"भय्याजी, २ पानीपुरी लगावो.....
नेहा , आग मला नकोय....
अरे काय रे....मी एकटीने खायची का मग? शेट बाबा, तू असाच करतोस...
बर्र ऐक न एक काम करू ,एक प्लेट घेऊ आणि एकत्र खाऊयात.....चालेल
आता कस बोललास माझ्या मनातल....:"
त्या भय्याने लगेच पाणीपुरी बनवली.....पहिली पाणीपुरी नेहाने घेतली....तिच्या चेहऱ्यावरच समाधान अलौकिक होत.....तीच ते निरागस सोंदर्य अनुभवायची परत एक संधी मला ह्या पाणीपुरीने दिली होती....
" जानू, काय म्हणतोय तुझा समुद्र?, आणि तुझा marine drive? , नेहा म्हणाली....
काही नाही...नेहमीसारखाच फुललेला...होता marine drive आणि माहितीये शोना , आज परत त्यानी मला नकळत ती गोष्ट दिली...जी माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे.....
हो ते मला माहितीये....पण जानू हे marine drive, समुद्र आणि मी .....हि गोष्ट तुझ्याशी रीलेटेड आहे का?
का ग? आज वर कधी तू मला माझ्या ब्लॉग बद्दल विचारल नाहीस आणि आज एकदम...
नाही असच....सांग ना....
सांगीन निवांत.....पण आता आपल्याला हॉटेलवर गेलं पाहिजे ...आपल्याला दोघांनाही ८:३०-९ ला परत बाहेर पडाव लागेल.."
एकदाची ती पाणी पुरी आटोपली...आम्ही taxi पकडली आणि निघालो... हॉटेलला पोहचलो....थोड्यावेळ आराम केला आणि परत बरोबर ९ ला बाहेर पडलो....नेहाला अंधेरीला जायचं होत.. ती वेस्टर्न ने निघाली आणि मी सेन्ट्रलने ठाण्याकडे निघालो...... माझ्या बोल्ग्वरची हि नवीन गोष्ट लोकांना खरच खूप आवडत होती....पण त्यापेक्षाही नेहाला ती कुठेतरी माझी गोष्ट वाटत होती हे ऐकून थोडा आनंदही झाला आणि थोड आश्चर्यही वाटलं....पण ह्या पाणीपुरी आणि गोष्टीच्या नादात तिच्यासाठी घेतलेल्या बांगड्या तिला देयच्या मी विसरलो होतो....हे माझ्या लक्षात आल...तेवढ्यात आज खूप दिवसांनी मी विक्रोळी स्टेशन वरून गेलो ....अन एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या....
No comments:
Post a Comment