माझ्या कानात.... मी हळूच तिचे केस बाजूला घेतले......कानातले घातले.....डब्यातले सगळे लोक आमच्याकडेच पाहत होते.....
No comments:
Post a Comment