मी ट्रेन मधून परत हॉटेल वर चाललो होतो ...तेवढ्यात एक मेल आला....मी ओपन केला ...त्यात लिहल होत...
आदरणीय सर,
स.न .वि.वि
मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी मनोज निमगावकर ....हेडमास्तर , सरस्वती विद्यालय, औरंगाबाद . मी आपले ब्लॉग नियमित वाचतो आणि ते मला खूप आवडतात...हल्लीच तुम्ही लिहलेली , ""मरीन लाईन्स, समुद्र आणि मी ही गोष्ट तर खूपच मनाला भावणारी आहे...त्यात मांडलेली समुद्राची व्यथा आणि त्याला जबाबदार असणारी संपूर्ण मानवजाती ह्याची सुंदर आणि मार्मिक मांडणी त्यात केली आहे....मी ह्या गोष्टीनी खूप प्रभावित झालो आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे ......येणाऱ्या आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कृपया आपण मुलांना एक छोटी का होईना गोष्ट सांगावी....कारण ह्या देशाच्या येणाऱ्या भविष्याची कल्पना ह्या देशाचे भविष्य असणार्या ह्या मुलांना कळणं आवश्यक आहे....तरी आपण आपल्याला योग्य असणार्या तारखा मला कळवाव्यात....आणि येताना नेहा madamला पण घेऊन या ...मला त्यांना भेटायची फार इच्छा आहे..त्या तुम्ही लिहल्या आहेत तशाच आहेत का ह्याची मला खुप उत्सुकता आहे....आपण नक्की याल असे गृहीत धरूनच मी कार्यक्रमाची रूपरेषा आखणार आहे .....आणि हो अश्याच गोष्टी लिहित रहा....धन्यवाद
आपला कृपाभिलाषी ,
मनोज
त्यांनी शेवटी त्यांचा नंबर आणि पत्ता दिला होता.....मला एकदम काही कळेनाच....मी आणि मुलांना गोष्ट .....हे काहीतरी विचित्र वाटत होत..आणि माझ्यापेक्षा नेहालाजास्त आग्रहाच आमंत्रण होत .....बहुदा .....मी जरा जास्तच चांगल लिहलय तिच्याबद्दल गोष्टीमध्ये असं मला वाटल....पण....मनाला समाधान पण वाटल....आपल लिखाण जाणणारे आणि ते इतरांपर्यंत पोहचाव म्हणून प्रयत्न करणारे पण लोक आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला....मी ताबडतोब त्या मेलला reply लिहिला ...
नमस्कार मनोज सर ,
आपले खूप खूप आभार मला ह्यायोग्य सामाज्ल्याबद्दल....पण मी इतका मोठा नाही....लिखाण हा माझा छंद आहे .....तुम्हाला हे लिखाण खूप आवडल हे ऐकून खूप आनंब्द झाला ...मी तुमच्या शाळेत नक्की येयीन....पण एक विद्यार्थी म्हणूनच....त्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला.....तेव्हा कोणतीही औपचारिकता नको....आणि हो मी नेहाला नक्की आणीन...तिला पण मुलांच्यात राज्मायला खूप आवडत....तेव्हा तुम्ही सांगाल ती तारीख मला मान्य असेल.....मी नक्की येयीन.....धन्यवाद
आपला आज्ञाधारक,
रोहित
बऱ्याच दिवसांनी वाचतोय, आधी वाटलं खरंच तुला पत्र आलं होतं की काय... गोष्ट वाढतीये, गोष्टी वाढतायत... पण रस खरंच वाढत नाहीये.
ReplyDeleteकविता आवडल्यात, छान लिहितोस.