" " आई" ....माझी सगळ्यात लाडकी कविता.....आणि तीच मी त्या स्नेहसंमेलनात वाचणार होतो...असो....आज मी तुम्हा सगळ्यांना त्या कवितेचा शेवट ऐकवतो....
" हे देवा!! ज्यांना नाही ही आई
त्यांना कोण बरे तारी
माझा धन्यवाद तुला
तू दिलीस मला आई "
पुन्हा टाळ्या कडाडल्या...." मुलांनो , आई ह्या शब्दाशी माझ्यामते प्रत्येकाच एक अलौकिक नातं असतं....तसं माझंपण आहे.....आज जे काय ....जसा काय मी तुमच्यासमोर उभा आहे तो केवळ आणि केवळ माझ्या आई आणि बाबांमुळे आहे.....हे लिखाणाच बाळकडू तिने मला खूप लहानपणापासून दिल.....ते म्हणजे निबंध लेखनातून....खरच तिने निबंध ला "नि" + "बंध" का म्हणतात हे मला पटवून दिलं आणि मला लिखाणच जमायला लागल...तेव्हा मुलांनो, तुम्ही आत्ता ज्या वयात आहात त्या वयात.....खरच खूप खेळा, मज्जा करा....आनंद लुटा....पण त्या बरोबरच आईचं म्हणन नेहमी ऐका....ती व्यक्ती कधीच तुम्हाला काहीही चूक सांगूच शकत नाही....ह्यापुढच जीवन अधिक अधिक वेगवान होत जाणारे....तुम्हाला तुमचा तोल सांभाळायचा आहे...तोल संभाळण तुमच्या आईकडून शिकून घ्या.....प्रेम कारण आणि प्रेम देण तुमच्या आईकडून शिकून घ्या....
मित्रांनो, तुमच्यापैकी काही मुलांनी माझ्या ब्लोगवरची आधार गोष्ट वाचली असेल....मला तुम्हाला एवढच सांगायचं आहे की.....जो गरजू आहे त्याला नक्की मदत करा....त्याला नक्की आधार द्या....पण कोणालाही कधी आधाराची सवय लावू नका.....कारण त्याची एकदा सवय लागली कि माणूस पाची इंद्रियांनी दणकट असूनही कुबडा होतो.....
मुलांनो , शेवटची पण अतिशय महत्वाची गोष्ट....तुम्ही ज्या कोणाबरोबर राहता....त्या प्रत्येक माणसाला ओळखायला शिका....तुम्ही एकदा ओळखायला शिकलात की तुम्हाला कोणी भुलवू शकत नाही....तुमचा कोणी फायदा करून घेवू शकत नाही.....बाकी तुम्ही सगळे खूप हुशार तर आहातच पण भरपूर अभ्यास करा....वाचा ....खेळा आणि सतत सुख शोधत बसण्यापेक्षा....आलं त्यला सुख मानत चला.....बघा सुख आपोआप तुमच्याकडे येयील आणि तुम्ही नेहमी आनंदी रहाल.....
मला इथ बोलावलत...एवढा मोठा मान दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार....हि शाळा अशीच पुढे जाओ अश्या शुभेत्छां देतो...धन्यवाद"
परत टाळ्यांचा कडकडाट झाला .....मी माझ्या जागेवर परत येयून बसलो....नेहानी हळूच तिचा हात माझ्या हातावर ठेवला....माझ्या भाषणाला मिळालेली ह्यापेक्षा मोठी दाद असूच शकत नाही.....
No comments:
Post a Comment